30 C
Mumbai
Saturday, April 27, 2024
Homeमुंबईखारघर- तुर्भे लिंक रोड तीन वर्षांत पूर्ण होणार

खारघर- तुर्भे लिंक रोड तीन वर्षांत पूर्ण होणार

मुंबई आणि मुंबईलगची दळणवळण व्यवस्था सक्षम करण्याच्या दृष्टीने रस्ते, मेट्रोलाईन्सची मोठमोठी कामे अतिशय वेगाने सुरु आहेत. नवी मुंबईतील खारघर आणि तुर्भे दरम्यान लिंक रोडची निर्मिती करण्यात येणार असून या नव्या मार्गामुळे नवी मुंबई-ठाणे प्रवास अवघ्या 30 मिनिटांत होणार आहे. सिडकोकडून या नव्या मार्गाची निर्मिती केली जात असून या लिंक रोडचे काम तीन वर्षात पूर्ण केले जाणार आहे.

सध्या सायन पनवेल महामार्गावर वाहनांची संख्या वाढत आहे. भविष्यात नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरु झाल्यानंतर या मार्गावर आणखी वाहनांची संख्या वाढू शकते त्यामुळे भविष्यातील वाहतुकीची समस्या टाळण्याच्या दृष्टीने खारघर- तुर्भे लिंक रोडची निर्मिती केली जात आहे. हा मार्ग सायन पनवेल महामार्गाला जुईनगर स्टेशनसमोरुन खारघरमधील इंटरनॅशनल कार्पोरेट पार्कला जोडला जाणार आहे. या महामार्गाला जवळपास 2195 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. या लिंक रोडमुळे सायन पनवेल मार्गावरील वाहतुक कोंडी कमी करण्यास मदत होईल असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. हा महामार्ग ठाणे-बेलापूर मार्गावरुन प्रवास करणाऱ्यांसाठी देखील फायदेशीर ठरणार आहे.

तुर्भे-खारघर चार पदरी लिकं रोड तुर्भे येथून सुरु होऊन जुईनगर वरुन खारघरला पोहचेल. हा महामार्ग सायन पनवेल महामार्ग, ठाणे-बेलापूर महामार्ग आणि पाम बिच या मार्गांना टाळून उभारण्यात येणार आहे. या लिंक रोडची लांबी 5.490 किमीची असून या मार्गावर 1.763 किमी लांबीचा बोगदा असणार आहे. खारघरच्या डोंगररांगेखाली हा बोगदा निर्मान केला जाणार आहे.

हे सुद्धा वाचा

व्हॉट्सअॅप आणि ट्रूकॉलरने केली हातमिळवणी

शरद पवार म्हणाले, जयंत पाटील, अजित पवार, दिलीप वळसे-पाटील, अनिल देशमुख, आर. आर. पाटीलांनी कर्तृत्व सिद्ध केले

‘द केरला स्टोरी’च्या निर्मात्याला भर चौकात फासावर…; जितेंद्र आव्हाड कडाडले

नवी मुंबई, ठाणे परिसरात दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत असून त्या दृष्टीने इन्फ्रस्टक्चर देखील उभारले जात आहे. नवी मुंबई परिसरात शिक्षण, आयटी उद्योग तसेच एमआयडीसी असल्यामुळे दिवसेंदिवस येथे लोकसंख्या वाढत आहे. पनवेल येथे आंतरराष्ट्रीय विमानतळाचे देखील काम युद्ध पातळीवर सुरु आहे. त्यामुळे अनेक विकासकामे रस्ते, मेट्रो यासारखे प्रकल्प वेगाने सुरु आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी