28 C
Mumbai
Friday, May 10, 2024
Homeराजकीयजयंत पाटीलांनी सांगितले मोदींच्या आणि पवारांच्या भेटीचे नेमकं कारण

जयंत पाटीलांनी सांगितले मोदींच्या आणि पवारांच्या भेटीचे नेमकं कारण

टीम लय भारी

मुंबई :- देशातील राजकारणात नवीन चर्चांना उधाण आले आहे. राजकीय वर्तुळात नवीन बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची तासभर चर्चा सुरू होती. या चर्चेत नेमके काय बोलणे झाले याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पवार आणि मोदी भेटीमागचे नेमके कारण सांगितले आहे (Jayant Patil has stated the exact reason behind the Pawar-Modi meeting).

राजधानी दिल्लीत शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांच्या बैठकीतील तपशील अद्याप गुलदस्यात आहे. यावर जयंत पाटील यांनी सांगितले की, देशातील नागरी बँका आणि सहकारी बँकांवर निर्बंध आणण्याचं काम रिझर्व्ह बँकेनं केलं आहे. तसेच नव्याने निर्माण केलेल्या सहकार खाते, या खात्याकडून असलेल्या अपेक्षा आणि बँकांवर आणण्यात आलेले निर्बंध या विषयांवर ही बोलणार आहेत. असे जयंत पाटील आज सोलापुरात बोलत होते (Jayant Patil was speaking in Solapur today).

मनसे सोबत युतीवर फडणवीसांचे सूचक विधान

चीनच्या मुद्यांवरून राहुल गांधींनी मोदींना लगावला खोचक टोला

जयंत पाटील यांनी बँकांवर निर्बंध आणण्याचे काम रिझर्व्ह बँकेने केले आहे. ती बंधने कमी करण्यासाठी शरद पवार दिल्ली मोदींच्या भेटीला गेले आहेत. पवार यांना बँकिंग क्षेत्रातील लोकांनी निवेदन पाठवली आहे. त्या मागणीच्या पार्श्वभूमीवर पवार आणि मोदी यांची भेट झाल्याचे पाटील म्हणाले (Patil said that Pawar and Modi met).

दुसरीकडे शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्या बंगल्याची चौकशी सुरु असल्याचे वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. त्यावर बोलताना सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडी चंद्रकांत दादांच्या सल्ल्याने वागते हे निष्पन्न झाल्याची टीका जयंत पाटील यांनी केली आहे. विरोधी पक्षाशी सल्ला मसलत करुनच महाराष्ट्रात ईडी सारखी संस्था काम करतेय हे दुर्दैवी असल्याचे जयंत पाटील म्हणाले आहेत.

Jayant Patil reason behind the Pawar-Modi meeting
जयंत पाटील

प्रणिती शिंदेंची मोदींवर बोचरी टीका; मोदी मीडियासमोर यायला घाबरतात

NCP president Sharad Pawar meets PM Modi

फडणवीस आणि पवार दिल्लीत भेटल्याने या भेटीला अधिक महत्त्व आले आहे. या दोन्ही नेत्यांच्या भेटीत राजकीय चर्चाच झाल्याचे सांगण्यात येत आहे. या भेटीत सहकारावर चर्चा झाली असून साखर कारखान्यांवर होत असलेल्या कारवाईवरही चर्चा झाल्याचे सांगण्यात येते. तसेच राज्यातील राजकीय घडामोडींवरही या भेटीत चर्चा झाल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे नजीकच्या काळात भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र येण्याची प्रक्रिया सुरू होऊ शकते, असेही बोलले जात आहे. मात्र, हे सर्व तर्क असून त्याला दोन्ही पक्षातील कोणत्याही नेत्याने दुजोरा दिलेला नाही.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी