29 C
Mumbai
Saturday, April 27, 2024
Homeराजकीयकर्नाटकात सिद्धरामय्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार; 24 मंत्र्यांची सविस्तर माहिती

कर्नाटकात सिद्धरामय्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार; 24 मंत्र्यांची सविस्तर माहिती

कर्नाटकात आज सिद्धरमय्या सरकारचा पहिला मंत्रिमडळ विस्तार करण्यात आला. गेल्या आठवड्यात मुख्यमंत्रीपदी सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्रिपदी डी. के. शिवकुमार यांच्यासह 10 मंत्र्यांचा शपथविधी पार पडला होता. त्यानतंर आज 24 आमदारांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली.

कर्नाटकात भाजपला मोठ्या फरकाने पराभूत केल्यानंतर काँग्रेसमध्ये जोशाचे वातावरण आहे. कर्नाटकात अभूतपर्व यश मिळाल्यानंतर पक्षांतर्गत गटबाजी थांबविण्यात देखील काँग्रेसला यश आले. त्यानंतर आजच्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये जातीय समिकरणे साधत भौगोलिक संमिकरणे देखील काँग्रेसने साधली आहेत. काँग्रेसने आज मंत्रिपदाची शपथ दिलेल्या आमदारांमध्ये सहा लिंगायत, 4 वोक्कलिगा, 3 अनुसूचित जाती 2 अनुसूचित जमाती आणि 5 कुरुबा आणि एक राजू, मराठा तसेच मोगवीरा जातीतल आहेत. कर्नाटकातील भौगोलिक समिकरणे साधताना म्हैसूर आणि कल्याण कर्नाटकातू प्रत्येकी सात आमदार तर कित्तूरमधून सहा आणि मध्य कर्नाटकातून 2 आमदारांना मंत्रिपदाची शपथ दिली आहे.

आज झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये माजी मंत्री आर. गुंडूराव यांचा मुलगा दिनेश गुंडूराव आणि माजी मंत्री एस. बगारप्पा यांचा मुलगा मधु बंगारप्पा यांचा देखील सामवेश असून या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये माजी मंत्री आणि काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे.

यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ 

एक. के. पाटील

गदग मतदारसंघातून निवडून आलेले ६९ वर्षीय एच. के पाटील हे काँग्रेसचे निष्ठावंत मानले जातात. ते महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी देखील राहिले आहेत. त्यांनी कर्नाटकचे जलसंपदा, कृषी, कायदा, ग्रामविकास, पंचायतराज आणि संसदीय कामकाज मंत्री म्हणून यापूर्वी काम पाहिलेले आहे. त्यांचे वडील देखील याच मतदार संघातून आमदार होते.

कृष्णा बायरे गौडा

काँग्रेसचे दिग्गज नेते अशी ओळख असलेले 50 वर्षीय कृष्णा बायरे गौडा हे एकुण पाच वेळा आमदार राहिले आहेत. कोलार जिल्ह्यातील वेमगलमधून दोनवेळा आणि बंगळूरुमधील ब्यातनारायणपूरा येथून तीनवेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. या पूर्वी त्यांनी ग्राम विकास पंचायत राज, कृषी, कायदा, संसदीय कामकाज मंत्रीपदाचा कारभार सांभाळला आहे. कृष्णा बायरे गौडा हे उच्चशिक्षित असून अमेरिकेतून त्यांनी शिक्षण घेतले आहे.

एन. चेलुवरायस्वामी

एन. चेलुवरायस्वामी हे नागमंगला विधानसभा क्षेत्रातून 4 वेळा आमदार आहेत. 2018 जनता दल (सेक्युलर) अर्थात जेडीएसमधून काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. मात्र त्यावेळी त्यांचा पराभव झाला होता. 2013 मध्ये त्यांच्या मतदार संघातून त्यांना तिकीट न दिल्यामुळे त्यांनी जेडीएसला रामराम केला होता. 2009 मध्ये ते लोकसभेचे खासदार म्हणून देखील निवडून आले होते.

के. व्यंकटेश 

पुर्वाश्रमीचे जेडीएसचे नेते असलेले 75 वर्षीय के. व्यंकटेश पेरियापटना या मतदारसंघातून पाचवेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. काँग्रेसमध्ये आल्यानंतर 2013 साली ते आमदार म्हणून निवडून आले होते. मात्र 2018 च्या निवडणूकीत जेडीएसच्या उमेदवाराने त्यांना पराभूत केले होते. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा ते आमदारकीची निवडणुक जिंकले आहेत.

डॉ. एच. सी. महादेवप्पा

70 वर्षीय आमदार डॉ. एच. सी. महादेवप्पा हे एमबीबीएस डॉक्टर आहेत. अनुसूचित जाती समुहाशी ते संबंधीत असून ते पुर्वी जेडीएसमध्ये होते. मात्र त्यानंतर त्यांनी काँग्रेसध्ये प्रवेश केला. मागच्या सिद्धरमय्या सरकारमध्ये ते सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री होते.

