क्राईम

उत्तरप्रदेशच्या 3 चोरट्यांनी 19 वर्षीय तरुणाची केली निर्घृण हत्या

पनवेल तालुक्यातील एका गावात रात्री-आपरात्री चोरी करणाऱ्या चोरांना अडवण्यासाठी गेलेल्या 19 वर्षीय तरुणाचा चोरांनी निर्घृणपणे हत्या केली आहे. सदर घटना पनवेल तालुक्यातील शिवकर गावात घडली आहे. याबाबात पनवेल पोलीस स्टेशनमध्ये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान या प्रकरणात तीन जणांना नवी मुंबई पोलिसांनी अटक केली आहे.

पनवेल येथील शिवकर गावात विनोद पाटील (वय 19) त्याच्या कुटुंबासह राहत होता. त्याची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. 29 मार्च रोजी मध्यरात्री 2 वाजता तीन व्यक्ती परिसरात घुसले आणि ते अनेक घरांना बाहेरून कडी लावत होते. त्यांनी विनोदच्या घरातून मोबाईल आणि इतर साहित्य चोरी करून नेत असताना विनोदने त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्या तिघा चोरांनी विनोदला पकडलं आणि खेचत जवळच्या झाडीत नेलं. दरम्यान तिघांनी पोटात आणि अंतर्भागात हत्याराने सपासप वार केल्याने विनोद मृत अवस्थेत आढळून आला आणि एकच खळबळ उडाली.

मृतक : विनोद पाटील (वय 19)

सदर गुन्ह्याबाबत तक्रार दाखल करताच पनवेल पोलीसांचे तपासकार्य सुरू झाले. दरम्यान क्राइम ब्रांचच युनिट तीन ही समांतने तपास करत होते. घटनास्थळी सापडलेल्या संशयास्पद वस्तू आणि खबरी यांच्याकडून मिळत असलेल्या माहिती आणि तांत्रिक तपास याद्वारे पोलिस आरोपीचा शोध घेत होते. यानंतर सूत्रे हाती लागताच आरोपी दिनेश कुमार सरोज (वय 20), वीरेंद्र कुमार सरोज (वय 21), चंद्रशेखर लालजी (वय 22) यांना उसरली गावातून तीन तरुणांना ताब्यात घेण्यात आले.

हे तिघे मूळचे उत्तर प्रदेशचे रहिवासी आहेत. ते उसरली गावातील समर्थ इंटर प्राइसेस या बेकरी मध्ये मजुरीच काम करत होते. त्यांना ताब्यात घेऊन त्यांची क्राइम ब्रांचच्या अधिकाऱ्यांनी चौकशी केली असता. त्यांनी या गुन्ह्याची कबुली दिली. आम्ही चोरी करून निघत असताना याने आमचा पाठलाग केला. यामुळे आम्ही त्याला चाकू आणि कुऱ्हाडीने मारल्याची कबुली त्यांनी दिली. ही कारवाई सहायक पोलीस आयुक्त विनायक वत्स यांच्या मार्गदर्शनाखाली क्राइम ब्रांच युनिट 3चे वरीष्ठ पोलीस निरीक्षक विश्वनाथ कोळेकर आणि त्यांच्या सहपोलिस कर्मचाऱ्यांनी केली आहे.

हे सुद्धा वाचा: 

बाळूमामा देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्तांमध्ये तुंबळ हाणामारी; वाद चव्हाट्यावर

सीट पकडण्याच्या वादावरून थेट चालत्या रेल्वेचा डब्बाच दिला पेटवून; माय-लेकरासह तिघे होरपळून दगावले

नवी मुंबई महापालिकेत कोट्यवधींचा घोटाळा

Thieves of Uttar Pradesh brutally murdered a 19-year-old youth in Panvel

सुधाकर काश्यप

Recent Posts

तरूणाईच्या मनात कोण ?, नरेंद्र मोदी की विरोधक ?

लय भाराची टीम गेले काही दिवस नाशिक मतदार संघातील मतदारांचा आढावा घेत आहे(Who is in…

24 mins ago

कन्नमवारनगर समस्यांच्या जंजाळात, नागरिकांची लोकसभा उमेदवारांकडे याचना

ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात शिवसेनेकडून संजय दीना पाटील, तर भाजपकडून मिहीर कोटेचा हे दोन उमेदवार…

49 mins ago

संजय राऊतांच्या ‘त्या’ आरोपानंतर निवडणूक विभागाकडून मुख्यमंत्र्यांच्या सामानाची तपासणी

संजय राऊतांच्या (Sanjay Raut) आरोपानंतर निवडणूक आयोगाकडून तपासणी : नाशिक लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचारसभांचा धडाका…

2 hours ago

नाशिक शहरातील खाजगी होर्डिंगची असणारी परिस्थितीबाबत मनपाचा कानाडोळा

घाटकोपर येथे घडलेली होर्डिंग दुर्घटने मागे असलेली पार्श्वभूमी व नाशिक शहरातील खाजगी होर्डिंगची (private hoarding)…

2 hours ago

नाशिकवरील ड्रग – वाईन कॅपिटलचा शिक्का पुसणार,शांतीगिरी महारांजाचा संकल्प

नाशिक लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात तीन मातब्बर उमेदवार आहेत. शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाने विद्यमान खासदार हेमंत…

4 hours ago

तळीराम खरे बोलतात; नरेंद्र मोदी, एकनाथ शिंदेंविषयी खूपच बोलले !

ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात शिवसेनेकडून संजय दिना पाटील, तर भाजपाकडून मिहीर कोटेचा हे दोन उमेदवार…

5 hours ago