30 C
Mumbai
Saturday, April 27, 2024
Homeक्राईमऐनसीबीची मोठ़ी कारवाई, साढे चार कोटीचे ड्रग्स जप्त

ऐनसीबीची मोठ़ी कारवाई, साढे चार कोटीचे ड्रग्स जप्त

ऐनसीबीची मोठ़ी कारवाई, साढे चार कोटीचे ड्रग्स जप्त

ANCB’s big action, drugs worth 4.5 crore seized

नार्कोटिक्स कन्ट्रोल ब्युरोच्या अधिकाऱ्यांनी एक मोठी कारवाई केली आहे.सुमारे दोन किलो एमडी सह सुमारे साढे चार कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे.ही कारवाई एनसीबी च्या मुंबई झोनच्या अधिकाऱ्यांनी केली आहे.

एनसीबीचे झोनल डायरेक्टर अमित घावटे यांना महत्वाची अशी माहिती मिळाली होती.त्या आधारे त्यांचा तपास सुरू होता. एनसीबीच्या अनेक टीम भिवंडी ,ठाणे या परिसरात सापळा लावून बसल्या होत्या.यावेळी भिवंडी येथे दोन व्यक्ती आले असता एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी पाहिलं.मात्र, लगेच कारवाई न करता त्यांनी व्यवहार पूर्ण व्हायची वाट पाहिली.यानंतर थोड्याच वेळात आणखी एक जण आला.मग आधीच्या दोघांनी आपल्या जवळच पार्सल त्या तिसऱ्या व्यक्तीला दिल.यावेळी मग एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी लगेच कारवाई करून तिघांना ताब्यात घेतलं.

हे सुद्धा वाचा

गौतमी पाटीलची लावणी महाराष्ट्राची नाही; डॉ. चंदनशिवे यांचा दावा

मुख्यमंत्र्यांना त्यांची जागा दाखवायची वेळ आलीय; अजित पवारांचा हल्लाबोल

आधार अपडेटमध्ये मुंबईच्या विद्यार्थ्यांची पिछाडी 

ताब्यात घेण्यात आलेल्या व्यक्तीची नाव आर एस वीर ,रोहन के अशी असल्याच तपासात उघडकीस आलं. त्यांच्या कडून दोन किलो मेफेडरीन अर्थात एमडी जप्त करण्यात आलं.या दोघांच्या चौकशीत हे ड्रग्स आय जी एन अन्सारी याला देण्यासाठी आणल्याच तपासात उघड झाल्यावर एनसीबी अधिकाऱ्यांनी अन्सारी यांच्या घरी धाड टाकली.त्याला ही ताब्यात घेतलं.यावेळी अन्सारी यांच्या घरातून 36 लाख रोकड आणि 147 ग्राम सोन सापडलं.या सर्व ड्रग्स आणि वस्तू यांची किंमत सुमारे 4 कोटी 50 लाख रुपये आहे.

ANCB’s big action, drugs worth 4.5 crore seized

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी