31 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeटॉप न्यूजआयसीसीने केली टी- 20 विश्वचषक 2021 ची घोषणा

आयसीसीने केली टी- 20 विश्वचषक 2021 ची घोषणा

टीम लयभारी

मुंबई :- क्रिकेट प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे ती म्हणजे आयसीसीने टी-20 विश्वचषक 2021 या सामन्याची घोषणा करत सामन्यात सहभागी होणाऱ्या संघांची नावे जाहीर केली आहेत. टी-20 विश्वचषकाचे सामने हे 17 ऑक्टोबरपासून यूएईमध्ये खेळले जाणार आहेत (The T20 World Cup will be played in the UAE from October 17).

तसेच या टी-20 विश्वचषकाची चर्चा सध्या सर्वत्र सुरु आहे. त्याचे कारण म्हणजे भारत आणि पाकिस्तान हे एकाच गटात असून त्यांच्यात सामना खेळला जाणार आहे. त्याचबरोबर गट 2 मध्ये न्यूझीलंड, अफगाणिस्तान हे संघ सुद्धा आहेत. तर गट 1 मध्ये इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, साऊथ आफ्रिका, वेस्ट इंडिज हे संघ आहेत.

टोकियो ऑलिम्पिकवर कोरोनाचे सावट; व्हिलेजमध्ये एक कोरोना संक्रमित

मनसे सोबत युतीवर फडणवीसांचे सूचक विधान

20 मार्च 2021 पर्यंतच्या आयसीसीच्या क्रमवालीनुसार संघाची नावे ही सुपर 12 मध्ये निश्चित करण्यात आली आहेत. या सुपर 12 मध्ये दोन गट असून प्रत्येक गटात 6 संघ असणार आहेत. तसेच पात्रता फेरीसाठी खेळल्या जाणाऱ्या प्रत्येकी दोन गटात 4-4 संघ असणार आहेत. असे असले तरी अद्याप सामन्यांचे वेळापत्रक हे जाहीर करण्यात आले नाही (The match schedule has not been announced).

सुपर 12 –

गट 1 – 

इंग्लंड

ऑस्ट्रेलिया

साऊथ आफ्रिका

वेस्ट इंडीज

विजेता गट अ

उप विजेता गट ब

पालघर येथील 46 लसीकरण केंद्र बंद; फक्त 5 केंद्रात होणार लसीकरण

Gautam Gambhir names two players who will have ‘huge responsibility’ when India face Pakistan in T20 World Cup

गट 2 – 

भारत

पाकिस्तान

न्यू झीलंड

अफगाणिस्तान

उप विजेता गट अ

विजेता गट ब

The T20 World Cup will be played in the UAE from October
टी- 20

राऊंड 1 :-

 गट अ –

श्रीलंका

आयरलँड

नेदरलँड

नामिबिया

गट ब –

बांगलादेश

स्कॉटलंड

पापुआ न्यू गिनी

ओमान

कसे खेळवले जाणार सामने?  

सर्वात प्रथम सुपर 12 साठी पात्रता सामने खेळले जातील. त्यात एकूण आठ संघांचा समावेश आहे. प्रत्येक गटात 4-4 संघ आहेत. दोन्ही गटातून प्रथम आलेले दोन संघ हे सुपर 12 साठी पात्र ठरणार आहेत. तर सुपर 12 मध्ये प्रत्येक गटात 6-6 संघ असणार आहेत. या गटातील प्रत्येक संघ हा पाच सामने खेळणार आहे. सुपर 12 मधून दोन्ही गटातून प्रथम आलेले दोन गट हे उपांत्य फेरीसाठी खेळणार आहेत. तर 14 नोव्हेंबर 2021 ला उपांत्य फेरीत विजयी झालेल्या दोन संघांमध्ये टी-20 विश्वचषक जेतेपदासाठी सामना होणार.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी