33 C
Mumbai
Friday, April 26, 2024
Homeराष्ट्रीयTricolor : तिरंग्याच्या आडून गटार लपविले, भाजप सरकारचा अजब कारभार

Tricolor : तिरंग्याच्या आडून गटार लपविले, भाजप सरकारचा अजब कारभार

व्हिडिओमध्ये केवळ तिरंगा दिसत आहे, तरीसुद्धा तिरंगा कचऱ्याच्या ठिकाणी लावणे कितपत योग्य आहे असा सवालच नागरिक, विरोधी पक्षांकडून विचारण्यात येत आहे. दरम्यान तिरंग्याचा अपमान करणाऱ्या व्यक्तींवर कोण कारवाई करणार का, की त्याचेच समर्थन करून हा विषयच पुर्णपणे गुंडाळला जाणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

स्वातंत्र्यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त देशभरात वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहेत. यामध्ये ‘हर घर तिरंगा’ हा उपक्रम सुद्धा राबवण्यात येत आहे. या अंतर्गत तिरंग्याचे महत्त्व वाढवण्यासाठी सरकारकडून वेगवेगळ्या ठिकाणी तिरंगा दिमाखात लावण्यात येत आहे. दरम्यान उत्तर प्रदेश येथील आजमगढ येथील एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच धुमाकुळ घालत आहे. यामध्ये मुख्यमंत्री योगींना कचरा दिसू नये म्हणून चक्क नाल्याला तिरंग्याचे बॅरिकेटिंग करण्यात आले आहे. कचऱ्याच्या ठिकाणी लावलेल्या या तिरंग्यावर नेटकरी सडकून टीका करीत आहे, प्रश्न विचारत आहेत. सरकारी कर्मचाऱ्यांच्या या कृत्यावर देशभरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

सोशल मीडियावर एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. युपी काॅंग्रेसकडून हा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला आहे. यामध्ये काॅंग्रेस लिहिते, मुख्यमंत्र्यांनी कचरा दिसू नये म्हणून आजमगढ येथे नाल्याला तिरंग्याने बॅरिकेटिंग करत झाकण्याचा प्रयत्न केला आहे असे म्हणून काॅंग्रेसने या तिरंग्याच्या अपमानावर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत योगी सरकारच्या कारनाम्याचे पितळ उघडे पाडले आहे.

हे सुद्धा वाचा

Nilesh Rane : उरलेले फक्त चटई, खुर्च्या उचला… निलेश राणेंकडून शिवसैनिकांसाठी सूचक वक्तव्य

Dattatray Bharne : माजी मंत्री दत्तत्रय भरणे गोरगरीबांसाठी बनले आरोग्यदूत !

राहूल गांधींचा करारी बाणा, नरेंद्र मोदींची केली चिरफाड

काॅंग्रेस पुढे लिहिते, मुख्यमंत्र्यांचा फोटो कचऱ्यात टाकल्याच्या कारणावरून एका कर्मचाऱ्याची नोकरी हिरावून घेणारे तिरंग्याचा अपमान करणाऱ्या मुख्यमंत्री आणि त्यांच्या अधिकाऱ्यांचा राजीनामा घेणार का असा सवालच त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.

व्हिडिओमध्ये केवळ तिरंगा दिसत आहे, तरीसुद्धा तिरंगा कचऱ्याच्या ठिकाणी लावणे कितपत योग्य आहे असा सवालच नागरिक, विरोधी पक्षांकडून विचारण्यात येत आहे. दरम्यान तिरंग्याचा अपमान करणाऱ्या व्यक्तींवर कोण कारवाई करणार का, की त्याचेच समर्थन करून हा विषयच पुर्णपणे गुंडाळला जाणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. हर घर तिरंगा या अंतर्गत तिरंगा ठिकठिकाणी लावला जात असले तरीही तो ध्वज नाही म्हणून केवळ तीन रंगांचा हा कपडा कुठेही लावू शकतो का असा प्रश्न सुद्धा आता उपस्थित करण्यात येत आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी