30 C
Mumbai
Tuesday, May 16, 2023
घरव्यापार-पैसाबजेटमधली तुमच्या आमच्या कामाची बातमी : आता महिन्याला वाचू शकतील दहा हजार...

बजेटमधली तुमच्या आमच्या कामाची बातमी : आता महिन्याला वाचू शकतील दहा हजार रुपये; कसे ते समजून घ्या …

असे मिळेल उत्पन्न : या योजनेत 15 लाख रुपये गुंतवल्यास, तुम्हाला 7.1 टक्के वार्षिक व्याजदर मिळेल. यानुसार संयुक्त खात्यातून एक वर्षाचे एकूण 1,27,800 रुपये व्याज होते. ही रक्कम वर्षाच्या 12 महिन्यांत वितरित केली जाईल. अशाप्रकारे प्रत्येक महिन्याचे सुमारे 10,650 रुपये व्याज होते. तर व्यक्तिगत खात्यातून 9 लाख रुपये जमा केल्यावर मासिक व्याज 5,326 रुपये आणि वार्षिक व्याज 63,912 रुपये असेल. योजनेचा परिपक्वता (मॅच्युरिटी) कालावधी 5 वर्षांचा आहे.

आजच्या बजेटमधली तुमच्या आमच्या कामाची बातमी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज सादर केलेल्या अर्थसंकल्पातील ही तशी लय भारी बातमी आहे. त्यामुळे सर्वसामान्य माणसाचे आता महिन्याला वाचू शकतील दहा हजार रुपये! कसे ते समजून घ्या …

महिन्याला दहा हजार रुपये वाचविण्यासाठी तुम्हाला पोस्टात गुंतवणूक करावी लागणार आहे. या निमित्ताने पोस्ट खात्यालाही पुन्हा एकदा चांगले दिवस येणार आहेत. आता महिन्याला 5 नव्हे तर पूर्ण 10 हजार रुपये कसे वाचतील, अर्थसंकल्पाच्या घोषणेचा कसा फायदा होईल, ते समजून घेऊया.

यंदाच्या अर्थसंकल्पात पोस्ट ऑफिस बचत योजनेत, म्हणजे पोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्कीममध्ये (MIS) एकल खात्यांसाठी नवीन मर्यादा 4.5 लाख रुपयांवरून 9 लाख रुपये करण्यात आली आहे. संयुक्त खातेदारांसाठी ही मर्यादा आता 9 लाख रुपयांवरून 15 लाख रुपये करण्यात आली आहे. त्यामुळे यापुढे तुम्हाला दर महिन्याला चांगले उत्पन्न मिळवायचे असेल, तर पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना तुमच्यासाठी सर्वोत्तम असेल.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज अर्थसंकल्पात लघु बचत योजना असलेल्या पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेची (POMIS) मर्यादा वाढवली आहे. या योजनेत तुम्ही आता व्यक्तिगत खात्यात 9 लाख रुपये आणि संयुक्त खात्यात 15 रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकता. यानंतर तुम्हाला दरमहा 10 हजार रुपये मिळतील. या योजनेत फक्त एकदाच गुंतवणूक करून तुम्ही दर महिन्याला उत्पन्नाचा लाभ घेऊ शकता. कारण या योजनेत तुम्हाला पूर्वीपेक्षा जास्त व्याज मिळेल. नवीन वर्षाच्या मुहूर्तावर सरकारने या योजनेच्या व्याजदरात 0.4 टक्के वाढ केली होती. त्यामुळे आता 6.7 टक्क्यांऐवजी 7.1 टक्के दराने या योजनेवर वार्षिक व्याज मिळत आहे.

तुम्हाला एकरकमी गुंतवणूक करून पैसे कमवायचे असतील, तर पोस्ट ऑफिसची मासिक उत्पन्न योजना दरमहा तुमच्या उत्पन्नाचा स्रोत बनू शकते. या योजनेत नव्याने पैसे जमा करणाऱ्यांचे मासिक उत्पन्न वाढेल. येथे तुमची संपूर्ण गुंतवणूक सुरक्षित राहील आणि तुम्ही 5 वर्षांनंतर संपूर्ण रक्कम काढू शकता. यात एकल आणि संयुक्त खाती उघडण्याची सुविधा आहे.

हे सुद्धा वाचा : 

Budget 2023 : पॅन कार्ड हे आता राष्ट्रीय ओळखपत्र; केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची अर्थसंकल्पात घोषणा

पोस्ट खात्यात एकाच दिवसात 5000 ग्रामीण डाक सेवकांच्या बदल्यांना मंजूरी; बदल्यांसाठी ऑनलाईन पोर्टल सुरू

रघुनाथ माशेलकर, प्रा. संजय धांडे, वसंत काळपांडे यांनी सांगितले अर्थसंकल्पातील फायदे-तोटे

कसे मिळेल उत्पन्न ते बघा …
आता तुम्ही पोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्कीमसाठी (POMIS) 15 लाख रुपये गुंतवल्यास, तुम्हाला 7.1 टक्के वार्षिक व्याजदर मिळेल. यानुसार संयुक्त खात्यातून एक वर्षाचे एकूण 1,27,800 रुपये व्याज होते. ही रक्कम वर्षाच्या 12 महिन्यांत वितरित केली जाईल. अशाप्रकारे प्रत्येक महिन्याचे सुमारे 10,650 रुपये व्याज होते. तर व्यक्तिगत खात्यातून 9 लाख रुपये जमा केल्यावर मासिक व्याज 5,326 रुपये आणि वार्षिक व्याज 63,912 रुपये असेल.
मॅच्युरिटी होते 5 वर्षात
पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेचा परिपक्वता (मॅच्युरिटी) कालावधी 5 वर्षांचा आहे, परंतु 5 वर्षानंतर तो नवीन व्याजदरानुसार वाढविला जाऊ शकतो. या योजनेअंतर्गत तुम्हाला बँक एफडीच्या तुलनेत चांगला परतावा मिळत आहे. जर तुम्ही मासिक पैसे काढले नाहीत, तर ते तुमच्या पोस्ट ऑफिस बचत खात्यात राहतील आणि तुम्हाला हे पैसे मूळ रकमेसह जोडून पुढील चक्रवाढ व्याज मिळत राहील.
Post Office Monthly Income Scheme Will Save 10 Thousands Rupees Per Month Budget 2023 Good News For Common Man

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी