क्राईम

मोठी बातमी : परदेशी महिलेसोबत खोडसाळपणा करणाऱ्याला दोन वर्षाचा तुरूंगवास !

मुंबईत पर्यटनासाठी आलेल्या महिलेचा वियनभंग केल्याप्रकरणी न्यायालयाने आरोपीला न्यायालयाने दोन वर्षे तुरुंगवास आणि ५००० रुपये दंड किंवा ३ महिने कैद अशी शिक्षा सुनावली आहे. पर्यटक महिला पेरु देशाची नागरिक असून ती ज्या गेस्ट हाऊसमध्ये राहत होती. त्या गेस्ट हाऊसच्या मॅनेजरने सेल्फी काढण्याच्या बहाण्याने तिचा विनयभंग केला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला 24 तासांत अटक करुन दोषारोपपत्र दाखल केले. पोलिसांनी जलद गतीने तपास केल्यामुळे अवघ्या दोन महिन्यांमध्ये या खटल्याचा निकाल लागला.

या बाबत अधिक माहिती अशी की, पेरु देशातील 38 वर्षीय महिला पर्यटनासाठी मुंबईत आली होती. ही महिला भायखळा (पू) येथील वेलकम गेस्ट हाऊसमध्ये वास्तव्यास होती. या गेस्ट हाऊसमध्ये मॅनेजर पदावर काम करणाऱ्या रियाज अहमद राजू अहमद (वय १९ वर्षे रा. वेलकम गेस्ट हाउस, मुळ रा. उत्तरप्रदेश) याने २६ मार्च रोजी रात्रीच्यावेळी महिलेला मदत करण्याच्या बहाण्याने वारंवार तिच्या खोलीत प्रवेश केला. यावेळी आरोपी तरुणाने सेल्फी काढण्याचे नाटक करत महिलेचा विनयभंग केला.

त्यानंतर महिलेने भायखळा पोलिसांत धाव घेतली. मात्र महिलेला स्पॅनिश भाषेव्यतिरीक्त इतर कोणतीच भाषा येत नव्हती. त्यामुळे पोलिसांनी गेस्ट हाऊसमधील स्पॅनिश भाषा येणाऱ्या विदेशी नागरिकाची आणि गुगल ट्रान्सलेटरची मदत घेऊन महिलेशी संवाद साधला. त्यानंतर पोलिसांनी गेस्ट हाऊसच्या मॅनेजरवर भादवी कलम 354 अंतर्गत गु्न्हा दाखल करत त्याचा शोध सुरु केला. हा आरोपी मुळचा उत्तर प्रदेशातील राहणाऱा असून तो पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी त्याला अटक केली. पीडित महिलेला पर्यटनासाठी इतर ठिकाणी जायचे असल्याने पोलिसांनी अतिशय वेगाने तपास करत 24 तासांच्या आत आरोपीवर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. तसेच पीडित महिलेची आणि विदेशी साक्षीदाराची साक्ष साक्ष देखील न्यायालयात घेण्यात आली.

हे सुद्धा वाचा

रोहित पवार यांनी अमित शाह यांच्या मुलाची अहमदाबादमध्ये घेतली भेट

‘एसटी’ची 30 रुपयांत चहा-नाश्ता स्कीम अजूनही सुरू; अधिकृत MSRTC थांबे, ढाबे, हॉटेल्सना बंधनकारक

कर्नाटकात सिद्धरामय्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार; 24 मंत्र्यांची सविस्तर माहिती

न्यायालयात या दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर सर्व न्यायालयनी प्रक्रीया पूर्ण झाल्यानंतर 26 मार्च रोजी न्यायालयाने आरोपी आरोपी रियाज अहमद राजू अहमद याला 2 वर्षे कैद आणि 5000 रुपये दंड किंवा 3 महिने कैद अशी शिक्षा सुनावली आहे.

 

 

टीम लय भारी

Recent Posts

नाशिकरोडमधून 2 गावठी कट्ट्यांसह दोघांना अटक!

उपनगर पोलिसांच्या गुन्हेशोध पथकाला दोघे संशयित दसक गावानजिकच्या महालक्ष्मीनगरमध्ये गावठी कट्टे विक्रीसाठी येणार असल्याची खबर…

5 hours ago

गंगापूर धरणाची दोन कोटी लिटरने वाढली पाणी क्षमता

गंगापूर धरणालगत गंगावऱ्हे गांव येथे गेल्या १४ दिवसांपासून सुरू असलेल्या गाळ उपसा मोहिमेमुळे गंगापूर धरणाची…

6 hours ago

विरोधकांचा मोदी सरकारविरोधात ‘व्होट जिहाद’!

दोन टप्प्यातील निवडणुकांमध्ये अहंकारी आघाडीचा संसार बुडाल्याचे स्पष्ट झाल्याने निराश झालेले इंडी आघाडीचे नेते आता…

6 hours ago

राहुल गांधीची चायनीज तर मोदीजींची भारतीय गॅरंटी अमित शहा

या निवडणुकीत एक गट राम मंदिराला विरोध करणाऱ्यांचा आहे, तर दुसरा गट राम मंदिर बनविणारा…

7 hours ago

कान्स फिल्म फेस्टिव्हलसाठी ‘या’ तीन मराठी चित्रपटांची निवड

फ्रान्समध्ये येत्या 14 मे ते 22 मे 2024 दरम्यान कान्स फिल्म फेस्टिव्हल संपन्न होणार आहे.…

7 hours ago

नाशिक मनपाच्या बांधकाम विभागाचा कानाडोळा,एम एन जि एल गॅस मुळे नागरिकांना होतोय त्रास

गेल्या अनेक वर्षांपासून शहरातील अनेक भागात एम एन जि एल तर्फे गॅस (MNGL Gas) वाहिनी…

11 hours ago