30 C
Mumbai
Sunday, May 12, 2024
Homeमहाराष्ट्रअकोला शहर व पातूर शहरात बच्चू कडू पठाण वेशांतर करून फिरले आणि...

अकोला शहर व पातूर शहरात बच्चू कडू पठाण वेशांतर करून फिरले आणि…

टीम लय भारी

अकोला :-  कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे टाळेबंदी जाहीर करण्यात आली. त्यामुळे सामान्य जनतेचे हाल होत आहेत. त्यामुळे सरकारने सामान्य जनतेला स्वस्त दरात अन्यधान्य मिळेल याची व्यवस्था केली आहे. दुकानदार याचा काळा बाजार करत आहेत का? म्हणून, पालकमंत्री बच्चू कडू यांनी सोमवारी चक्क वेशांतर करून याची तपासणी केली (Bachchu Kadu disguised as a pathana).

धान्य वितरणात काळा बाजार होत आहे का याबाबत माहिती घेतली. एवढेच नव्हे, तर अकोला शहर व पातूर शहरातील विविध शासकीय कार्यालयांना त्यांनी भेट दिली. बच्चू कडू यांनी एका पठाणासारखे वेशांतर केले होते (Bachchu Kadu disguised as a pathana). त्यांनी युसुफखाँ पठाण हे बनावट नाव धारण केले होते. महानगरपालिकेच्या विविध विभागांमध्ये जाऊन त्यांनी पाहणी केली.

लाजीरवाणे : ‘नरेंद्र मोदींचे कौतुक करणारे बॅनर लावा’; केंद्र सरकारचे विद्यापीठ, महाविद्यालयांना आदेश

चंद्रकांत पाटील अचानक गेले फडणविसांच्या बंगल्यावर, दोन तास केली गहन चर्चा

Bachchu Kadu disguised as a pathana
पालकमंत्री बच्चू कडू वेषांतर

यावेळी मनपा आयुक्त निमा अरोरा त्यांच्या कक्षेतचे नव्हत्या. त्यामुळे त्यांच्या स्विय सहायकाशी त्यांनी संवाद साधून माहिती घेतली. विशेष म्हणजे वेशांतर केलेल्या बच्चू कडू यांना एकाही मनपा कर्मचाऱ्याने ओळखले नाही (Bachchu Kadu disguised as a pathana). मात्र, ते निघून गेल्यानंतर पालकमंत्री वेश पालटून आले होते. हे समजताच मनपा परिसरात मोठी खळबळ उडाली होती.

यानंतर, पालकमंत्री बच्चू कडू यांनी आपला मोर्चा पातूर शहराकडे वळवला. पातूर येथील एका बँकेत जाऊन त्यांनी कर्जासाठी अर्ज केला. कर्ज मंजुर करण्यासाठी पैसेही देऊ केले. परंतु व्यवस्थापकाने रितसर पद्धतीनेच अर्ज केल्यानंतर कर्ज मंजुर होईल असे सांगितले.

Bachchu Kadu disguised as a pathana
पालकमंत्री बच्चू कडू

नाना पटोलेंचे एक पाऊल मागे; शिवसेनेला गोंजारत भाजपवर साधला निशाणा

Mumbai: General public can’t take l .. Read more at: http://timesofindia.indiatimes.com/articleshow/83730574.cms?utm_source=contentofinterest&utm_medium=text&utm_campaign=cppst

त्यानंतर दोन स्वस्त धान्य दुकानांनाही भेटी दिल्या व धान्याची मागणी केली. परंतु, ऑनलाइन वितरण व्यवस्था असल्याने कोणालाही धान्य देता येणार नसल्याचे त्यांना दुकानदारांनी सांगितले.

एका दुकानात प्रतिबंधित गुटख्याची मागणी केली. दुकानदाराने त्यांना गुटखा दिला. त्यावेळी बच्चू कडू यांनी पोलिसांना बोलावून घेतले. गुटख्याचा साठा जप्त करून दिला व स्वत:समक्ष गुन्हा दाखल करून घेतला.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी