34 C
Mumbai
Wednesday, May 31, 2023
घरक्राईमनवी मुंबई महापालिकेत कोट्यवधींचा घोटाळा

नवी मुंबई महापालिकेत कोट्यवधींचा घोटाळा

नवी मुंबई महापालिकेत स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत होणाऱ्या रंगरंगोटीच्या कामांमध्ये कोट्यवधींचा घोटाळा झाल्याचे उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. यासंदर्भात सामाजिक कार्यकर्ते योगेश महाजन यांनी मनपा आयुक्त राजेश नार्वेकर यांच्याकडे लेखी तक्रार केल्यानंतरही नव्याने तीन ठिकाणी कामांच्या निविदा काढण्यात आल्याचे आढळून आले आहे.त्यामुळे या संपूर्ण घोटाळ्याची ईडीमार्फत चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी महाजन यांनी केली आहे.

स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत ठाणे – बेलापूर रोड (टी बी आर) विभागात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचे समोर आले आहे. आधीच झालेल्या कामांच्या निविदा पुन्हा काढण्यात आल्या आहेत. टी बी आर विभागाअंतर्गत येणाऱ्या तुर्भे, कोपरखैरणे, घणसोली, रबाळे व ऐरोली अश्या पाच रेल्वेस्थानकांवर काही महिन्यांपूर्वी रंगरंगोटीची कामे झाली. मात्र, तरीही काही दिवसांपूर्वी ऐरोली रेल्वे स्टेशन परिसरातील विविध ठिकाणी भिंतीस रंगरंगोटी करून सुशोभीकरण करण्यासाठी ३० लाखांची निविदा काढण्यात आली. ही निविदा रद्द करून इतर ठिकाणी निविदा काढू नये, असे निवेदन मनपा आयुक्त व शहर अभियंता यांना देण्यात आले.होते. मात्र, संबंधितांवर काहीही काहीही कारवाई झाली नाही.

याप्रकरणी टी बी आर विभागाचे कार्यकारी अभियंता सुभाष सोनावणे यांना तत्काळ निलंबित करून उर्वरित कामांची चौकशी करून नवीन निविदा रद्द करण्याची मागणी महाजन यांनी केली.

हे सुद्धा वाचा : 

उद्धव ठाकरेंच्या पार्टनरचा ५०० कोटी रुपयांचा घोटाळा उघड करणार; सोमय्यांचा पुन्हा इशारा

पीडब्ल्यूडीने केला ‘अंगापेक्षा भोंगा मोठा,’ तब्बल ५०० कोटींचा चुराडा !

VEDIO : कोर्लईतील १९ बंगल्याचा घोटाळा ; ग्रामसेवक, सरपंचावर गुन्हा दाखल

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी