संपादकीय

Azadi Ka Amrit Mahotsav : भारताच्या स्वातंत्र्यद‍िनाची तारीख 15 ऑगस्ट ठरवण्याचे कारण

भारतात यंदाच्या वर्षी ‘आजादी का अमृत महोत्सव’ साजरा केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या वर्षी हा उत्सव मोठ्या धुमधडाक्यात करण्याचे ठरवले आहे. त्यामुळे देशात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. जस जशी 15 ऑगस्टची तारीख जवळ येत आहे. तसा उत्साह शिगेला पोहचला आहे. आपल्या‍ देशाला इंग्रजांच्या राजवटीपासून स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पुर्ण झाली आहेत. नेमके 15 ऑगस्टलाच आपल्याला स्वातंत्र्य का‍ मिळाले ? याचे देखील एक रहस्य आहे. भारताच्या स्वातंत्र्यदिनाचा उत्सव 15 ऑगस्ट 1947 ला मध्यरात्री करण्यात आला. स्वातंत्र्यदिनाची तारीख, वर्ष आणि वेळ निश्चित करण्यामागे देखील एक कारण आहे. भारताच्या स्वातंत्र्यदिनाची तारीख ही आगोदर ठरविण्यात आली होती.

15 ऑगस्ट 1947 ला मध्यरात्री 12 वाजता भारताच्या स्वातंत्र्याची घोषणा करण्यात आली. त्यावेळी काँग्रेसचे अध्यक्ष पंडीत जवाहरलाल नेहरु होते. त्यांनी 1929 मध्ये ब्रिटिश सरकारपासून पूर्णपणे स्वतंत्रतेची मागणी केली. त्यावेळी 26 जानेवारीला स्वातंत्र्य दिन साजरा करण्याची घोषणा केली होती. मात्र 26 जानेवारी 1950 साली तो दिवस भारताचा प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करण्यात आला.1945 साली दुसऱ्या जागतिक युद्धात ब्रिटनवर राजकीय संकट आले होते. आर्थिक स्थिती देखल खराब झाली होती. तसेच 1945 साली झालेल्या मतदानात ब्रिटनची लेबर पार्टी विजयी झाली.

लेबर पार्टीने आपले सरकार बनवले. तर ब्रिटिश राजवटीतील देशांना मुक्त केले जाईल असे आश्वासन दिले होते. लेबर पार्टीचे सरकार येताच भारताच्या स्वातंत्र्याच्या चळवळीने जोर धरला. फेब्रुवारी 1947 मध्ये भारताचे गर्व्हनर म्हणून माऊंटबेटन यांची नियुक्त करण्यात आली. भारताला ब्रिटीशांच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी माऊंटबेटन यांनी एक मसूदा तयार केला. 30 जून 1948 ला सर्व हक्क भारताला देणार असे मसुद्यात नमूद केले होते. या तारखेला भारतीय नेत्यांनी विरोध केला. त्यामुळे 1947 साल‍ निश्चत झाले. जून 1947 मध्ये भारताला ऑगस्टपर्यंत स्वातंत्र्य देण्याचे ठरले. माऊंटबेटन यांनी 15 ऑगस्ट ही तारीख निश्चित केली. कारण याच तारखेला दुसरं महायुद्ध संपतांना जपानने आत्मसमर्पण केले होते. माऊंटबेटन 15 ऑगस्ट ही तारीख शुभ मानत होते.

तर भारतातील ज्योतिषी या तारखेला अशुभ मानत होते. मात्र माऊंटबेटन त्यांच्या निर्णयावर ठाम होते. त्यामुळे मध्यरात्री भारताला स्वातंत्र्य देण्याचे ठरले. ज्योतीषांच्या मते 15 ऑगस्ट ही तारीख शुभ नव्हती. त्यामुळे 14 ऑगस्ट 1947 रात्री 11.51 ते 12.39 ही वेळ शुभ असल्याने निश्चित करण्यात आली होती. इंग्रजी कॅलेंडरनुसार रात्री 12 नंतर 15 तारीख होती. तर भारतीय पंचांगानुसार सुर्योदयानंतर तारीख बदलते. त्यामुळे मध्यरात्री स्वातंत्र्य देण्याचे ठरले.

