34 C
Mumbai
Tuesday, May 21, 2024
Homeक्रीडाविराटच्या कर्णधारपदावर सौरव गांगुलीने सोडलं मौन

विराटच्या कर्णधारपदावर सौरव गांगुलीने सोडलं मौन

नुकताच देशात वनडे वर्ल्डकप होऊन गेला. तरीही या वर्ल्डकपमध्ये झालेला पराभव विसरता येत नाही. या वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाने चांगली कामगिरी केली. रोहित शर्माच्या कर्णधार पदाचेही कौतुक केले जात आहे. तर टीम इंडियाचा रन मशीन विराट कोहलीने (Virat kohli) मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा रेकॉर्ड मोडीत काढला, यामुळे तो अधिक चर्चेत आहे. मात्र वर्ल्डकप झाला तरीही टीम इंडियाचे खेळाडू विराट कोहली आणि रोहित शर्मा हे वेगळ्याच कारणाने चर्चेत आले आहेत. काही महिन्यांपूर्वी विराट कोहलीचे कर्णधारपद गेलं होतं, यावर टीम इंडियाचा माजी खेळाडू सौरव गांगुलीने विराटबाबत भाष्य केलं आहे. विराटने स्वतःहून कर्णधारपद सोडलं आहे. अशी माहिती आता सौरव गांगुलीने (Saurav Ganguly) दिली आहे.

दादागिरी अनलिमिटेड या रियालिटी शोमध्ये सौरव गांगुलीने सर्वच प्रश्नांची उत्तरं दिली. यावेळी सौरव गांगुलीने विराट कोहलीबद्दल वक्तव्य केलं आहे. सौरव गांगुली याआधी बीसीसीआयचे अध्यक्ष होते. यावेळी विराटने T-20 खेळताना नेतृत्व करायचे नाही, असे आपले मत व्यक्त केले, असे गांगुली म्हणाले. T-20 खेळताना नेतृत्व करण्याची इच्छा नसल्याचं विराट कोहलीनं सांगितलं. यावेळी गांगुलीने उर्वरित वनडे, T-20 आणि कसोटी सामन्यातूनही त्याने आपले स्वेच्छेने कर्णधारपद सोडलं आहे.

हे ही वाचा

‘उद्धव ठाकरे आता तुमचा आणि हिंदुत्वाचा संबंध उरला नाही’

इंडिया आघाडित बिघाडी?; ममता बॅनर्जींचा बैठकीला नकार, नितीशकुमार आजारी

महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या राष्ट्रीय स्मारकाची कार्यवाही सुरू

गांगुली म्हणाला की, मी विराटला कर्णधारपदावरून हटवलं नाही असे अनेकदा सांगितले आहे. विराटला T-20 मध्ये कर्णधारपद नको होतं. यामुळे आता वनडे क्रिकेटमधून पायउतार झाला तर बरं होईल, असा सल्ला गांगुलीने दिला होता. कसोटीसाठी एक आणि T-20 साठी एक कर्णधार असावा, असे गांगुली म्हणाला. यावेळी जर रोहित शर्मा तिन्ही फॉरमॅटसाठी खेळत असेल तर त्याला कर्णधारपद द्यावे, त्याने २०२४ च्या T-20 वर्ल्डकपसाठी संघाचे नेतृत्व करायला हवे.

रोहित शर्मा कर्णधार असणं आवश्यक

सध्या T20 चे कर्णधारपद हे सूर्यकुमार यादवकडे आहे. तर वनडेचे कर्णधारपद हे लोकेश राहुलकडे आहे. मात्र या तिन्ही फॉरमॅटमध्ये रोहित शर्माला संधी दिल्यास, त्याला आणखी एखादी संधी मिळणं सोपं होईल. २०२३ च्या वर्ल्डकपमध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने चांगली कामगिरी केली. यामुळे T-20 वर्ल्डकपमध्ये टीम इंडिया कर्णधार रोहित शर्मा राहील.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी