क्राईम

Shraddha Walker murder : श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात खळबळजनक व्हिडीओ समोर

श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकऱणातील आरोपी आफताब पूनावाला याचा खळबळजनक व्हिडीओ समोर आला आहे. सीसीटीव्हीमध्ये कैद झालेल्या या व्हिडीओ फुटेजमध्ये तो निळ्या बॅगेतून काही तरी घेऊवन जाताना दिसत आहे. पोलिस या व्हिडीओची सत्यता पडताळून पाहत आहेत. हा व्हिडीओ 18 ऑक्टोबर रोजीचा आहे. पोलीस सूत्रांनी सांगितले की, 18 ऑक्टोबर रोजी आरोपी आफताब बॅग घेऊन बाहेर तीन फेऱ्या मारल्या. पोलिसांनी याबाबत आफताब श्रद्धाच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी बॅग घेऊन पाच महिन्यांनी बाहेर गेला होत, अशी शंका व्यक्त केली आहे.

आरोपी आफताबने श्रद्धा वालकर हीच्या शरीराच्या अवयवांची दिल्ली आणि आसपासच्या ठिकाणी विल्हेवाट लावण्यापूर्वी फ्रिज विकत घेतला होता. ज्यामध्ये मृतदेहाचे तुकडे ठेवण्यात आले आणि नंतर ते एक एक करून पिशवीत ठेवून फेकून दिले. पोलिसांनी सांगितले की, 18 ऑक्टोबर रोजी आफताबने मृतदेहाचे डोके, धड आणि हाताची विल्हेवाट लावली होती.
दरम्यान दिल्ली पोलिस या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी तसेच सज्जड पूरावे गोळा करण्यासाठी दिल्ली जवळील मेहरोलीच्या जंगलात पुरावे गोळा करण्यासाठी तपास करत आहेत. तसेच दिल्ली पोलिसांचे एक पथक दिल्लीच्या छतरपूर भागातील आफताबच्या फ्लॅटवर गेले होते. येथे पोलिसांनी आरोपी आणि मृत श्रदधा वालकर या दोघांचे कपडे जप्त केल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. यातील बहुतांश कपडे आफताबचे असून ते फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात येणार आहेत. हत्येच्या दिवशी आफताब आणि श्रध्दा यांनी घातलेले कपडे अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत.

तसेच दिल्ली पोलिसांचे एक पथक महाराष्ट्रातील पालघर येथे पोहोचले असून, तेथे श्रद्धाचे दोन मित्र राहुल रॉय आणि गॉडविन यांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. पोलिसांचे पथक आफताबच्या कुटुंबीयांशीही संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र कुटुंबातील एकही सदस्य सापडला नाही.

हे सुद्धा वाचा :

Anil Parab Bail : अनिल परब यांना मोठा दिलासा; रिसॉर्ट प्रकरणी अटकपूर्व जामीन मंजूर

controversial statement : राज्यपालांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर शिवसेना, मनसे आक्रमक

Koshyari’s Controversial Statement : “अशा माणसाकडून आता दिलगिरीचीही अपेक्षा नाही !”

आफताबने जबाब फिरवला
श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणातील श्रद्धा हिचा प्रियकर आरोपी आफताब याने पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर श्रद्धाची हत्या केल्याची कबुली दिली होती. तसेच त्याने श्रद्धाच्या शरिराचे 35 तुकडे देखील केल्याचे जबाबात सांगितल्याची माहिती पोलिसांनी दिली होती. मात्र आता आफताब वारंवार आपला जबाब बदलत असल्याचे देखील समोर येत आहे. आफताब याने आता श्रद्धाच्या शरिराचे 18 तुकडे केल्याचे पोलिसांना सांगितले. आफताबच्या वारंवार बदलणाऱ्या जबाबामुळे पोलिस आफताब विरोधात ठोस पुरावे जमा करत आहेत.

 

प्रदीप माळी

Recent Posts

नाशिकच्या रस्त्यांवर धावणार 50 इलेक्ट्रिक बस

केंद्र सरकारच्या नगरविकास मंत्रालयाकडून पीएम ई बस (PM E Bus) या योजनेंर्तग देशातील २० लाखांच्या…

3 mins ago

सेक्स टेप प्रकरणी प्रज्वल रेवण्णा यांच्याविरोधात ग्लोबल लूकआऊट नोटीस

जेडीएसचे नेते प्रज्वल रेवण्णा (Prajwal Revanna) यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. रेवण्णा यांच्या सेक्स टेप…

44 mins ago

नाशिकचे महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे १६ कोटीचे धनी

सलग दहा वर्षांपासून नाशिकचे खासदार राहिलेले हेमंत गोडसे (Hemant Godse) यांच्या संपुर्ण कुटुंबियांच्या नावे एकूण…

14 hours ago

दिंडोरी लोकसभेच्या उमेदवाराची संपत्ती पाच वर्षात दुप्पट

दिंडोरी लोकसभा (Dindori Lok Sabha) मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवारांच्या संपत्तीत  (wealth)…

14 hours ago

डाॅ. पवार, गाेडसेंचा विजय निशि्चत : शिंदे

४० अंशाच्या आसपास तापमानाचा पारा असतानाही कार्यकर्त्यांचा अमाप उत्साह पाहता महायुतीच्या दाेन्ही उमेदवारांचा विजय जवळजवळ…

14 hours ago

शिवसेना भाजप महायुतीचा शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल

लोकसभा निवडणुकीसाठी गुरुवारी शिवसेना-भाजप महायुतीतर्फे (BJP alliance ) दिंडोरी मतदार संघासाठी डॉ. भारती पवार आणि…

15 hours ago