महाराष्ट्र

कोल्हापूरकरांना जिल्हा प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा

टीम लय भारी

कोल्हापूर : राज्यात काल (४ जुलै २०२२) पासून पावसाने जोर धरला आहे. राज्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. कोल्हापुरात देखील काल पासून मुसळधार पाऊस सुरु झाला आहे. यामुळे पंचगंगेच्या पाणी पातळीत देखील वाढ झाली आहे. पंचगंगेच्या पाणी पातळीत एका रात्रीत ७ फूट इतकी वाढ झाली आहे.

पंचगंगेच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने जिल्हा प्रशासनाकडून कोल्हापूरकरांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पंचगंगा नदीची पाणी पातळी २४ फुटांच्या वर पोहोचल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. सोमवारपासून कोल्हापुरात जोरदार पाऊस सुरु आहे. यामुळे कोल्हापुरातील नद्यांच्या पाणी पातळीत देखील वाढ झाली आहे.

जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरु असल्याने जिल्ह्यातील सहा बंधारे पाण्याखाली गेले आहेत. तर जिल्ह्यातील सर्व नद्या दुथडी भरून वाहत आहेत. याआधी २०१९ आणि २०२१ मध्ये कोल्हापुरात पूर आला होता. त्यावेळी अनेक लोक बेघर देखील झाली होती. त्यामुळे एका दिवसाच्या पावसानेच जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. तर जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांना खबरदारीचा इशारा देण्यात आला आहे.

हे सुद्धा वाचा :

राज्यात पुन्हा ‘मुसळधार’चा हाहाकार?

राज्यात मुसळधार पावसाला सुरुवात

चरणमाळ घाटात ब्रेक निकामी झाल्याने बस अपघात

पूनम खडताळे

Recent Posts

भाजपा – एनडीए 400 जागांचा टप्पा पार करणार; पंतप्रधान नरेंद्र मोदी

लोकसभा निवडणुकीत एनडीए 400 जागांचा टप्पा पार करणार आणि ओडिशामध्ये डबल इंजिन सरकार बनणार, असा…

29 mins ago

भाजपाच्या राजवटीत आदिवासींवर अन्याय,महाराष्ट्रात २ लाख आदिवासींना पट्टे दिले नाही: प्रियंका गांधी

आदिवासी समाजाच्या विकासासाठी काँग्रेस पक्षाने सातत्याने काम केले आहे. पंतप्रधान इंदिराजी गांधी यांनी आदिवासी समाजाला…

43 mins ago

जुने नाशिक विभागामध्ये पाण्याची टंचाई

नासिक महानगरपालिका जुने नाशिक विभागामध्ये पाण्याची मोठ्या प्रमाणावर टंचाई (Water scarcity) असते व आहे. अर्धा…

54 mins ago

छोटा हत्ती गाडी झाली पलटी; बॉक्समधून 7 कोटी रुपये आले बाहेर

आंध्र प्रदेशात आज पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात रोकड जप्त करण्यात आली आहे. काल एनटीआर जिल्ह्यात…

1 hour ago

जुने रितीरिवाज आणि आधुनिक विज्ञान यांच्यातील संघर्षावर भाष्य करणारा ‘ लाईफ लाईन ‘

क्रिसेंडो एन्टरटेनमेंट निर्मित, ११ आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त ' लाईफ लाईन ' ( Life Line) ह्या…

1 hour ago

शांतिगिरी महाराजांमुळे महायुतीचा विजय अवघड : अभिजित पानसे

लोकसभेच्या नाशिक मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी करणाऱ्या शांतिगिरी महाराज(Shantigiri Maharaj) यांच्यामुळे शिवसेना-भाजपची डोकेदुखी वाढली असून, असे…

2 hours ago