30 C
Mumbai
Friday, April 26, 2024
Homeक्रिकेटरोहित पवार यांनी अमित शाह यांच्या मुलाची अहमदाबादमध्ये घेतली भेट

रोहित पवार यांनी अमित शाह यांच्या मुलाची अहमदाबादमध्ये घेतली भेट

चार महिन्यांपूर्वीही रोहित पवार यांनी जय शाह यांची भेट घेतली होती. त्यावेळीही त्यांनी जय शहा यांचे अगदी तोंडभरून कौतुक केले होते.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे युवा नेते आणि शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी अमित शाह यांच्या मुलाची अहमदाबादमध्ये शनिवारी भेट घेतली. चार महिन्यांपूर्वीही त्यांनी जय शाह यांची भेट घेतली होती. त्यावेळीही रोहित पवार यांनी जय शहा यांचे अगदी तोंडभरून कौतुक केले होते.

रोहित पवार यांनी स्वत: ट्विट करून या भेटीची माहिती दिली आहे. अर्थात यामागे कोणतेही राजकीय कारण नाही, असे सांगितले जात आहे. गेले काही दिवस रोहित पवार हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जाहीरपणे कौतुक करत आहेत. मोदींच्या मर्जीतले उद्योगपती गौतम अदानी यांच्या बचावासाठीही पवार पुढे सरसावले होते.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) सर्व पदाधिकारी क्रिकेटसाठी अत्यंत चांगले काम करत आहेत, अशा शब्दांत रोहित पवार यांनी जय शाह यांचे आजही कौतुक केले आहे. पवार हे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे (MCA) अध्यक्ष आहेत. त्यांनी ट्विट केले, की “आज अहमदाबादमध्ये ‘बीसीसीआय’ची विशेष बैठक घेण्यात आली. यामध्ये क्रिकेटसंदर्भात सविस्तर चर्चा झाली. यावेळी ‘एमसीए’च्यावतीने राज्यात 15 ते 29 जून दरम्यान होणाऱ्या महाराष्ट्र क्रिकेट लीग (MPL) स्पर्धेचे निमंत्रण BCCIचे अध्यक्ष रॉजर बिन्नी, सचिव जय शाह,  उपाध्यक्ष राजीव शुक्ला आणि ‘आयपीएल’चे चेअरमन अरुण धुमल यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांना दिले. या सर्वांनी ‘एमसीए’च्या सुरु असलेल्या कामाचे कौतुक करत ‘एमपीएल’ला मनापासून सहकार्य करु, असे सांगितले. त्यांच्या या भूमिकेचे MCAचा अध्यक्ष म्हणून मी स्वागत करतो!”

याआधी चार महिन्यांपूर्वी रोहित पवार यांनी जय शाह यांची भेट घेतली होती तेव्हा त्यांच्यासोबत राज्यातील भाजपचे नेते आणि MCAचे खजिनदार आशिष शेलार हेही होते. ‘बीसीसीआय’तर्फे महिला IPL संघासाठीचा लिलाव चांगल्या पद्धतीने झाल्याने त्यावेळी पवार यांनी सर्वांचे अभिनंदन केले होते. महिलांना ‘आयपीएल’सारखे मोठे व्यासपीठ उपलब्ध झाल्याचा आनंद आहे, असेही कौतुक त्यांनी त्यावेळी केले होते.

मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) अध्यक्षपदी बिनविरोध निवड झालेले कर्जत-जामखेड विधानसभेचे आमदार रोहित पवार आजोबा शरद पवार यांच्यासह. (फोटो क्रेडिट : न्यूजबाईट/गुगल)

मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) अध्यक्षपदी बिनविरोध निवड झालेले कर्जत-जामखेड विधानसभेचे आमदार रोहित पवार आजोबा शरद पवार यांच्यासह. (फोटो क्रेडिट : न्यूजबाईट/गुगल)बारामतीच्या राजेंद्र पवार आणि सुनंदा पवार यांचे पुत्र असलेले रोहित पवार हे अप्पासाहेब पवार आणि भारताचे माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांचे नातू आहेत. बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानमधून त्यांनी शालेय शिक्षण पूर्ण केले आहे. त्यानंतर त्यांनी मुंबई विद्यापीठातून “बॅचलर ऑफ मॅनेजमेंट” मध्ये पदवी प्राप्त केली. गेल्या विधानसभा निवडणुकीत अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातून भाजप नेते राम शिंदे यांचा पराभव करून रोहित पवार आमदार झाले आहेत. राजकीय पदावर असलेले पवार घराण्यातील ते चौथ्या पिढीतील प्रतिनिधी आहेत.

 

हे सुद्धा वाचा :

शरद पवार यांनी लगेच भाकरी फिरविली, लोकलेखा समितीच्या अध्यक्षपदासाठी रोहित पवार यांना मिळ्णार संधी

गेली नऊ वर्षे फक्त मन की बात, काम की बात काहीच नाही; संजय राऊतांची मोदींवर सडकून टीका

शरद पवारांची फौज उतरली क्रिकेटच्या मैदानात!

रोहित पवार हे उद्योगपती असून बारामती ऍग्रो लि. या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. इंडियन शुगर मिल्स असोसिएशन (ISMA) चे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिलेले आहे. आपल्या राजकारणाची सुरुवात रोहित पवार यांनी जिल्हा परिषद सदस्य म्हणून केली. 2017 साली त्यांनी बारामती तालुक्यातील शिर्सुफळ – गुणवडी गणातून जिल्हा परिषद निवडणूक जिंकली होती. त्यांनतर ते राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात सक्रिय झाले.

Rohit Pawar met Jay Shah, Pawar met Jay Shah in Ahmedabad, Amit Shahs Son, MCA MPL Matches, Sharad Pawars GrandSon

 

 

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी