संपादकीय

गुगलची मेहरबानी, ‘लय भारी’ची प्रगती !

‘गुगल’ने आज ‘लय भारी’ला विशेष प्रमाणपत्र प्रदान केले आहे. असे प्रमाणपत्र मिळवणारे ‘लय भारी न्यूज’ हे मराठी भाषेतील पहिलेच न्यूज पोर्टल ठरले आहे (Google News Initiative Program helped to Lay Bhari News) . ‘लय भारी’च्या न्यूज पोर्टलवर व यू ट्यूब चॅनेलवर गेल्या काही दिवसांत अत्यंत उत्कृष्ट व आक्रमक मजकूर निरंतरपणे प्रसिद्ध होत आहे. विशेषत: सध्याच्या लोकसभा निवडणुकीचे विश्लेषण करणारे व्हिडीओ मायबाप मराठी वाचकांनी डोक्यावर घेतले आहेत. ‘लय भारी’चा अचानक उंचावलेला हा दर्जा मराठी पत्रकारितेतील चर्चेचा विषय ठरला आहे. गुगलने दिलेल्या पाठबळामुळेच ‘लय भारी’ने ही प्रगती साधली असल्याचे आम्ही या बातमीतून आज अभिमानाने जाहीर करीत आहोत.

साधारण जून २०२३ मध्ये गुगलकडून ‘लय भारी’ला पहिला सुखद धक्का मिळाला होता. गुगलमार्फत ‘गुगल न्यूज इनिसिएटिव्ह – भारतीय भाषा कार्यक्रम’ (Google News Initiative (GNI) Indian Language Program) हा उपक्रम राबविण्यात येतो. या उपक्रमामध्ये ‘लय भारी’ला सामावून घेण्यात आले. देशभरातील विविध भाषांतील (साधारण नऊ) सुमारे २०० न्यूज पोर्टल्सचा त्यात समावेश करण्यात आला. गुगलमार्फत रिडवेअर या मध्यस्त कंपनीने या उपक्रमासाठी पात्र ठरलेल्या न्यूज पोर्टल्सना प्रशिक्षण द्यायला सुरूवात केली. शिवाय तंत्रज्ञान देवून पोर्टल्सना बळकट केले.

पोर्टल्सची पाहणी करून रिडवेअरने प्रत्येक न्यूज पोर्टल्सना त्यांचा अहवाल पाठवून दिला. पोर्टल्सवरील उणिवा दाखवून दिल्या व सुधारणा करण्याचे मार्ग सांगितले.

हे सुद्धा वाचा

लय भारीच्या शिरपेचात मानाचा तुरा; तुषार खरात यांना अरविंदबाबू देशमुख पत्रकारिता पुरस्कार

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते ‘लय भारी’च्या नव्या लोगोचे अनावरण, चव्हाण यांनी केले तोंड भरून कौतुक

लय भारीचा दिवाळी अंक राजकारण्यांसाठी अभ्यास पुस्तक मुख्यमंत्र्यांनी दिवाळी अंकाचे केले प्रकाशन

लय भारी कार्यालय उद्घाटन सोहळ्याची क्षणचित्रे

अरविंद बाबू पुरस्कार

पोर्टलवर बातम्या कशा प्रसिद्ध करायच्या. एसईओ तंत्रज्ञान इत्यादी बाबत वेळोवेळी मार्गदर्शन केले. इतरही सखोल तंत्रज्ञानाची माहिती दिली गेली. पोर्टल्सवरील बातम्यांचे वाचक वाढविणे, जाहिरातीच्या माध्यमातून महसूल वाढविणे यासाठी काही प्लग इन्स दिले गेले. गुगल एनालिटिक्सचे फायदे समजून सांगितले. साधारण दर दहा – बारा दिवसांतून नियमितपणे प्रशिक्षण व मार्गदर्शन दिले गेले.

