क्राईम

२०० कोटीच्या केबीसी घोटाळ्याचा मास्टरमाईंड भाऊसाहेब चव्हाणची ८४ कोटींची मालमत्ता जप्त

भाऊसाहेब चव्हाणने केबीसी मल्टीट्रेड प्रायव्हेट लिमिटेड आणि केबीसी क्लब अँड रिसॉर्ट्स प्रायव्हेट या कंपन्यांची स्थापना केली होती. पत्नी आरती व निकटच्या नातेवाईकांच्या मदतीने त्याने विविध साखळी योजनांद्वारे गुंतवणूकदारांना करोडपती बनविण्याचे स्वप्न दाखविले. ठिकठिकाणी दलाल नेमून, भव्यदिव्य मेळाव्यांचे आयोजन करत ‘केबीसी’ने सर्वसामान्यांना जाळ्यात ओढण्याचे काम केले. ईडीच्या तपासात संशयितांनी कट रचल्याचे उघड झाले आहे.गुंतवणुकीवर आकर्षक परताव्याचे अमिष दाखवत केबीसी घोटाळ्यात तब्बल २०० कोटींहून अधिकची फसवणूक झाली. संशयितांनी गुंतवणुकीसाठी दलालांना विविध प्रकारचा प्रोत्साहनपर भत्ता, पुरस्कार, बक्षिसे आणि भेटवस्तूंच्या आश्वासने देत केबीसी मल्टीट्रेड आणि केबीसी क्लब आणि रिसॉर्ट्स कंपनीतर्फे विविध योजनांतर्गत शुल्क घेऊन लोकांना सभासदत्व दिले.(Rs 200 crore KBC scam mastermind Bhausaheb Chavan’s assets worth Rs 84 crore seized )

हजारो गुंतवणूकदारांना २०० कोटींहून अधिकचा गंडा घालणाऱ्या केबीसी घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार भाऊसाहेब चव्हाण, त्याची पत्नी आरती यांसह अन्य संशयितांची ८४.२४ कोटींची बेनामी, स्थावर व जंगम मालमत्ता सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) जप्त केली आहे. आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्यान्वये (पीएमएलए) ही कारवाई करण्यात आली.अडीच वर्षांत तिप्पट परतावा देण्याचे आमिष दाखवत ‘केबीसी’ कंपनीने नाशिकसह राज्यातील हजारो गुंतवणूकदारांची तब्बल २०० कोटींहून अधिक रकमेला फसवणूक केली. हा घोटाळा २०१४ मध्ये उघड झाला होता. राज्यातील वेगवेगळ्या भागात केबीसी विरोधात गुन्हे दाखल झाले. दोन वर्ष परदेशात फरार झालेल्या भाऊसाहेब आणि त्याची पत्नी आरती चव्हाण यांना २०१६ मध्ये पोलिसांनी अटक केली होती.
नाशिक, परभणीसह राज्यातील वेगवेगळ्या भागात दाखल गुन्ह्यांचा सक्तवसुली संचालनालय तपास करत आहे. त्या अंतर्गत आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्यान्वये संशयितांची नाशिक, ठाणे, सिंधुदुर्ग, पालीसह महाराष्ट्राच्या इतर भागातील आणि राजस्थानमधील मालमत्ता तात्पुरती जप्त करण्यात आल्याचे ईडीने म्हटले आहे. यामध्ये हिऱ्याचे दागिने, सोने, डिमॅट खाती, टपाल विभागातील बचत खाती, बँक खात्यातील शिल्लक रकमेचा समावेश आहे.

या घोटाळ्याचे प्रमुख सूत्रधार कारागृहात असताना ईडीने त्यांचे जबाब नोंदवले होते. त्यातून संशयितांनी केबीसी मल्टीट्रेड कंपनीचा प्रवर्तक चव्हाण दाम्पत्यासह अन्य सहआरोपींनी सदस्यत्व शुल्काचा वापर स्थावर मालमत्ता, सोन्याचे दागिने, समभागातील गुंतवणूक आदींमध्ये केल्याचे निष्पन्न झाले. ईडीच्या तपासात संशयितांनी कट रचल्याचे उघड झाले. सर्वांना अधिक सभासद नोंदणी करणे बंधनकारक होते, कारण गोळा केलेल्या रकमेचा एक भाग त्रिकोणाच्या शीर्षस्थानी असलेल्या सदस्यांमध्ये वितरित केला जातो असे सांगितले गेले. कंपनीचा कोणताही मूळ व्यवसाय नसतानाही सभासदांना असे आमिष दाखवून गुंतवणूक करण्यास प्रोत्साहन दिले गेले, असे ईडीने म्हटले आहे.

टीम लय भारी

Recent Posts

अदानी-अंबानीने काँग्रेसला पैसे दिल्याचे मोदींचे विधान बेजबाबदारपणाचे; अदानी अंबानीची चौकशी करा सत्य बाहेर येईल: डॉ. भालचंद्र मुणगेकर

अदानी-अंबानी कडून काँग्रेस पक्षाला टेम्पो भरून पैसे मिळाल्यानेच राहुल गांधी आता त्यांना शिव्या देत नाहीत…

46 mins ago

बडगुजर यांच्यावरील कारवाईविरोधात महाविकास आघाडीचे नेते आक्रमक

लोकसभा निवडणुकीच्या प्रचार सुरू असताना शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर (Badgujar )यांना बजाविण्यात आलेली…

56 mins ago

श्रीरामाचं मदीर, ३७० हे ठीक, पण शेतकरी मातीत जातोय त्याचं काय ?

लोकसभा निवडणुकीचा तिसरा टप्पा लवकरच होवू घातला ( Elections 2024:In Ahmednagar, Farmers Unhappy With BJP…

3 hours ago

अक्षय तृतीयेनिमित्त बाजारात होणार कोट्यवधीची उलाढाल

साडेतीन मुहूर्तपैकी एक असणाऱ्या अक्षयतृतीयेनिमित्त (Akshaya Tritiya) नाशिक शहर आणि जिल्हयात कोट्यवधींची आर्थिक उलाढाल (Crores…

4 hours ago

सीताफळ खा स्वस्थ रहा! सीताफळ खाण्याचे फायदे

अँटी-ऑक्सिडेंट गुणधर्मांनी समृद्ध असणाऱ्या सीताफळाची (custard apple) चव फार कमी लोकांना आवडते, पण या फळात…

5 hours ago

सेवा निवृत्त पोलिस अधिकाऱ्याला सुने कडुन दहा कोटी रुपयांची खंडणी मागणी

नातू सम्राटला भेटायचे असेल किंवा सम्राटला ताब्यात ठेवायचे असेल तर नवी मुंबई मध्ये जॅग्वार गाडी,…

5 hours ago