एज्युकेशन

मुंबई विद्यापीठात झाली नवीन उपक्रमाची सुरुवात, कुलगुरू करणार विद्यार्थ्यांशी संवाद

मुंबई विद्यापीठ नेहमी आपल्या विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या उपक्रम करतात. यातच आता मुंबई विद्यापीठाने विविध शैक्षणिक विभाग आणि संलग्नित महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नवीन उपक्रम सुरु केला आहे. या उपक्रमात विद्यार्थी थेट कुलगुरू यांच्याशी संवाद साधता येणार आहे. मुंबई विद्यापीठाने ‘कुलगुरू संवाद’ या अभिनव उपक्रमाला सुरुवात केली. (Mumbai University vice chancellor ravindra kulkarni interaction with students)

तसेच विद्यापीठात महिन्याचा पहिल्या आणि तिसऱ्या बुधवारी ‘विद्यार्थी संवाद’ या कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार आहे. यावेळी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी हे विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. विद्यार्थी संवाद उपक्रमासाठी प्र-कुलगुरू प्राचार्य डॉ. अजय भामरे, कुलसचिव प्रा. बळीराम गायकवाड, परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालिका डॉ. पूजा रौंदळे आणि संबंधित अधिकारी उपस्थित राहणार आहेत. (Mumbai University vice chancellor ravindra kulkarni interaction with students)

दिव्यांगांच्या मदतीसाठी समाजातील प्रत्येक घटकाने एकमेकांना सहाय्य करत पुढे यावे; डॉ. काकोडकरांचे आव्हान

मुंबई विद्यापीठातील पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक व अनुषंगिक बाबींशी निगडीत प्रश्न, शंका, समस्या यांचे निवारण मिळण्यासाठी या ‘विद्यार्थी संवाद’ या कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे. या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेता पात्रता व नावनोंदणी, गुणपत्रिका, पदवी प्रमाणपत्र यासह परीक्षा विभागाशी निगडीत बाबींचे निरसन करण्यावर भर दिला जाणार आहे. (Mumbai University vice chancellor ravindra kulkarni interaction with students)

खास म्हणजे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने येत्या शैक्षणिक वर्षापासून मुंबई विद्यापीठातील सर्व बिगर संलग्नित महाविद्यालयात तीन आणि चार वर्षांचे सर्व विद्याशाखेचे अभ्यासक्रम राबवले जाणार आहेत. हे अभ्यासक्रम राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने राबवले जाणार आहेत. यामध्ये सहा व्हर्टिकल (घटक) नुसार विद्यार्थ्यासाठी उपलब्ध असलेल्या विविध मेजर, मायनर, ओपन इलेक्टिव्ह, व्होकेशनल स्कील कोर्सेस, एबिलिटी एनहान्समेंट कोर्सेस यांच्यासह भारतीय ज्ञान प्रणाली आणि कार्यांतर्गत प्रशिक्षण अशा विविध सहा व्हर्टिकल मधील विषयांबाबतही विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन केले जाणार आहे. (Mumbai University vice chancellor ravindra kulkarni interaction with students)

मुंबई विद्यापीठाने घेतला मोठा निर्णय, रशियातील मास्को स्टेट विद्यापीठाशी केला सामंजस्य करार

‘विद्यार्थी संवाद’ हा कार्यक्रम 03 एप्रिल आणि 18 एप्रिल 2024 रोजी सकाळी 11 ते 12.30  वाजेदरम्यान मुंबई विद्यापीठाच्या विद्यानगरी संकुलातील छत्रपती शिवाजी महाराज भवन (नवीन परीक्षा भवन) येथे आयोजित केला जाणार आहे. तसेच, या उपक्रमात सहभागी होण्यासाठी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी त्यांचे ओळखपत्र सोबत आणने अनिवार्य असेल.  (Mumbai University vice chancellor ravindra kulkarni interaction with students)

काजल चोपडे

Recent Posts

पुणे अपघात प्रकरण दडपणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करा: अतुल लोंढे

पुण्यातील कल्याणीनगर मध्ये एका बिल्डरपुत्राने रॅश ड्रायव्हिंग करत दोघांना चिरल्याचे प्रकरण पुणे पोलिसांनी अत्यंत निष्काळजीपणे…

9 mins ago

भाजपच्या फायद्यासाठी निवडणूक आयोगाच्या उपाययोजना !

लोकसभा निवडणुकीचा महाराष्ट्रातील शेवटचा टप्पा सोमवारी संपला. पण हा पाचवा टप्पा निवडणूक आयोगाने घोळ घातल्यामुळे…

3 hours ago

मिल्ट्री कॅम्पच्या माध्यमातून व्यक्तिमत्व विकास साधता येतो – डॉ संदीप भानोसे

आजच्या आधुनिक युगात जगण्याचा वेग 4G पेक्षाही वेगवान झाला आहे ! परिणामी दैनंदिन जीवनातले ताणतणाव,…

4 hours ago

मधमाशी शेतकऱ्याला भरभरून देते, पण शेतकरी तिला मारून टाकतो

महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग कार्यमंडळाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी बिपिन जगताप यांनी लय भारीला मधमाश्यांविषयी…

4 hours ago

मधमाशी सौंदर्य खुलवते, आजार बरे करते

सदर व्हिडीओ मध्ये बिपीन जगताप उपमुख्य कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग महामंडळ आपणास…

4 hours ago

मधमाशीकडून शिका बिझनेस मॅनेजमेंट

महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग कार्यमंडळाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी बिपिन जगताप यांनी लय भारीला मधमाश्यांविषयी…

6 hours ago