‘रमजान महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारी पाकिस्तान स्वतंत्र झाला’

15 ऑगस्ट 1947 याच‍ दिवशी पाकिस्तान भारतापासून अलग झाला. मात्र 14 ऑगस्टला पाकिस्तान आपला स्वातंत्र्य दिवस साजरा करतो. या विषयी पाकिस्तानमधील वयस्कर व्यक्ती सांगतात की,‍ पाकिस्तानला पवित्र रमजान‍ महिन्याच्या 27 व्या मध्यरात्री स्वातंत्र्य मिळाले. ज्या दिवशी स्वातंत्र्य मिळाले तो दिवस ‘अलविदा जुम्मा’ म्हणजे ‘रमजान’ महिन्यातला शेवटचा शुक्रवार होता. त्यादिवशी 14 ऑगस्ट 1947 हा दिवस होता. त्यामुळे पाकिस्तान भारताच्या एक दिवस स्वातंत्र्य दिन साजरा करतो. मात्र ‘इंडियन इन्डिपेन्डन्ट ॲक्ट’ 1947 हा कायदा ब्रिटिशांनी संसदेमध्ये मंजूर केला. त्यावर ग्रेट ब्रिटनच्या सहाव्या राजाने 18 जुलै 1947 रोजी स्वाक्षरी केली.

हे सुद्धा वाचा

VIDEO : भविष्यातील जनउद्रेकाची नांदी, तरूण घुसला ईडीच्या दारी !

Ajit Pawar : मंत्रिमंडळ विस्तार करायला का घाबरता, तुमच्यात एकवाक्यता नाही का ? अजित पवारांचा सवाल

Tricolor : तिरंग्याच्या आडून गटार लपविले, भाजप सरकारचा अजब कारभार

या कायद्याची एक प्रत पाकिस्तानचे सेक्रेटरी जनरल चौधरी महम्मद अली यांनी 24 जुलै 1947 ला मोहम्मद अली जिन्ना यांना पाकिस्तामध्ये पाठवून दिली. तर 15 ऑगस्ट 1947 ला पाकिस्तान सरकारच्या प्रतिनिधी मंडळाने लंडनच्या लॅकेस्टर हाऊसमध्ये ब्रिटिश अधिकाऱ्यांना झेंडा भेट दिला होता. ब्रिटिश सरकारने 1983 मध्ये प्रसिद्ध केलेल्या ‘द ट्रान्सफर ऑफ पॉवर’ या ग्रंथात त्याचा उल्लेख आहे. या कायद्याचा अनुवाद कायद-ए-आझम पेपर्स प्रोजेक्ट, कॅबिनेट डिव्हिजन, पाकिस्तान सरकार इस्लामाबाद यांनी केलेल्या जिन्ना पेपर्स या ग्रंथाच्या तिसऱ्या खंडात 45 व्या पानावर आहे. या ग्रंथात 15 ऑगस्ट 1947 ला ब्रिटिश सरकार भारत आणि पाकिस्तान अशा दोन देशांची निर्मिती करेल असा उल्लेख आहे. हा अनुवाद उर्दूमध्ये असल्याचे तज्ज्ञांचं मत आहे.

रूपाली केळस्कर

Recent Posts

उन्हाळ्यात ऊसाचा रस पिण्याचे फायदे

उन्हाळा सुरु झालाय तर उन्हाळ्यात आपल्याला काही न काही थंड पियायच असतं  तर त्या साठी…

60 mins ago

नाशिकच्या रस्त्यांवर धावणार 50 इलेक्ट्रिक बस

केंद्र सरकारच्या नगरविकास मंत्रालयाकडून पीएम ई बस (PM E Bus) या योजनेंर्तग देशातील २० लाखांच्या…

3 hours ago

सेक्स टेप प्रकरणी प्रज्वल रेवण्णा यांच्याविरोधात ग्लोबल लूकआऊट नोटीस

जेडीएसचे नेते प्रज्वल रेवण्णा (Prajwal Revanna) यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. रेवण्णा यांच्या सेक्स टेप…

4 hours ago

नाशिकचे महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे १६ कोटीचे धनी

सलग दहा वर्षांपासून नाशिकचे खासदार राहिलेले हेमंत गोडसे (Hemant Godse) यांच्या संपुर्ण कुटुंबियांच्या नावे एकूण…

17 hours ago

दिंडोरी लोकसभेच्या उमेदवाराची संपत्ती पाच वर्षात दुप्पट

दिंडोरी लोकसभा (Dindori Lok Sabha) मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवारांच्या संपत्तीत  (wealth)…

17 hours ago

डाॅ. पवार, गाेडसेंचा विजय निशि्चत : शिंदे

४० अंशाच्या आसपास तापमानाचा पारा असतानाही कार्यकर्त्यांचा अमाप उत्साह पाहता महायुतीच्या दाेन्ही उमेदवारांचा विजय जवळजवळ…

17 hours ago