राजकीय

नुसरत जहाँचे लोकसभा सदस्यत्व रद्द करण्याची मागणी, कोणी आणि का केली ही मागणी

टीम लय भारी

नवी दिल्ली :-  राजकारणात एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करणे हे काही नवीन नाही आहे. पण सध्या देशातील राजकारणात रोज नवीन चर्चा रंगत आहेत. पश्चिम बंगालच्या तृणमूल काँग्रेसची खासदार नुसरत जहाँच्या लग्नाची चर्चा पुन्हा एकदा रंगली आहे (Nusrat Jahan Lok Sabha membership cancellation Demand).

भाजपाच्या खासदार संघमित्रा मौर्य यांनी लोकसभा अध्यक्ष यांना पत्र लिहल आहे. या पत्रात नुसरत जहाँचे लोकसभा सदस्यत्व रद्द करण्याची मागणी केली आहे. (Nusrat Jahan Lok Sabha membership cancellation Demand).

नुसरत जहाँच्या लग्न

शरद पवार, प्रशांत किशोरांच्या दिल्लीतील भेटीनंतर ‘या’ चर्चांना उधाण

अकोला शहर व पातूर शहरात बच्चू कडू पठाण वेशांतर करून फिरले आणि…

संघमित्रा मौर्य यांनी या पत्रात असे लिहले आहे. की, नुसरत जहां यांची वर्तणूक मर्यादेचा भंग करणारी आहे. लग्नाच्या मुद्यावरून नुसरत जहाँ यांनी आपल्या मतदारांना फसवले आहे. शिवाय यामुळे संसदेची प्रतिष्ठाही कलंकित झाली आहे.

हा विषय संसदेच्या नीतिशास्त्र समितीकडे पाठवला पाहिजे. तसेच चौकशी करून नुसरत जहाँवर कारवाई केली पाहिजे. अशी मागणी संघमित्रा मौर्य यांनी केली आहे. (Nusrat Jahan Lok Sabha membership cancellation Demand).

नुसरत जहाँ

संघमित्रा मौर्य यांनी असे ही नमूद केले आहे. नुसरत जहाँ संसदेत पहिल्या दिवशी नव्या नवरीप्रमाणे तयार होऊन येणे. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी नुसरत जहाँच्या रिसेप्शनमध्ये हजेरी लावल्याचा उल्लेख केला आहे.

नुसरत जहाँच्या रिसेप्शनला मुख्यमंत्री ममता बॅनर्जी

लाजीरवाणे : ‘नरेंद्र मोदींचे कौतुक करणारे बॅनर लावा’; केंद्र सरकारचे विद्यापीठ, महाविद्यालयांना आदेश

Nusrat Jahan’s marital status questioned again, BJP leader calls for probe

काही दिवसांपूर्वी नुसरत जहाँ म्हणाल्या होत्या की, परदेशी भूमी असल्याने तुर्की मॅरेज रेग्युलेशननुसार आमचा विवाह अवैध आहे. यासोबतच हा एक दोन वेगळ्या विभिन्न धर्मीय व्यक्तींमधील विवाह आहे. त्यामुळे भारतात कायदेशीर मान्यता मिळवण्याची आवश्यकता होती. मात्र तसे झाले नाही.

त्यामुळे कायदेशीर रित्या हा विवाह वैध नाही. हे केवळ एक नाते किंवा लीव्ह इन रिलेशनशिप (Live In Relationship) आहे. त्यामुळे आम्हाला वेगळे होण्यासाठी कोणत्याही घटस्फोटाची गरजच नाही. असे नुसरत जहाँ स्पष्ट म्हणाल्या होत्या.

सुरुवातीपासून नुसरत जहाँचे लग्न वादात आहे. नुसरतने निखिल जैनसोबत लग्न केले होते. तेव्हा बंगालच्या मौलानांनी नुसरत विरोधात फतवा काढला होता. तसेच संसदेत सिंदूर लावून गेल्यावरही वाद निर्माण झाला होता.

Rasika Jadhav

Share
Published by
Rasika Jadhav

Recent Posts

भाजप मुंबईत अडचणीत, ज्येष्ठ संपादिका राही भिडे यांचे विश्लेषण

लोकसभा निवडणुकीतील मतदानाचा पाचवा टप्पा सोमवारी आहे. महाराष्ट्रातील मतदानाचा हा अंतिम टप्पा आहे. या टप्प्यात…

13 hours ago

मोदी सरकारच्या काळात १७ लाख हिंदू कुटुंबियांनी केवळ देशच सोडला नाही तर देशाचे नागरिकत्वही सोडले – प्रकाश आंबेडकर

मोदी सरकारच्या (Modi govt) कार्यकाळात १७ लाख हिंदू कुटुंबियांनी देश सोडला आहे. ५० कोटिहून अधिक…

15 hours ago

नाशिकजवळ गोदान एक्सप्रेसच्या डब्ब्याखालून धूर, जीवाच्या आकांताने प्रवाशांच्या उड्या

आज नाशिक जिल्ह्याच्या इगतपुरी तालुक्यातील मुंढेगावजवळ गोदान एक्स्प्रेसच्या ( Godan Express) डब्याखालून अचानक धूर निघाल्याने…

16 hours ago

द ग्रेट इंडियन कपिल शोच्या मीड सीझनचा प्रोमो रिलीज

'द ग्रेट इंडियन कपिल शो'चा (The Great Indian Kapil Show's) नवा मीड सीझनचा प्रोमो रिलीज…

17 hours ago

ऐनवेळची धावपळ टाळण्यासाठी मतदान केंद्राची माहिती आधीच घ्या- जिल्हाधिकारी जलज शर्मा

लोकसभा निवडणूक 2024 साठी नाशिक जिल्ह्यातील 20 दिंडोरी व 21 नाशिक लोकसभा मतदार संघांसाठी सोमवार,…

17 hours ago

त्र्यंबकेश्वर येथे युवकास जीवे मारण्याचा प्रयत्न; रोकडही लांबवली

पार्किंगच्या जागेच्या कथित वादावरुन १२ जणांनी एकास जीवे (kill) मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी १२ जणांवर त्र्यंबकेश्वर…

18 hours ago