क्राईम

माता न तू वैरिणी: प्रियकराच्या मदतीने निर्दयी मातेने घेतला लेकराचा जीव

महाराष्ट्राच्या सांगली जिल्ह्यातून माता न तू वैरिणी याचा खरा प्रत्यय समोर आला आहे. अनैतिक प्रेमसंबंधात अडथळा ठरणाऱ्या एका सहा वर्षाच्या चिमुकल्याची त्याच्या आईनेच हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकिस आली आहे. आरोपी महिलेने आधी चिमुकल्याचं अपहरण झाल्याचा बनाव केला. नंतर प्रियकराच्या मदतीने मुलाची ह्त्या करून मृतदेह विहिरीत फेकून दिले. सदर प्रकरणानंतर परिसरात खळबळ उडाली असून या निर्दयी कृत्याबाबत संताप व्यक्त केला जात आहे.

प्रेम करत असतांना अनेकदा काहींना नात्याचाही विसर पडतो. त्यामध्ये काही नाती जिवावर देखील उठतात. असाच एक धक्कादायक प्रकार सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील लेंगरे येथे उघडकीस आला आहे. निर्दयी मातेने अनैतिक प्रेमसंबंधात अडथळा ठरणाऱ्या सहा वर्षाच्या चिमुकल्याचा प्रियकराच्या मदतीने खून केल्याचा खळबळजनक घटना घडली आहे. सदर प्रकारानंतर विटा पोलिसांनी ज्योती प्रकाश लोंढे (वय 28 वर्षे, रा. लेंगरे) आणि तिचा प्रियकर रुपेश नामदेव घाडगे (वय 25 वर्षे, रा. जोंधळखिंडी, ता. खानापूर) या दोघांना अटक केली असून त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

ज्योती लोंढे या विवाहितेचे आणि रूपेश घाडगे यांच्यात प्रेमसंबंध असल्याचे उघड झाले आहे. दोघांचे गेल्या काही वर्षापासून अनैतिक प्रेमसंबंध आहेत. सहा वर्षांचा शौर्य हा प्रेमात अडथळा ठरत होता. दोघांना लग्न करायचे होते म्हणून त्याला दूर करायचे असल्याने त्यांनी अडथळा दूर करतांना त्याचा जीव घेतल्याचे समोर आले आहे. खरंतर काही दिवसांपूर्वी संशयित आरोपी यांनी रात्रीच्या वेळेला मुलाला एका विहिरीत टाकून दिले होते. त्यानंतर मुलाचे अपहरण झाल्याचा बनाव रचला होता. त्यानंतर पोलिसांत देखील माहिती दिली होती. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला होता. अशातच विहीरीतील पाण्यावर तरंगतांना एक लहान मुलाचा मृतदेह आढळून आला आणि त्यानंतर तपास करत असतांना धक्कादायक प्रकार समोर आला. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून विटा पोलिस अधिकचा तपास करत आहे.

हे सुद्धा वाचा : 

डीजेच्या तीव्र आवाजामुळे कोमात गेलेल्या वयस्कर शिक्षकाचा मृत्यू

कळंबोलीत ट्रान्सपोर्ट व्यापाऱ्याची डोक्यात, मानेवर वार करुन हत्या

पाकिस्तान हेरगिरी प्रकरण: DRDO प्रदीप कुरुलकरांची RAW कडून चौकशी!

crime news marathi, Sangli mother took the life of a 6-year-old boy with the help of her boyfriend

Team Lay Bhari

Recent Posts

शिवसेनेची १५ जागा पदरी पाडून सरशी

लोकसभेच्या राज्यातील शेवटच्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज दाखल करण्यास जेमतेम २ दिवसांचा कालावधी उरला असताना ठाणे…

4 hours ago

अक्रोड खाण्याचे फायदे

अक्रोड हा अत्यंत पौष्टिक असा सुकामेवा असून यामध्ये हेल्दी फॅट, प्रोटिन्स, फायबर, मिनरल्स आणि व्हिटॅमिन्सचे…

5 hours ago

ठाकरे गटाच्या जाहिरातीत पॉर्न स्टारचा वापर’ भाजपच्या आरोपाने खळबळ

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. त्यातच आता भाजपने एक…

6 hours ago

आरटीई अर्ज भरण्यासाठी १० मे पर्यंत मुदतवाढ

शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) (RTE) २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशाकरिता ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी प्राथमिक शिक्षण…

7 hours ago

नाशिक येथे एमएचटी-सीईटी (पीसीबी) ग्रुपची परीक्षा पार

एमएचटी-सीईटी परीक्षेतील भौतिकशास्‍त्र, रसायनशास्‍त्र आणि जीवशास्‍त्र (पीसीबी) (MHT-CET (PCB)) ग्रुपची परीक्षा (exam) पार पडली आहे.…

7 hours ago

गंगापूर धरणात दूषित पाणी; नाशिककरांच्या आरोग्यास धोका

गंगापूर धरण (Gangapur dam) हे नाशिक शहराला पाणीपुरवठा करणारे प्रमुख धरण आहे. या धरणाद्वारेच होणारा…

8 hours ago