29 C
Mumbai
Friday, May 3, 2024
Homeएज्युकेशनआधार अपडेटमध्ये मुंबईच्या विद्यार्थ्यांची पिछाडी 

आधार अपडेटमध्ये मुंबईच्या विद्यार्थ्यांची पिछाडी 

मुंबई शहर आणि उपनगर हे विद्यार्थ्यांचे आधार अपडेट करण्यात राज्यात सर्वात पिछाडीवर राहिले आहेत. यामध्ये मुंबई उपनगरात अर्ध्याही विद्यार्थ्यांचे आधार कार्ड अपडेट होऊ शकले नाही. केवळ 49.94 टक्के इतकेच अपडेट झाले असून शहरात 62.66 टक्के इतके झाले आहेत. 30 एप्रिल रोजीच्या अखेरच्या मुदतीनंतरही तब्बल 53 लाख 17 हजार 608 विद्यार्थ्यांचे आधार कार्ड अपडेट झालेले नाहीत. शिक्षण विभागाने वारंवार आवाहन करुनही प्रत्येक विद्यार्थ्याची माहिती आणि त्याचे आधार कार्ड अनुदानित शाळांसोबत अपडेट केले जात नाही. तांत्रिक बाबीची संस्थाचालकांकडून माहिती दिली जात नाही, याबाबत आता संशय व्यक्त केला जात आहे.

मुंबई शहर आणि उपनगरातील अनुदानित, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये 17 लाख 99 हजार 691 विद्यार्थी असून त्यापैकी अखेरच्या मुदतीपर्यंत 10 लाख 41 हजार 24 विद्यार्थ्यांचे आधार लिंक अपडेट झाले आहेत तर उर्वरित 7 लाख 58 हजार 667 विद्यार्थ्यांचे अपडेट बाकी राहिले आहे. आधार कार्ड अपडेट न करणाऱ्या अनुदानित संस्थावर तातडीने कारवाईचा भाग म्हणून त्यांचे अनुदान बंद केले जाईल. यामुळे राज्यात हजारो शिक्षकांच्या नोकच्या धोक्यात येण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे माहिती दडविणाऱ्या संस्थाचालकावरही कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

राज्यातील शाळांमध्ये शिकत असलेल्या एकूण 2 कोटी 13 लाख 88 हजार 177 विद्यार्थ्यांपैकी आत्तापर्यंत 1 कोटी 60 लाख 70 हजार 569 विद्यार्थ्यांचे म्हणजेच 75.14 टक्के आधारकार्ड अपडेट झाले आहेत. यामध्ये सर्वात कमी आधारकार्ड अपडेट हे मुंबई उपनगरात केवळ 49.94 टक्के इतके झाले असून राज्यात सर्वाधिक जास्त आधार कार्ड नोंदणी अपडेट करण्यात सिंधुदुर्ग जिल्हा आघाडीवर असून तिथे 92.53 टक्के त्यानंतर रत्नागिरी 89.43 टक्के इतकी नोंदणी झाली आहे. त्यानंतर सातारा 89.6, जळगाव 88.94, अहमदनगर 86.36, सांगली 85.72, अकोला 82.67, कोल्हापूर 82.36, यवतमाळ 81.25 टक्के इतके आधार कार्डचे अपडेट करण्यात आले आहेत.

हे सुद्धा वाचा: 

तुमचे पॅन आधार लिंक आहे की नाही ते असे तपासा

गॅस सिलेंडरपासून GST पर्यंत; 1 मे पासून होणार मोठे बदल, जाणून घ्या

जास्त फी उकळणाऱ्या खासगी शाळांवर अंकुश ठेवण्यासाठी कायद्यात बदल करणार : दीपक केसरकर

Mumbai students Aadhaar update, Aadhaar: over 53 lakh 17 thousand 608 students Aadhaar card has not been updated in Mumbai, school students aadhar update

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी