संपादकीय

जिम कॉर्बेट येथील ढिकाला झोन मधली रोमांचकारी टायगर सफारी

मृगा वर्तक : टीम लय भारी

चार अनोळखी लोकांसोबत जंगलात जाऊन राहायचं आणि तेही जिथे फोन बंद असतो अशा ठिकाणी म्हणजे थोडं अवघडल्यासारखं होतंच (Exciting Tiger Safari in the Dhikala Zone at Jim Corbett).

पण खरं तर अशा सहलीच्या वेळी तुम्ही नव्या प्रदेशासोबत नवी माणसेही जोडत असता. दिल्लीला उतरून पहाटे रामनगर येईपर्यंतचा थकवा हिमाचलचा वारा कुठच्याकुठे पळवून लावतो. स्टेशन वर उतरल्याबरोबर आलेली पहाटेच्या वाऱ्याची झुळूक एक हवीशी हुरहूर लावून जाते. बाहेर एक ओपन जिप्सी आपली वाट पाहत असते (Exciting Tiger Safari in the Dhikala Zone at Jim Corbett).

जंगल सफारी

नुसरत जहाँचे लोकसभा सदस्यत्व रद्द करण्याची मागणी, कोणी आणि का केली ही मागणी

शरद पवार, प्रशांत किशोरांच्या दिल्लीतील भेटीनंतर ‘या’ चर्चांना उधाण

दवाने भिजलेल्या मातीचा गंध आणि पानांची सळसळ त्यातून ढगांसारखं वाहणारं धुकं आणि दोहोबाजूंच्या गर्द झुडुपांतून कावरंबावरं झालेलं एक हरीण जेव्हा जिप्सीच्या रस्त्यात येऊन उभं राहिलं तेव्हा अगदी भारी वाटतं. पुढे नंतर बरीच हरणं दिसतात. धिकाला परिसरात बऱ्याच प्रकारची हरणं आहेत. भुंकणारे हरीण (barking deer) त्याचा आवाज कुत्रा भुंकतो त्यासारखा असतो. शरीराचा आकार इतर हरणांच्या तुलनेत लहान, रंग मातकट. ठिपक्यांच हरीण, सांबर, चितल, अशी बरीच हरणं पाहायला मिळतात.

जंगल सफारी

सीतावनी च्या जंगलात एक हत्ती पहिला, एकटाच होता, कळप चुकला की आणखी काही कोण जाणे, अधाशी खादाड झाडाच्या फांद्या तोडून कित्तीवेळ ओली झालेली हिरवी पानं खात होता. वाघ, सिह सुद्धा ज्याची सहसा शिकार करू शकत नाहीत इतकी अवाढव्य ताकद असून सुद्धा अतिशय घाबरट प्राणी. म्हणून आपल्या शक्तीची जाणीव आपल्याला असायला हवी, तिचा पुरेपूर वापर कसा करावा हे शिकायला हवं. हत्ती एकमेकांशी स्पंदनांतून (vibrations)  संवाद साधतात. हत्ती अगदी सहज 500 किलोमीटर पर्यंत प्रवास करतात. साधारणपणे दिवसाला ते 50 मैल चालतात (Exciting Tiger Safari in the Dhikala Zone at Jim Corbett).

नंतरचे दिवस अगदी मजेत जातात. पहाटे उठायचं आणि सफारी मग नाश्ता जेवण आटोपून परत सफारी रात्री तारे पाहत असताना उगवणारा चंद्र सारं कौतुक हिरावून घेतो. स्पष्ट आणि आकाराने आपल्याकडून दिसतो त्यापेक्षा मोठा दिसतो. नदीपल्याडून जसा जसा तो वर येतो सारे तारे आकाशातून पळ काढतात. केशरदूध प्याल्यासारखं पिवळं ध्यान कुडकूडत्या थंडीत सुद्धा एकाजागी खिळवून ठेवते. बाजूच्या नदीतून चितलचे संबरांचे कॉल्स येत असतात मग मिट्ट काळोखात पण काहीही दिसणार नाही माहीत असताना डोळे फाडून फाडून पाहणारे आपण किती मूर्ख असतो नाही?

अकोला शहर व पातूर शहरात बच्चू कडू पठाण वेशांतर करून फिरले आणि…

Coronavirus live updates: Can’t have uniform Class 12 evaluation policy across boards, Centre tells SC

ढिकाला फॉरेस्ट रेस्ट हाउस खूप सुंदर आहे. एका बाजूला गर्द हिरवं जंगल, एक बाजूला पिवळा रखरखीत गवताळ प्रदेश आणि मागच्या बाजूला रंगीत दगडांची निळीशार नदी. संपुर्ण प्रदेश 1318.54 स्क्वेयर किलोमीटर पसरलेला आहे. हा परिसर रामगंगा नदीच्या खोऱ्यात वसलेला आहे. जेवण उत्तम, थोडंस महाग पण इतकं 25 किलोमीटर आत त्यांना सगळं घेऊन यावं लागतं म्हंटल्यावर चालतं. तुम्हाला प्रवेश करताना ते एक कापडी पिशवी देतात ती आत गेल्यावर चाव्या घेताना त्यांना द्यायची व परतताना तुमचा जो काही कचरा झाला असेल तो सगळा त्यात भरून ते तुम्हाला परत देतात. तो बाहेर गेल्यावर प्रवेशद्वारावर तुम्हाला जमा करावा लागतो.