गुगलच्या अनुदानातून विकत घेतलेले कॅमेरे

सध्या व्हिडीओ मोठ्या प्रमाणात पाहिले जातात. त्या अनुषंगाने सुद्धा या उपक्रमाअंतर्गत प्रशिक्षण देण्यात आले. यू ट्यूबवर कोणत्या पद्धतीचे व्हिडीओ चालतात. व्हिडीओ, शॉर्ट्स प्रभावी करण्यासाठी करावयाचे प्रयत्न याबाबत मार्गदर्शन दिले गेले.

डिसेंबर २०२३ मध्ये गुगल न्यूज इनिसिएटिव्हचा पहिला टप्पा पूर्ण झाला. ‘लय भारी’ने पहिल्या टप्प्यात चांगली कामगिरी केली होती. त्यामुळे गुगलने दुसऱ्या टप्प्यासाठी ‘लय भारी’ला पात्र ठरविले (देशभरातून बहुधा अवघ्या ३० ते ४० पोर्टल्सनाच पात्र ठरविले आहे). त्यासाठी गुगलने विशेष अनुदान दिले.

गुगलने दिलेल्या या अनुदानातून ‘लय भारी’ने चांगल्या दर्जाचे कॅमेरे, बूम माईक, कॉलर माईक, टेलिप्रॉम्पटर, संगणक, लाईट्स, वायरलेस माईक असे ब्रॅण्डेड दर्जाचे साहित्य खरेदी केले. या अनुदानातून कुशल मनुष्यबळाचे मानधन, पगार, तंत्रज्ञान विकसित करणे, मार्केटिंग इत्यादीं बाबींवर सुद्धा खर्च करण्यास अनुमती देण्यात आलेली आहे.

ऑ़डीओ – व्हिडीओ मिक्सर
गुगलच्या अनुदानातून टेलिप्रॉम्पटर, ट्रायपॉड, मोनोपॉड असे साहित्य खरेदी केले आहे

गुगलच्या या सहाय्याचा जबरदस्त फायदा ‘लय भारी’च्या यू ट्यूब चॅनेलला झाला. साधारण सात – आठ महिने हा चॅनेल बंद अवस्थेतच होता. पण पुरक उपकरणांची केलेली खरेदी, मिळालेले तंत्रज्ञान आणि मार्गदर्शन या आधारे ‘लय भारी’ने मार्च – एप्रिल २०२४ पासून यू ट्यूब चॅनेल पुन्हा कार्यान्वित केला. त्यावर मेहनत घ्यायला सुरूवात केली. त्याचे प्रभावी परिणाम निघाले.

गुगलच्या सहकार्यामुळे यू ट्यूबच्या प्रेक्षकसंख्येत ८.२० लाखाने वाढ झाली

अवघ्या महिनाभरात तब्बल ८.२० लाख प्रेक्षकसंख्या ‘लय भारी’ने गाठली. एकेका व्हिडीओला १ लाख, ९३ हजार, ८५ हजार, ५३ हजार असे व्ह्यूज मिळू लागले. यू ट्यूब चॅनेलला अवघे ७ हजार सबस्क्राईबर्स होते. पण गेल्या दीड महिन्यात ती संख्या दुपटीने म्हणजे १४,२०० पर्यंत पोचली. विशेष म्हणजे, १४,२०० ही सबस्क्राईबर्सची संख्या तशी कमीच आहे. पण यू ट्यूब चॅनेलवरील मजकूर ताकदीचा असल्यामुळे तब्बल ८.२७ लाख नियमित प्रेक्षक ‘लय भारी’ने कमाविले आहेत.

गेल्या काही दिवसांत पाहिलेले गेलेले टॉप शॉर्टस्

या प्रेक्षकांनी आमचा यू ट्यूब चॅनेल सबस्क्राईब करावा असे आम्ही आवाहन केले होते. त्यानुसार दररोज सरासरी ३०० ते ६०० जण चॅनेलला सबस्क्राईब करीत आहेत. ही वाढ अशीच राहिली तर लवकरच एक लाख सबस्क्राईबर्सची संख्या पूर्ण होईल. नियमित असलेल्या ८.२७ लाख प्रेक्षकांनी आमचा चॅनेल सबस्क्राईब केला तर मग सबस्क्राईबर्सची संख्या मोठ्या प्रमाणात वाढू शकेल.

