एज्युकेशन

‘विद्यापीठांनी नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीला गती द्यावी’

विद्यापीठ आणि संलग्नित महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या तृयीयपंथी विद्यार्थ्यांची संपूर्ण शैक्षणिक फी विद्यापीठ भरणार आहे. यामुळे आता तृतीयपंथीयांना आता एकही रूपये खर्च करता येणार नाही. मोफत शिक्षण आता तृतीयपंथीयांना घेता येणार आहे. नवीन शैक्षणिक धोरण अंमलबजावणीसाठी आवश्यक त्या शैक्षणिक उपापयोजना करून नवीन शैक्षणिक धोरण अंमलबजावणीला अधिक गती द्यावी, असे सांगत संपूर्ण विद्यापीठाची फी ही संलग्नित महाविद्यालयात तृतीयपंथीयांसाठी शैक्षणिक फी विद्यापीठ भरणार असल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.

विद्यापीठ आणि संलग्नित महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या तृयीयपंथी विद्यार्थ्यांची संपूर्ण शैक्षणिक फी ही विद्यापीठाने स्वनिधीतून भरावी. त्याचप्रमाणे उच्च शिक्षण घेण्यासाठी तृतीयपंथीय विद्यार्थांना विद्यापीठाने पुढाकार द्यावा, असे आश्वासन  मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलं आहे. या निर्णयाचे सर्व कुलगुरूंनी मनापासून स्वागत केलं आहे. यामुळे आता यापुढे तृतीयपंथीयांना विद्यापीठ आणि संलग्नित महाविद्यालयात मोफत शिक्षण घेता येणार आहे.

हे ही वाचा

‘शासन आपल्या दारीचे महत्त्व घरात बसलेल्यांना काय कळणार’?

विराटच्या कर्णधार पदावर सौरव गांगुलीने सोडलं मौन

‘उद्धव ठाकरे आता तुमचा आणि हिंदुत्वाचा संबंध उरला नाही’

अठरा वर्षे पूर्ण झालेल्या नवमतदारांची नोंदणी

अठरा वर्षे पूर्ण झालेल्या नवमतदारांची नोंदणी व्हावी यासाठी निवडणूक विभागाच्या वतीने नवमतदार नोंदणी विद्यापीठ महाविद्यालयात राबवण्यात यावी. यामध्ये एनएसएसने पुढाकार घ्यावा, महाविद्यालयातील प्रवेश घेतलेल्या विद्यार्थांची नोंदणी होईल. बैठकीत नँक मूल्यांकन, आंतरविद्याशाखीय अभ्यासक्रम, कौशल्याभिमुख अभ्यासक्रम, उद्योजकांचा सहभाग, क्लस्टर महाविद्यालये, मातृभाषेतून शिक्षण, सीबीसीएस पद्धती, एबीसी प्राध्यापक भरती, प्रशिक्षण,सायबर गुन्हे, शैक्षणिक वेळापत्रक व गुणांकन कार्यपध्दतीचे अचूक नियोजन करावे. अशा चंद्रकांत पाटील यांनी यावेळी केल्या.

प्रमाणपत्र कोर्स अभ्यासक्रम

उच्च व तंत्र शिक्षणापासून काही विद्यार्थी दूर राहतात आणि ते विद्यार्थी व्यवसाय नोकरीत असतात, अशा विद्यार्थ्यांच्या मनात परीक्षेची भिती असते पास होतो का नाही या विद्यार्थ्यांसाठी ऑडिओ-व्हिज्युअल,उद्योगक्षेत्र यांची मदत घेऊन परीक्षा न घेता प्रमाणपत्र कोर्स अभ्यासक्रमाची यादी तयार करता येईल का याचाही विचार विद्यापीठाने करावा.

डॉ. होमी भाभा स्टेट युनिव्हर्सिटी मुंबई येथे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंमलबजावणीबाबत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीला उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी,महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्थेचे कार्यकारी संचालक डॉ. निपुण विनायक,उपसचिव अजित बाविस्कर,उच्च शिक्षण संचालक शैलेंद्र देवळाणकर,तंत्र शिक्षण संचालक डॉ. विनोद मोहितकर,सर्व अकृषी विद्यापीठाचे मा.कुलगुरू,सहसंचालक प्रकाश बच्छाव, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० सुकाणू समितीचे अध्यक्ष डॉ. नितीन करमळकर,प्राचार्य अनिल राव, स्टेट युनिव्हर्सिटी चे कुलगुरू इतर अधिकारी उपस्थित होते.

टीम लय भारी

Recent Posts

‘मराठी भाषेचे सीमोल्लंघन व्हावे’, सत्यजित तांबेंची CM एकनाथ शिंदे यांना विनंती

महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य सत्यजित तांबे यांनी देशातील अग्रगण्य विद्यापीठ असलेल्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात मराठी…

1 day ago

उपवासात करा ‘या’ फळांचे सेवन, त्वरित मिळणार ऊर्जा

7 सप्टेंबर 2024 हा दिवस भारत देशात खूप महत्वाचा मानला जाणारा आहे. याच दिवशी आपले…

2 days ago

पावसाळ्यात ‘अशी’ घ्या आपल्या त्वचेची काळजी

पावसाळा सुरु झाला असून, गर्मीमुळे काही सुटका झाली नाही. आता सुद्धा खूप जास्त गर्मी होत…

2 days ago

Ajit Pawar | अजित पवारांना सोम्यागोम्याच्या टपल्या

भाजपने पंकजा मुंडे यांच्याकडे पुण्यातील काही मतदारसंघांची जबाबदारी दिली आहे(BJP workers publicly expressed their displeasure).…

2 days ago

Ajit Pawar | Pankaja Munde | पंकजा मुंडेंसमोर भाजप कार्यकर्त्यांचा संताप, अजित पवारांसाठी डोकेदुखी

भाजपने पंकजा मुंडे यांच्याकडे पुण्यातील काही मतदारसंघांची जबाबदारी दिली आहे(Anger of BJP workers in front…

2 days ago

Sharad Pawar यांनी सांगितले, रामशेठ ठाकूर यांचे १०० कोटींचे महात्म्य ! Ramsheth Thakur

शरद पवार(sharad pawar) आज सातारा जिल्ह्यातील दौऱ्यावर आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सगळे राजकीय पक्ष व…

2 days ago