संपादकीय

रामदास जहाजास जलसमाधी

मृगा वर्तक : टीम लय भारी

टायटॅनिक जहाजाची गोष्ट सर्वज्ञात आहेच, याच धर्तीवर भारताचे एक जहाज सुद्धा मुंबईजवळ बुडाले होते हे तुम्हाला माहिती आहे काय? ही गोष्ट आहे 1947 सालची, भारताला स्वातंत्र्य मिळाले त्या वर्षीची मुंबई वरून रेवस कडे जाण्यासाठी निघालेले जहाज अपघाताने कलंडले आणि मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली (The Ramdas ship capsized in an accident and a large number of lives were lost).

या जहाजावर एकूण 713 प्रवासी होते त्यापैकी 690 प्रवाशांचा बुडून मृत्यू झाला. लाईफ जॅकेट फार कमी प्रमाणात उपलब्ध होते. त्यामुळे बरीच चेंगराचेंगरी झाली, काही पोहता येणाऱ्या लोकांनी समुद्रात उड्या घेतल्या आणि किनाऱ्याकडे जाण्यास सुरुवात केली. सकाळी साडे आठला निघालेली बोट 9 च्या सुमारास फक्त 5 मैल म्हणजेच जवळपास 9 किलोमीटर अंतर कापून बुडाली. त्यानंतर दुपारी 3 च्या सुमारास काही प्रवासी पोहत किनाऱ्याला लागल्यानंतर बुडालेल्या जहाजविषयी माहिती मिळाली. काही प्रवासी तर मोठा पल्ला पोहत रेवसच्या समुद्रकिनाऱ्या पर्यंत गेले. काहींना रेवसच्या मच्छिमारांनी वाचवले, तरीही 690 प्रवाशांचा पत्ता लागला नाही.

मोदी हटाव देश बचाव, पृथ्वीराज चव्हाणांचा सायकल रॅलीत नारा

जयंत पाटीलांनी सांगितले मोदींच्या आणि पवारांच्या भेटीचे नेमकं कारण

या जहाजात इंग्रज अधिकारी व त्यांची कुटुंबे, गिरणी कामगार, गर्भवती महिला, लहान मुले, अलिबाग रेवसचे रहिवासी असे बरेच प्रकारचे लोक होते. 17 जुलै 1947 रोजी रामदास जहाज बुडाले व त्यानंतर एक महिन्याच्या आत भारत स्वतंत्र झाला. परंतु मुंबई, अलिबाग, परेल, गिरगाव रेवस येथील रहिवाश्यांना आपल्या कुटुंबियांच्या मृत्यू बाबत दुःख होते. त्यानंतर पावसाळ्यात हा बोटीचा मार्ग काही काळासाठी अजूनही बंद केला जातो (During the rainy season, the boat is still closed for some time).

रामदास जहाज

आयसीसीने केली टी- 20 विश्वचषक 2021 ची घोषणा

Caught by surprise, Mumbai wakes up to season’s heaviest rainfall

हवामान खात्याने कोणताही धोक्याचा इशारा दिला नसताना सुद्धा अचानक वादळ निर्माण होऊन 40 फूट उंचीच्या लाटा तयार झाल्या. बोट किनाऱ्यापासून निघून काही वेळेतच बुडल्याने आणि मोठ्या प्रमाणावर जीवित हानी झाल्याचे जहाजाचे वाचलेले कॅप्टन इस्माईल शेख यांनी सांगितले.

Rasika Jadhav

Recent Posts

भाजप मुंबईत अडचणीत, ज्येष्ठ संपादिका राही भिडे यांचे विश्लेषण

लोकसभा निवडणुकीतील मतदानाचा पाचवा टप्पा सोमवारी आहे. महाराष्ट्रातील मतदानाचा हा अंतिम टप्पा आहे. या टप्प्यात…

2 hours ago

मोदी सरकारच्या काळात १७ लाख हिंदू कुटुंबियांनी केवळ देशच सोडला नाही तर देशाचे नागरिकत्वही सोडले – प्रकाश आंबेडकर

मोदी सरकारच्या (Modi govt) कार्यकाळात १७ लाख हिंदू कुटुंबियांनी देश सोडला आहे. ५० कोटिहून अधिक…

4 hours ago

नाशिकजवळ गोदान एक्सप्रेसच्या डब्ब्याखालून धूर, जीवाच्या आकांताने प्रवाशांच्या उड्या

आज नाशिक जिल्ह्याच्या इगतपुरी तालुक्यातील मुंढेगावजवळ गोदान एक्स्प्रेसच्या ( Godan Express) डब्याखालून अचानक धूर निघाल्याने…

4 hours ago

द ग्रेट इंडियन कपिल शोच्या मीड सीझनचा प्रोमो रिलीज

'द ग्रेट इंडियन कपिल शो'चा (The Great Indian Kapil Show's) नवा मीड सीझनचा प्रोमो रिलीज…

5 hours ago

ऐनवेळची धावपळ टाळण्यासाठी मतदान केंद्राची माहिती आधीच घ्या- जिल्हाधिकारी जलज शर्मा

लोकसभा निवडणूक 2024 साठी नाशिक जिल्ह्यातील 20 दिंडोरी व 21 नाशिक लोकसभा मतदार संघांसाठी सोमवार,…

6 hours ago

त्र्यंबकेश्वर येथे युवकास जीवे मारण्याचा प्रयत्न; रोकडही लांबवली

पार्किंगच्या जागेच्या कथित वादावरुन १२ जणांनी एकास जीवे (kill) मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी १२ जणांवर त्र्यंबकेश्वर…

7 hours ago