गेल्या २८ दिवसांता जास्त पाहिले गेलेले व्हिडीओ

गुगलची मेहरबानी, रिडवेअरच्या कर्मचाऱ्यांनी केलेले मार्गदर्शन आणि मायबाप मराठी वाचकांनी दाखविलेले प्रेम यामुळेच ‘लय भारी’ झपाट्याने एकेक पाऊल पुढे टाकत आहे. गुगलने ‘लय भारी’ला केलेले सहकार्य हे केवळ आमच्या संस्थेपुरतेच मर्यादीत नसून संपूर्ण मराठी प्रसारमाध्यम क्षेत्राचा बहुमान आहे, अशी भावना ‘लय भारी’चे संस्थापक व संपादक तुषार खरात यांनी व्यक्त केली आहे.

तुषार खरात यांच्याविषयी

तुषार खरात हे गेल्या २५ वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत आहेत. सकाळ, लोकसत्ता, मुंबई तरूण भारत या वृत्तपत्रांत त्यांनी दिर्घ काळ काम केले आहे. ‘सकाळ’मध्ये ‘सकाळ इन्व्हिस्टिगेशन टीम’चे (एसआयटी) ते ब्युरो चीफ होते. शोधक बातमीदारी कशी करावी याचा आदर्श वस्तुपाठ तुषार खरात यांनी घालून दिला. छगन भुजबळ यांच्या पीडब्ल्यूडीचा घोटाळा त्यांनी चव्हाट्यावर आणला होता. तब्बल आठ पोती कागदपत्रे तुषार खरात यांनी बाहेर काढली होती. या प्रकरणात १४ अधिकारी निलंबित झाले होते.

तुषार खरात यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे तत्कालिन सहकारी गोविंद तुपे यांनी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा एक मोठा घोटाळा बाहेर काढला होता. राजभवनजवळील ‘द लिजंड’ या टॉवरमधील घोटाळा चव्हाट्यावर आणला होता. नितीन राऊत जलसंधारण मंत्री असताना त्यांच्या साखळी सिमेंट बंधाऱ्यातील घोटाळा तुषार खरात यांनी चव्हाट्यावर आणला होता.

शोधक पत्रकारितेतीतल अशी शंभरापेक्षाही जास्त प्रकरणे तुषार खरात यांनी चव्हाट्यावर आणली होती.

सकाळचे अध्यक्ष प्रतापराव पवार व व्यवस्थापकीय संचालक अभिजीत पवार यांच्या पाठबळामुळे तुषार खरात यांना फ्रान्स, चीन आणि तुर्की या तीन देशांत वार्तांकनासाठी जाण्याची संधी मिळाली होती. त्यांच्या २५ वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी  कोणत्याही संस्थेकडे पुरस्कारासाठी अर्ज केले नाहीत. तरीही स्वतःहून दखल घेत जवळपास १५ संस्थांनी पत्रकारितेतील विविध पुरस्कार देवून तुषार खरात यांचा गौरव केला आहे.

‘लय भारी’विषयी

तुषार खरात यांनी सन २०१९ मध्ये www.laybhari.in हे संकेतस्थळ सुरू केले होते. त्यानंतर सन २०२१ मध्ये ऐन कोरानाच्या काळात मुंबईतील फोर्ट परिसरात कार्यालय सुरू केले. जानेवारी २०२२ मध्ये ‘लय भारी मीडिया प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीची स्थापना केली. त्यानंतर चारेक महिन्यांत स्टार्ट अप इंडिया या केंद्र सरकारच्या उपक्रमात ‘लय भारी’चा समावेश करण्यात आला.