हे सुद्धा वाचा

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या स्मरणार्थ राज्यातील 50 गावात आता सामाजिक सभागृह

पत्रकार रफिक मुल्ला यांचा वाढदिवसाच्या पूर्वसंध्येलाच पुनर्जन्म !

बारावी परीक्षेत पावने दोन लाख विद्यार्थ्यांना 35 ते 45 टक्के गुण; सव्वा लाख विद्यार्थी डिस्टींगशन मध्ये

ईश्वर खांद्रे

सीमा भागातील बिदरमधील भालकी मतदार संघातून ईश्वर खांद्रे हे चार वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. त्यांचे वडील देखील कर्नाटक सरकारमध्ये मंत्री होते. 61 वर्षीय ईश्वर खांद्रे हे इंजिनियर आहेत.

दिनेश गुंडू राव

कर्नाटकचे माजी प्रदेशाध्यक्ष दिनेश गुंडू राव सलग सहावेळा निवडून आले असून काँग्रेसचे दिवंगत नेते आर. गुंडू राव यांचे ते पुत्र आहेत. आर. गुंडू राव हे कर्नाटकचे मुख्यमंत्री देखील होते. सन 2015 ते 2016 मध्ये अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री होते.

कायथसंद्र एन. राजन्ना 

७२ वर्षीय कायथासंद्र एन. राजन्ना हे अनुसूचित जमाती समुदायातील नेते आहेत. ते एक वकील तसेच कृषीतज्ज्ञ आहेत. 2013 मध्ये मधुगिरी विधानसभा मतदारसंघातून ते एकदा आमदार म्हणून निवडून आले होते.

शरणबसप्पा दर्शनापूर

शरणबसप्पा दर्शनापूर हे यादगीर जिल्ह्यातील शहापूर मतदारसंघातून पाच वेळा आमदार आहेत. ६२ वर्षीय नेता सिव्हिल इंजिनीअरिंगमध्ये बीई पदवीधर आहेत. त्यांचे वडील बापूगौडा दर्शनापूर शहापूरचे तीन वेळा आमदार होते आणि कर्नाटक सरकारमध्ये मंत्रीही होते.

शिवानंद पाटील

बसवना बागेवाडीचे चार वेळा आमदार असलेले शिवानंद पाटील एचडी कुमारस्वामी यांच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकारमध्ये 2018 ते 2019 पर्यंत आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री होते.

रामाप्पा बाळाप्पा तिम्मापूर

रामाप्पा बाळाप्पा तिम्मापूर हे मुधोळचे तीन वेळा आमदार आहेत. 2023 मध्ये त्यांनी याच मतदारसंघातून पाच वेळा आमदार राहिलेले विद्यमान मंत्री गोविंद करजोल यांचा पराभव करून विजय मिळवला. तिम्मापूर हे कर्नाटकचे साखर, बंदर आणि अंतर्देशीय वाहतूक मंत्री होते.

एस. एस. मल्लिकार्जुन

एस. एस. मल्लिकार्जुन हे शिक्षणतज्ञ असून त्यांनी दावणगेरे उत्तरमधून निवडणूक जिंकली. काँग्रेसचे दिग्गज नेते शामनुर शिवशंकरप्पा, दावणगेरे दक्षिणचे ९२ वर्षीय आमदार यांचे ते पुत्र आहेत. ते प्रतिष्ठित एसएस इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अँड रिसर्च सेंटर, दावणगेरेचे अध्यक्ष देखील आहेत.

शिवराज संगाप्पा तंगडगी

५२ वर्षीय आमदार शिवराज संगप्पा तंगडगी हे कोप्पल जिल्ह्यातील कनकगिरी मतदारसंघातून तीन वेळा आमदार आहेत.

डॉ. शरणप्रकाश पाटील

डॉ. शरणप्रकाश पाटील हे व्यवसायाने डॉक्टर आहेत आणि कलबुर्गी जिल्ह्यातील सेदाम मतदारसंघातून चार वेळा आमदार आहेत.

मंकळ एस. वैद्य

मंकल एस वैद्य हे उत्तरा कन्नडच्या किनारी जिल्ह्यातील भटकळ-होन्नावर मतदारसंघातून दोनदा निवडून आले होते.

लक्ष्मी हेब्बाळकर

लक्ष्मी हेब्बाळकर या बेळगावी ग्रामीणच्या ४८ वर्षीय आमदार आहेत. त्या मतदारसंघातून दुसऱ्यांदा विजयी झाल्या. त्या उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांच्या जवळच्या मानल्या जातात.

रहिम खान

बीदर उत्तर मतदारसंघातील 57 वर्षीय आमदार रहीम खान हे एचडी कुमारस्वामी यांच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकारमध्ये युवा सक्षमीकरण आणि क्रीडा मंत्री होते.

डी. सुधाकर

डी. सुधाकर चित्रदुर्ग जिल्ह्यातील हिरीयुर येथून तीन वेळा आमदार आहेत.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी