क्राईम

CID फेम अभिनेत्री चंद्रिका साहाची नवऱ्याविरोधात पोलिसांत धाव

सीआयडी, सावधान इंडिया, क्राईम अलर्ट अशा विविध मालिकांमुळे प्रसिद्ध झालेली  41 वर्षीय अभिनेत्री चंद्रिका साहा हिने आपल्या 21 वर्षीय पती अमन मिश्राविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पतीने आपल्या 14 महिन्यांच्या मुलाला फरशीवर आपटून मारहाण केल्याचे तीने तक्रारीत म्हटले असून या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आले आहेत.

चंद्रिका साह हि पहिल्या पतीपासून वेगळी झाल्यानंतर तीने अमन मिश्रासोबत नात्यात आली. मात्र त्यावेळी ती गर्भवती होती. अमनला हे मुल नको होते. परंतू तीने आपल्या बाळाला जन्म दिला. गेल्या मिहिन्यात तीने अमन सोबत लग्न केले. यावेळी तीचा मुलगा 14 महिन्यांचा होता. या मुलामुळे अमन नाराज होता, असे अभिनेत्रीने तक्रारीत म्हटल्याची माहिती समोर आली आहे.

चंद्रिकाने तक्रारीत म्हटले आहे की, मुलगा रडत असल्याचे दिसल्यानंतर तीने पाहिले असता त्याच्या अंगावर वळ दिसून आले. त्यानंतर तीने सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यानंतर त्यात तीला पती अमनने मुलाला तीन वेळा फरशीवर आपटल्याचे दिसून आले. त्यानंतर चंद्रिकाने मुलाला मालाड येथील खासगी रुग्णालयात दाखल केले.

हे सुद्धा वाचा

पाकिस्तानी ‘ईडी’कडून हायकोर्टातच इम्रान खान यांना अटक

खारघर- तुर्भे लिंक रोड तीन वर्षांत पूर्ण होणार

शरद पवार म्हणाले, जयंत पाटील, अजित पवार, दिलीप वळसे-पाटील, अनिल देशमुख, आर. आर. पाटीलांनी कर्तृत्व सिद्ध केले

चंद्रिका साहाने तक्रारीत म्हटले आहे की, मुलगा रडण्याचा आवाज आला तेव्हा ती किचन मध्ये होती. मुलाच्या रडण्याचा आवाज आल्यानंतर तिने आपल्या पतीला मुलाकडे लक्ष देण्यास सांगितले. मात्र तरी देखील मुलाच्या रडण्याचा आवाज कमी झाला नाही. त्यामुळे ती धावत खोलीत आली. यावेळी मुलगा फरशीवर पडलेला आढळला. त्यानंतर तीने तातडीने मुलाला रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर चंद्रिकाने घरातील सीसीटीव्ही फुटेज पाहिले असता त्यात चंद्रिकाला आपला पती मुलाला फरशीवर आपटत असल्याचे दृष्य पाहून तिला धक्का बसला.

 

प्रदीप माळी

Recent Posts

नाशिकरोडमधून 2 गावठी कट्ट्यांसह दोघांना अटक!

उपनगर पोलिसांच्या गुन्हेशोध पथकाला दोघे संशयित दसक गावानजिकच्या महालक्ष्मीनगरमध्ये गावठी कट्टे विक्रीसाठी येणार असल्याची खबर…

9 hours ago

गंगापूर धरणाची दोन कोटी लिटरने वाढली पाणी क्षमता

गंगापूर धरणालगत गंगावऱ्हे गांव येथे गेल्या १४ दिवसांपासून सुरू असलेल्या गाळ उपसा मोहिमेमुळे गंगापूर धरणाची…

10 hours ago

विरोधकांचा मोदी सरकारविरोधात ‘व्होट जिहाद’!

दोन टप्प्यातील निवडणुकांमध्ये अहंकारी आघाडीचा संसार बुडाल्याचे स्पष्ट झाल्याने निराश झालेले इंडी आघाडीचे नेते आता…

10 hours ago

राहुल गांधीची चायनीज तर मोदीजींची भारतीय गॅरंटी अमित शहा

या निवडणुकीत एक गट राम मंदिराला विरोध करणाऱ्यांचा आहे, तर दुसरा गट राम मंदिर बनविणारा…

10 hours ago

कान्स फिल्म फेस्टिव्हलसाठी ‘या’ तीन मराठी चित्रपटांची निवड

फ्रान्समध्ये येत्या 14 मे ते 22 मे 2024 दरम्यान कान्स फिल्म फेस्टिव्हल संपन्न होणार आहे.…

10 hours ago

नाशिक मनपाच्या बांधकाम विभागाचा कानाडोळा,एम एन जि एल गॅस मुळे नागरिकांना होतोय त्रास

गेल्या अनेक वर्षांपासून शहरातील अनेक भागात एम एन जि एल तर्फे गॅस (MNGL Gas) वाहिनी…

14 hours ago