जंगल सफारी

वाघ दिसला!  नशीब चांगलं होतं आमचं वाघिणीने नुकतीच पिल्ल घातली असल्यामुळे ती आठवडाभर कुणाला दिसली नव्हती. ढिकला झोन मध्ये वाघांना त्यांच्या प्रदेशावरून नावं आहेत. नदीच्या पार राहणारी ती पारो, गवताळ प्रदेशात एक मोठं घेराचं सुकलेलं झाडाचं साल उरलं आहे फक्त, तिथल्या वाघिणीला मोटा साल म्हणतात. या दोघींना त्यांच्या बछडयांसोबत पाहिलं. मोटा साल वालीने तिची पिल्लं कुठे लपवली होती तिला आठवत नव्हतं, ती सतत रस्त्या रस्त्यावर मार्किंग करत त्यांना आवाज देत गवतातून दगडातून फिरत होती. तिच्या डोळ्यात तिची अगतिकता दिसत होती. कुणालाही न भिणारी ती आई तिच्या पिल्लांचा शोध घेताना किती व्याकुळ झाली होती. वाघिणीने पिल्लांना जन्म दिला की पुढचा आठवडाभर ती रोज त्यांना नव्या जागी घेऊन जाते, वाघाला सुगावा लागू नये म्हणून. त्यावेळी ती भूक तहान सगळं विसरते (Exciting Tiger Safari in the Dhikala Zone at Jim Corbett).

जंगल सफारी

या सगळ्या आवडीच्या वातावरणात एक गोष्ट खटकली ती म्हणजे एखाद्या ठिकाणी वाघ दिसत असेल की सगळ्या जिप्सी तिथे गर्दी करतात आणि हवी तशी वाघाच्या पुढे जायची प्रत्येकाची इच्छा असते, साहजिकच प्रत्येक चालकाला आपल्या पाहुण्यांना वाघाचे चांगले फोटो यावेत असं वाटत असतं  त्यावर त्यांचा धंदा चालतो. पण त्यामूळे वाघाची वाट अडवली जाते. पारो जेव्हा आमच्या जवळ येत होती तेव्हा अशीच जिप्सीची गर्दी धडधडत तिच्या अगदी जवळ आली त्यामुळे गोंधळून बिचारी रास्ता पार न करताच निघून गेली.

जिम कॉर्बेट अरण्यात एकूण 164 वाघ आहेत, त्यातले जवळपास 32 धिकाला झोन परिसरात आढळतात त्यातल्या चार वाघांच्या मर्जीने आणि आमच्या नशिबानेच आपली इच्छा पूर्ण होऊ शकते. तिचे डोळे त्यातली चमक, चिंता, गोंधळ, प्रेम, अपराधीपण, करारीपण तिच्या चालण्यातला थंडपणा, स्थूल शरीर (Exciting Tiger Safari in the Dhikala Zone at Jim Corbett).

Rasika Jadhav

Share
Published by
Rasika Jadhav

Recent Posts

भाजप मुंबईत अडचणीत, ज्येष्ठ संपादिका राही भिडे यांचे विश्लेषण

लोकसभा निवडणुकीतील मतदानाचा पाचवा टप्पा सोमवारी आहे. महाराष्ट्रातील मतदानाचा हा अंतिम टप्पा आहे. या टप्प्यात…

9 hours ago

मोदी सरकारच्या काळात १७ लाख हिंदू कुटुंबियांनी केवळ देशच सोडला नाही तर देशाचे नागरिकत्वही सोडले – प्रकाश आंबेडकर

मोदी सरकारच्या (Modi govt) कार्यकाळात १७ लाख हिंदू कुटुंबियांनी देश सोडला आहे. ५० कोटिहून अधिक…

11 hours ago

नाशिकजवळ गोदान एक्सप्रेसच्या डब्ब्याखालून धूर, जीवाच्या आकांताने प्रवाशांच्या उड्या

आज नाशिक जिल्ह्याच्या इगतपुरी तालुक्यातील मुंढेगावजवळ गोदान एक्स्प्रेसच्या ( Godan Express) डब्याखालून अचानक धूर निघाल्याने…

11 hours ago

द ग्रेट इंडियन कपिल शोच्या मीड सीझनचा प्रोमो रिलीज

'द ग्रेट इंडियन कपिल शो'चा (The Great Indian Kapil Show's) नवा मीड सीझनचा प्रोमो रिलीज…

13 hours ago

ऐनवेळची धावपळ टाळण्यासाठी मतदान केंद्राची माहिती आधीच घ्या- जिल्हाधिकारी जलज शर्मा

लोकसभा निवडणूक 2024 साठी नाशिक जिल्ह्यातील 20 दिंडोरी व 21 नाशिक लोकसभा मतदार संघांसाठी सोमवार,…

13 hours ago

त्र्यंबकेश्वर येथे युवकास जीवे मारण्याचा प्रयत्न; रोकडही लांबवली

पार्किंगच्या जागेच्या कथित वादावरुन १२ जणांनी एकास जीवे (kill) मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी १२ जणांवर त्र्यंबकेश्वर…

14 hours ago