29 C
Mumbai
Friday, May 3, 2024
Homeमुंबईगौतमी पाटीलची लावणी महाराष्ट्राची नाही; डॉ. चंदनशिवे यांचा दावा

गौतमी पाटीलची लावणी महाराष्ट्राची नाही; डॉ. चंदनशिवे यांचा दावा

नृत्यांगणा आणि सोशल मीडिया स्टार गौतमी पाटीलचं नाव अल्वावधीतच महाराष्ट्रभर लोकप्रिय झाले आहे. आपल्या लावणी आणि सौंदर्याने गौतमी चाहत्यांना नेहमीच घायाळ करत असते. मात्र तिच्या प्रत्येक कार्यक्रमात काही ना काही राडा होत असतो. एकीकडून समाजातून तिच्यावर मोठ्याप्रमाणात टीका होत आहे. तर दुसरीकडे गौतमीच्या अश्लील सादरीकरणामुळे महाराष्ट्राची लोकप्रिय लोककला असलेली लोककला वादात सापडली आहे. लावणीचे पावित्र्य जपण्याची जबाबदारी आपली आहे, गौतमी पाटील सादर करत असलेली महाराष्ट्राची नाही, असे ठाम मत मुंबई विद्यापीठाच्या लोककला विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. गणेश चंदनशिवे यांनी व्यक्त केले.

लावणी म्हणजे लवण, मीठ. मीठाचे जेवणात जसे महत्त्व आहे, तसे लावणीचे महाराष्ट्रात महत्त्व आहे. महाराष्ट्राच्या लावणीला अध्यात्माची बैठक आहे. अध्यात्माची बैठक असलेली लावणी शृंगारिक कशी होत गेली, हे कळलेच नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात, भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जातीअंताच्या लढाईत महात्मा फुलेंच्या सत्यशोधकी जलसात लावणीने प्रबोधनरूपी योगदान दिलेले आहे. लावणीचे पावित्र्य जपण्याची जबाबदारी आपली आहे, गौतमी पाटील सादर करत असलेली महाराष्ट्राची नाही, असा दावा चंदनशिवे यांनी व्यक्त केला आहे. महाराष्ट्र कला सांस्कृतिक मंच, ठाणे आणि मुद्रा आर्ट अकॅडमी द्वारा आयोजित पारंपरिक लावणी शिबिराचा सांगता समारोप सोमवारी गडकरी रंगायतनच्या तालीम हॉलमध्ये झाला. त्यावेळी ते बोलत होते.

लावण्यांचे प्रकार विषद करतांना डॉ. चंदनशिवे यांनी लावण्यांनी स्वातंत्र्यचळवळीत, छत्रपती शिवरायांच्या काळात बजावलेले योगदानही नमूद केले. अनेक शाहिरांनी महाराष्ट्राच्या अस्मितेवर कवने लिहिले, लढे दिल्याचे सांगितले. माझी मैना गावाकडे राहिली… ही छक्कडही त्यांनी प्रेक्षकांच्या आग्रहाखातर सादर केली. सदानंद राणे यांनीही प्रत्येकाला नृत्य येतच असते, मात्र त्याला योग्य दिशा देण्यासाठी अशा शिबिरांची गरज असते, असे सांगितले. पत्रकार कैलास म्हापदी यांनी कला, नृत्य सारख्या शिबिरांना राजाश्रयाची गरज असल्याचे मत व्यक्त केले. यावेळी महाराष्ट्र कला सांस्कृतिक मंचच्या शैला खांडगे उपस्थितीत होत्या. सुखदा खांडगे यांनी या शिबिराला मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुखदा खांडगे यांनी केले.

हे सुद्धा वाचा: 

गौतमी पाटीलला झाली लगीनघाई!

गौतमी पाटील म्हणते, प्रेक्षक माझ्यावर; अन् इंदूरीरकर महाराजांवर प्रेम करतात

गौतमी पाटीलच्या समर्थनार्थ हभप शुभम महाराज माने; व्हिडीओप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी

Gautami Patil, Gautami Patil viral, Gautami Patil Lavani dance form is not from Maharashtra; Dr. Ganesh Chandanshive claim, Ganesh Chandanshive

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी