संपादकीय

Yogi : योगींच्या राज्यात चाललंय काय……

उत्तर प्रदेशमधील योगींच्या (Yogis) राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजले आहे. त्यांच्या राज्यात बंदूकांचे महामूर पीक आले आहेत. आता विद्यार्थी देखील दप्तरामध्ये बंदूक घेऊ जाऊ लागले आहेत. अशीक एक घटना उत्तर प्रदेशमधील सीतापूरमध्ये घडली आहे. आपल्या देशात आता विद्यार्थ्यांच्या हातात देखील बंदूक दिसू लागली आहे. उत्तर प्रदेशमधील सीतापुरमध्ये एका कॉलेजच्या विद्यार्थ्यांने बंदूकीचा नेम धरुन कॉलेजच्या प्रार्यांना गंभीर जखमी केले आहे. प्राचार्यांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. एका विद्यार्थ्यांचे दुसऱ्या विद्यर्थ्यां सोबत भांडण झाले होते. या भांडणावरुन कॉलेजच्या प्राचार्यांनी त्या मुलाला तंबी दिली.त्याचा राग मनात ठेवुन त्या विद्यार्थ्यांने प्रार्यांवरच बंदूकीगोळी चालवली.

त्यामध्ये प्राचार्य गंभीर जखमी झाले आहेत. प्राचार्यांना लखनऊ येथे हलविण्यात आले आहे. हल्ला करणार‍ा विद्यार्थी हा फरार झाला आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. ही घटना सरदपूर पोलीस ठाण्याच्या क्षेत्रातील आदर्श राम स्वरुप इंटर कॉलेजमध्ये शनिवारी सकाळी 8.30 मिनीटांनी घडली. हल्ला करणाऱ्या विद्यार्थ्याचे नाव गुरविंदर सिंह असे आहे. तो अचानक प्राचार्यांच्या समोर आला आणि त्याने बँगेतून बंदूक काढली आणि एकापाठोपाठ एक अशा तीन गोळया प्राचार्यांवर झाडल्या. राम स्वरुपन इंटर कॉलेजच्या प्राचार्यांचे नाव रामस्वरुप वर्मा असे आहे.

मी प्राचार्यांना गोळी मारणार आहे असे सांगूनच हा विद्यार्थी घराबाहेर पडला होता. त्यामुळे त्याच्या पालकांनी त्याला असे काम करण्यापासून का अडवले नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार त्या विद्यार्थ्यांने शुक्रवारी शाळेत घडलेली घटना घरी सांगितली होती. मी उदया प्राचार्यांना मारणार आहे असे सांगून तो घरा बाहेर पडला. मात्र तो कसे काम करेल असे घरच्यांना वाटले नाही. प्राचार्यांची तब्बेत अतिशय खराब असल्यामुळे त्यांना उपचारासाठी लखनऊला हलविण्यात आले आहे.

रूपाली केळस्कर

Recent Posts

पाच वर्षांत सर्व भ्रष्टाचाऱ्यांवर कडक कारवाई होणार! झारखंडमधील सभेत पंतप्रधान मोदी यांची ग्वाही

जिथे सरकारे भ्रष्ट असतात तिथे निधीची कितीही तरतूद केली तरी विकास शक्य नाही, म्हणूनच आम्ही…

4 hours ago

जेडीएस नेते एचडी रेवन्ना यांना पोलिसांनी घेतले ताब्यात, प्रज्वल रेवन्ना फरार

अपहरणाचा आरोप झाल्यानंतर जेडीएस नेते एचडी रेवन्ना ( HD Revanna ) यांना पोलिसांनी ताब्यात (…

4 hours ago

देशात इंडिया आघाडीचे सरकार सत्तेवर येणे काळाची गरज- माजी आमदार वसंत गिते

गेली दहा वर्षे जनतेला भूलथापा देणाऱ्या केंद्रातील मोदी सरकारला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी इंडिया आघाडीला(India aghadi)…

5 hours ago

लोकसभा निवडणुकीत गद्दारांना चांगला धडा शिकवा- सुधाकर बडगुजर

गद्दारांना धडा शिकविण्याची (Teach traitors a good lesson) आयतीच संधी लोकसभा निवडणुकांमुळे चालून आली आहे.ही…

5 hours ago

भुजबळ साहेबांच्या सुचनेने महायुतीच्या उमेदवाराला निवडून आणणार –अंबादास खैरे

नाशिक लोकसभा मतदार संघातून शिवसेना पक्षाला उमेदवारी सोडल्यानंतर महायुतीच्या (Mahayuti) उमेदवाराला मंत्री छगन भुजबळांच्या सुचनेने…

5 hours ago

नाचणी खायचे फायदे

चांगल्या आरोग्यासाठी भाजी आणि फळांचे सेवन ज्याप्रमाणे गरजेचे आहे(Benefits of eating ragi). त्याचप्रमाणे आपल्या पोटामध्ये…

7 hours ago