24 C
Mumbai
Sunday, March 3, 2024
Homeराजकीय'शासन आपल्या दारीचे महत्त्व घरात बसलेल्यांना काय कळणार'?

‘शासन आपल्या दारीचे महत्त्व घरात बसलेल्यांना काय कळणार’?

राज्यात आगामी लोकसभा निवडणुका लक्षात घेता राज्यातील पक्षांनी आपापल्या पातळीवर निवडणुकांच्या पूर्वतयारीला सुरूवात केली आहे. राज्यातील निवडणुकांचा निकाल हा आपल्याच बाजूने लागावा या आपेक्षेपोटी राजकीय नेत्यांनी ठिकठिकाणी सभा घेणं सुरू केलं आहे. अशातच पाच निवडणुकांच्या निकालाचा अभ्यास करता भाजप आघाडीवर आहे, तर तेलंगणा राज्यात कॉंग्रेसले यश मिळालं आहे. अशातच आता राज्यातील निवडणुकांच्या तोंडावर सत्ताधारी नेते बीड येथे शासन आपल्या दारी या कार्यक्रमाचे आयोजन केले गेले असताना उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंचं नाव न घेता, जे घरात बसून असतात त्यांना शासन आपल्या दारी कळणार आहे का? असा प्रश्न उपस्थित करत पलटवार केला आहे.

शासन आपल्या दारी या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कृषीमंत्री आणि आमदार धनंजय मुंडे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस त्याचप्रमाणे माजी आमदार पंकजा मुंडे उपस्थित होत्या. यावेळी एकनाथ शिंदेंनी शासन आपल्या दारी या कार्यक्रमाचे मोल पटवून सांगितले आहे, यावेळी त्यांनी विरोधकांवर टीका केली आहे. शासन आपल्या दारी ही बोगसगिरी आहे, असे म्हणणाऱ्यांनी लोकांचा आपमान केला आहे,असे वक्तव्य एकनाथ शिंदेंनी केलं आहे. मोठ्या संख्येने लोकं येत आहेत, ही पोटदुखी त्यांच्या छातीत धडकी भरवणारी आहे.

हे ही वाचा

विराटच्या कर्णधार पदावर सौरव गांगुलीने सोडलं मौन

‘उद्धव ठाकरे आता तुमचा आणि हिंदुत्वाचा संबंध उरला नाही’

इंडिया आघाडित बिघाडी?; ममता बॅनर्जींचा बैठकीला नकार, नितीशकुमार आजारी

मोदींची लाट

ग्रामपंचायतीत केवळ दोन तृतीयांश जागा मिळवल्या आहेत. निवडणुकांचे निकाल पाहता नरेंद्र मोदींची लाट दिसली आहे. लाट संपली असं म्हणणाऱ्यांना उत्तर मिळालं आहे. हे शेतकरी आणि कष्टकऱ्यांचं सरकार आहे, असे एकनाथ शिंदे म्हणाले आहेत. यानंतर कृषीमंत्री धनंजय मुंडेंनी सरकारने केलेल्या कामांबद्दल सरकारचे कौतुक केलं आहे.

काय म्हणाले धनंजय मुंडे?

तुम्ही या राज्याचे खरंच एकनाथ आहात असे वक्तव्य धनंजय मुंडेंनी वक्तव्य केलं आहे. यानंतर त्यांनी सर्वजण मिळून राज्याचा विकास करू असे आश्वासन धनंजय मुंडेंनी दिलं आहे. वैजनाथ देवस्थानासाठी २८३ कोटींचा निधी दिला आहे. कोकणात आपण कोकाकोला आता आमच्या हितं फॅंटा तरी द्या? अशी उद्योगाची मागणी धनंजय मुंडेंनी मुख्यमंत्र्यांना केली आहे.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी