राज्यात आगामी लोकसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहे. अशातच आता अनेक पक्ष कंबर कसून आहेत. याचा फायदा येत्या लोकसभा निवडणुकीला राज्यात कोणाला होणार? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. भाजपने छत्तीसगड, मध्यप्रदेश, राजस्थानमध्ये विजय मिळवला आहे. या विजयावर (शिवसेना ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरेंनी एव्हीएमवर शंका उपस्थित केली होती. मात्र आता यावर भाजपने उद्धव ठाकरेंवर हल्ला बोल केला आहे. तेलंगणा आणि कर्नाटकमध्ये कॉंग्रेसचा विजय झाला तेव्हा लोकशाहीचा विजय आणि आता राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगडमध्ये भाजप जिंकल्यास एव्हीएमवर टीका करता अशी टीका भाजपने केली आहे, रडारडीचा डाव बस करा असं देथील वक्तव्य भाजपने केलं आहे.
यानंतर भाजपने उद्धव ठाकरेंचा आणि हिंदुत्वाचा संबंध नाही. ज्या दिवशी तुम्ही कॉंग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसलात त्या दिवशी तुमचं हिंदुत्व संपलं आहे. निवडणुकांच्या निकालापूर्वी उद्धव ठाकरेंनी भाजपवर टीका केली होती. त्यावर आता भाजपने प्रत्युत्तर दिलं आहे.
हे ही वाचा
इंडिया आघाडित बिघाडी?; ममता बॅनर्जींचा बैठकीला नकार, नितीशकुमार आजारी
महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या राष्ट्रीय स्मारकाची कार्यवाही सुरू
धनगर आरक्षणासाठी दहिवडीतील उपोषणकर्त्यांची मुंबईकडे पायपीट
काय म्हणाले भाजप?
पाच राज्यांच्या निवडणुकांनंतर उद्धव ठाकरेंनी भाजपवर कॉंग्रेस जिंकल्यानंतर लोकशाहीचा विजय असल्याचं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर आता यावर भाजपने उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. उद्धव ठाकरे तुमचा आणि हिंदुत्वाचा संबंध नाही. तुम्ही ज्या दिवशी कॉंग्रेससोबत गेलात त्या दिवशी हिंदुत्वाचा विचार गुंडाळून ठेवलात.
उद्धव ठाकरे तुमचा आणि हिंदुत्ववाचा आता काही संबंध उरला आहे का? ज्यादिवशी सत्तेसाठी तुम्ही काँग्रेससोबत जाऊन बसला त्याच दिवशी तुम्ही हिंदुत्वाचे विचार गुंडाळून ठेवलेत. राम मंदिर आमच्यासाठी राजकारणाचा मुद्दा नाही तो आमच्या अस्मितेचा मुद्दा आहे.
राम मंदिराच्या मुद्द्यांवर मंदिर वही…
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) December 5, 2023
राम मंदिर हा आमचा राजकारणाचा मुद्दा नाही तर आमच्या अस्मितेचा मुद्दा आहे. ज्यावेळी मंदिर वही बनायेंगे तारीख नही बतायेंगे अशा कॉंग्रेसने घोषणा केल्या होत्या. पण आता येत्या (२२ जानेवारी) दिवशी मंदिराचं लोकार्पण होणार आहे. यावेळी तुमच्या पोटात गोळा येणार आहे. कर्नाटक, तेलंगणात काँग्रेस जिंकली की लोकशाहीचा विजय आणि छत्तीसगड, मध्यप्रदेश, राजस्थानमध्ये भाजप जिंकली की एव्हीएमवर शंका सांगितली. बंद करा रडारडी, अशी जहरी टीका भाजपने उद्धव ठाकरेंवर केली आहे.