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ‘लय भारी’च्या लोगोचे प्रकाशन केले होते

‘लय भारी’ डिजिटल क्षेत्रात काम करते. परंतु पत्रकारितेशी बांधिलकी जपून ‘लय भारी’ने सन २०२२ मध्ये ‘भारतीय राजकारण @25’ हा पहिला दिवाळी अंक प्रसिद्ध केला होता. दिवाळी अंकात ७५ वर्षातील राजकारणाचा आढावा घेण्यात आला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते अंकाचे प्रकाशन झाले होते.

एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लय भारीच्या दिवाळी अंकाचे प्रकाशन झाले होते
शरद पवार यांना विशेषांक देताना संपादक तुषार खरात
गुगल इंडियाच्या (न्यूज पार्टनरशिपप्स आणि प्रोग्राम्स) अधिकारी श्वेता सुसान एलिस यांना दिवाळी अंक भेट देताना तुषार खरात

त्यानंतर सन २०२३ मध्ये सुद्धा दुसरा दिवाळी अंक प्रसिद्ध करण्यात आला. ‘गांधी – नेहरू यांनी देशाचं खरंच नुकसान केलं का ?’ या शिर्षकाखाली हा अंक प्रसिद्ध केला होता. तो मायबाप वाचकांना इतका आवडला की, त्याची दुसऱ्यांदा छपाई करावी लागली होती. हा अंक जेव्हा शरद पवार यांना भेट देण्यासाठी संपादक तुषार खरात गेले तेव्हा पवार यांनी अंकाविषयी सखोलपणे जाणून घेतले. तब्बल ४५ मिनिटे त्यांनी तुषार खरात यांच्याशी अनौपचारिक गप्पा मारल्या.

‘गांधी – नेहरू यांनी देशांचं खरंच नुकसान केलं का ?’ हा विशेषांक वाचकांना भावला होता

या शिवाय भाजपचे आमदार अतुल भातखळकर, आमदार सत्यजित तांबे यांनी अंकांच्या मोठ्या संख्येने प्रती घेवून त्या अनेकांना वाटल्या. रयत शिक्षण संस्थेने ८०० प्रती विकत घेवून त्यांच्या सर्व शाळा, महाविद्यालयांमध्ये त्या वाटल्या.

टीम लय भारी

Recent Posts

महात्मा गांधी येथे आगीत दोन दुकाने जळून खाक

आज सायंकाळी सहाच्या वाजेच्या सुमारास टाऊन हॉल समोर असलेल्या खलील भाई बॅटरीवाला यांच्या दुकानाला आग…

4 hours ago

नाशिक-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर धावत्या कारने घेतला पेट

सध्या जिल्ह्यासह राज्यभरात उन्हाचा कडाका चांगलाच वाढला आहे. या वाढत्या उन्हामुळे अनेकदा धावत्या वाहनांना आग…

5 hours ago

उद्धव ठाकरे तर मानसिक आजारी आहेत : चंद्रशेखर बावनकुळे

उद्धव ठाकरे यांना पराभव दिसू लागल्याने त्यांचे मानसिक संतुलन ढासळले आहे. ते चिडलेले आहेत, घाबरलेले…

5 hours ago

मालेगाव येथे शाळेच्या आवारातून १ लाखाची एमडी पावडर जप्त; तिघांना अटक

शहरातील जुन्या मुंबई-आग्रा महामार्गावरील म्युन्सिपल हायस्कूल, कन्या शाळेच्या आवारात शहर पोलिसांनी छापा टाकून सुमारे एक…

6 hours ago

नरेंद्र मोदींचा रोड शो जनतेच्या पैशातून, महापालिकेने केला साडेतीन कोटीचा खर्च; संजय राऊत यांचा आरोप

घाटकोपरमध्ये बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रोडशो झाला या रोडशोसाठी संपूर्ण मुंबईला वेठीस धरण्यात आले…

7 hours ago

पपई खाण्याचे आरोग्यदायी फायदे

पपई (papaya) ही आरोग्यासाठी (Health) खूप फायदेशीर ( benefits) मानली जाते. यामध्ये व्हिटॅमिन-ए, व्हिटॅमिन-बी, व्हिटॅमिन-सी,…

8 hours ago