क्राईम

कळंबोलीत ट्रान्सपोर्ट व्यापाऱ्याची डोक्यात, मानेवर वार करुन हत्या

कळंबोली येथे एका ट्रान्सपोर्ट व्यापाऱ्यांची भल्या पहाटे पाच वाजता हत्या करण्यात आली आहे. हत्येच कारण अजून स्पष्ठ झालेलं नाही. या खुनाच्या तपासासाठी पाच पथक तयार करण्यात आली आहेत. मयत व्यक्तीच नाव जसपाल सिंग, वय 48 वर्ष, असे आहे. त्यांचा कळंबोली येथे ट्रान्सपोर्टचा व्यवसाय असून ते कळंबोली तच सेक्टर 4 येथील साईनगर सोसायटी मध्ये राहतात.

आज (दि. 8) रोजी पहाटे पाच वाजता ते आपल्या कुत्र्याला फिरायला गेले होते. त्याच्या घराजवळील सेक्टर 6 मधील सिडको गार्डन येथे गेले होते. यावेळी एक व्यक्ती तिथे आला आणि त्याने स्वतःकडील धारधार शस्त्राने जसपाल याच्यावर अनेक वर केले. मानेवर , छातीवर, डोक्यावर हे वार केले. या हल्ल्यात जसपाल जागीच कोसळले.त्यांना जवळच्या एमजीएम हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. यावेळी डॉक्टरांनी ऍडमिट करण्यापूर्वीच मृत्यू झाल्याच घोषित केलं.

या घटना स्थळी क्राईमचे अतिरिक्त आयुक्त दीपक साकोरे , परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त पंकज ढहाने,क्राईमचे पोलीस उपायुक्त अमित काळे यांनी भेट दिली.या घटनेचा तपास कळंबोली पोलीस स्टेशनचे अधिकारी करत आहेत.त्याच प्रमाणे क्राईम ब्रांचचे अधिकारी समांतर तपास करत आहेत.या घटनेच्या तपासासाठी पाच टीम तयार करण्यात आल्या आहेत.

 हे सुद्धा वाचा

मणिपूरमध्ये अडकलेले महाराष्ट्रातील विद्यार्थी थोड्याच वेळात मुंबईत पोहचणार

साई भक्तांसाठी मोठी बातमी; साईबाबांच्या शिर्डीचा कायापालट होणार!

IPS महेश पाटील आणि सुनिल कडासने यांची बदली  

या घटनेने कलंबोळी येथील ट्रान्सपोर्ट व्यापाऱ्यांत खळबळ माजली आहे. घटना आज पहाटे घडली आहे. मात्र, खुना मागचं कारण अजून स्पष्ठ झालेलं नाही. याबाबत जसपाल यांचा मुलगा बुटासिंग यांच्या तक्रारी वरून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

सुधाकर काश्यप

Recent Posts

नाशिकचे महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे १६ कोटीचे धनी

सलग दहा वर्षांपासून नाशिकचे खासदार राहिलेले हेमंत गोडसे (Hemant Godse) यांच्या संपुर्ण कुटुंबियांच्या नावे एकूण…

7 hours ago

दिंडोरी लोकसभेच्या उमेदवाराची संपत्ती पाच वर्षात दुप्पट

दिंडोरी लोकसभा (Dindori Lok Sabha) मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवारांच्या संपत्तीत  (wealth)…

8 hours ago

डाॅ. पवार, गाेडसेंचा विजय निशि्चत : शिंदे

४० अंशाच्या आसपास तापमानाचा पारा असतानाही कार्यकर्त्यांचा अमाप उत्साह पाहता महायुतीच्या दाेन्ही उमेदवारांचा विजय जवळजवळ…

8 hours ago

शिवसेना भाजप महायुतीचा शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल

लोकसभा निवडणुकीसाठी गुरुवारी शिवसेना-भाजप महायुतीतर्फे (BJP alliance ) दिंडोरी मतदार संघासाठी डॉ. भारती पवार आणि…

8 hours ago

शिवसेनेची १५ जागा पदरी पाडून सरशी

लोकसभेच्या राज्यातील शेवटच्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज दाखल करण्यास जेमतेम २ दिवसांचा कालावधी उरला असताना ठाणे…

14 hours ago

अक्रोड खाण्याचे फायदे

अक्रोड हा अत्यंत पौष्टिक असा सुकामेवा असून यामध्ये हेल्दी फॅट, प्रोटिन्स, फायबर, मिनरल्स आणि व्हिटॅमिन्सचे…

15 hours ago