क्राईम

ईडीच्या मागणी नंतर गँगस्टर इकबाल मिर्ची यांच्या विरोधातील फाईल गहाळ

मयत गँगस्टर इकबाल मेमन उर्फ इकबाल मिर्ची हा एक मोठा गँगस्टर होता.तो नंबर एकच ड्रग्स समगलर होता.तो दाऊद गँगसाठी ही काम करायचा. यांच्या विरोधात ईडीने मनी लॉनडरिंगचा गुन्हा दाखल केला आहे.मात्र,आता मुंबई पोलिसांना इकबाल विरोधात असलेले केस पेपर सापडत नाहीत.कुठे तरी गहाळ झाले आहेत. यामुळे ईडीची कार्यवाही रखडली आहे.

मिर्ची यांच्या विरोधात वीस ते तीस वर्षांपूर्वी अनेक केसेस दाखल आहेत.या केसेस मारमारीच्या,ड्रगस तस्करीच्या, खुनाच्या , खंडणीच्या या केसेस आहेत.याच गुन्ह्याच्या आधारावर ईडीने इकबाल यांच्या विरोधात मनी लॉनडरिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.त्यानुसार ईडीने तपास सुरू केला.ईडीला आपला गुन्हा दाखल करण्यासाठी आरोपी विरोधात इतर यंत्रणेकडे गुन्हा दाखल असणं आवश्यक असत. त्याच प्रमाणे आरोपी मयत झाला असला तरी ईडी गुन्ह्याचा तपास करत असते.

त्यामुळे इकबाल मेल्यावर त्याचे पेपर मुंबई पोलिसांना महत्वाचे वाटले नसतील पण ईडीच्या दृष्टीने ते पेपर महत्वाचे आहेत. त्याचमुळे ईडीने मुंबई पोलिसाकडे इकबाल विरोधात असलेले कागदपत्रे मागितली आहेत.मुंबई पोलिसांनी ईडीला पेपर सापडत नाहीत, असं तोंडी कळविलेलं आहे.अजून लिखित स्वरूपात कळवलेलं नाही.इकबाल विरोधात ईडीची कोर्ट बाजी सुरू आहे.यावेळी इकबाल विरोधात कोणत्या गुन्ह्याच्या आधारावर कारवाई केली हे ईडीला कोर्टाला कळवायच आहे. त्यामुळे त्यांना मुंबई पोलिसांचा लिखित रिप्लाय महत्वाचा आहे. ईडी मुंबई पोलिसांच्या लिखित स्वरूपातील प्रतिसादची वाट पाहत आहे.कारण तसं त्यांना कोर्टाला कळवायच आहे.

ईडीसाठी मुंबई पोलिसांच्या केसेस तर महत्वाच्या आहेतच पण आता त्या सापडत नसल्याने थोडा पेच निर्माण झाला आहे.मात्र,त्यावर मार्ग काढायची तयारी ईडीने सुरू केली आहे.ईडीने इकबाल विरोधात 2019 मध्ये गुन्हा नोंदवला.या तपासात इकबाल याचा साथीदार हुमायून मर्चंट याला अटक करण्यात आली होती.त्याच्या तपासात चेन्नई इथल्या एका गुन्ह्याचा शोध लागला होता.तामिळनाडू , चेन्नई येथे हुमायून विरोधात किलुपोक येथे एक गुन्हा दाखल आहे.या गुन्ह्यात हुमायून याने बोगस के वाय सी चा 2011 सालात वापर करून आयडीबीआय बँकेत खाते उघडलं होत. त्या द्वारे त्याने सहा कोटी 60 लाख रुपये इकबाल मिर्ची याला हवाला केले होते.आता या गुन्ह्याचा वापर ईडी इकबाल विरोधात लॉनडरिंगचा खटला चालवण्याची शक्यता आहे.

हे देखिल वाचा

ऐनसीबीची मोठ़ी कारवाई, साढे चार कोटीचे ड्रग्स जप्त

गौतमी पाटीलची लावणी महाराष्ट्राची नाही; डॉ. चंदनशिवे यांचा दावा

आधार अपडेटमध्ये मुंबईच्या विद्यार्थ्यांची पिछाडी 

ईडीने एका गुन्ह्यात मर्चंट याला अटक केली होती.याच गुन्ह्यात धीरज वाधवां आणि कपिल वाधवा यांना अटक केली होती.हा एच डी आय एल या कंपनीचा घोटाळा होता.ही केस देखील लॉनडरिंगची होती.या गुन्ह्यात मिरची याची पहिली पत्नी हाजरा आणि तिच्या आसिफ आणि जुनेद या दोन मुलांना अटक करण्यात आली होती.

After demand of ED
File against gangster Iqbal Mirchi missing

सुधाकर काश्यप

Recent Posts

नाशिकरोडमधून 2 गावठी कट्ट्यांसह दोघांना अटक!

उपनगर पोलिसांच्या गुन्हेशोध पथकाला दोघे संशयित दसक गावानजिकच्या महालक्ष्मीनगरमध्ये गावठी कट्टे विक्रीसाठी येणार असल्याची खबर…

2 hours ago

गंगापूर धरणाची दोन कोटी लिटरने वाढली पाणी क्षमता

गंगापूर धरणालगत गंगावऱ्हे गांव येथे गेल्या १४ दिवसांपासून सुरू असलेल्या गाळ उपसा मोहिमेमुळे गंगापूर धरणाची…

3 hours ago

विरोधकांचा मोदी सरकारविरोधात ‘व्होट जिहाद’!

दोन टप्प्यातील निवडणुकांमध्ये अहंकारी आघाडीचा संसार बुडाल्याचे स्पष्ट झाल्याने निराश झालेले इंडी आघाडीचे नेते आता…

3 hours ago

राहुल गांधीची चायनीज तर मोदीजींची भारतीय गॅरंटी अमित शहा

या निवडणुकीत एक गट राम मंदिराला विरोध करणाऱ्यांचा आहे, तर दुसरा गट राम मंदिर बनविणारा…

4 hours ago

कान्स फिल्म फेस्टिव्हलसाठी ‘या’ तीन मराठी चित्रपटांची निवड

फ्रान्समध्ये येत्या 14 मे ते 22 मे 2024 दरम्यान कान्स फिल्म फेस्टिव्हल संपन्न होणार आहे.…

4 hours ago

नाशिक मनपाच्या बांधकाम विभागाचा कानाडोळा,एम एन जि एल गॅस मुळे नागरिकांना होतोय त्रास

गेल्या अनेक वर्षांपासून शहरातील अनेक भागात एम एन जि एल तर्फे गॅस (MNGL Gas) वाहिनी…

7 hours ago