33 C
Mumbai
Saturday, April 27, 2024
Homeएज्युकेशनमुंबई विद्यापीठाने घेतला मोठा निर्णय, रशियातील मास्को स्टेट विद्यापीठाशी केला सामंजस्य करार

मुंबई विद्यापीठाने घेतला मोठा निर्णय, रशियातील मास्को स्टेट विद्यापीठाशी केला सामंजस्य करार

मुंबई विद्यापीठातील विद्यार्थ्यांसाठी खुशखबर आहे. मुंबई विद्यापीठाने रशियातील मास्को स्टेट विद्यापीठाशी शैक्षणिक सामंजस्य करार केला आहे. यामुळे मुंबई विद्यापीठातील विद्यार्थ्यांना लाभ होणार आहे. तसेच, दोन्ही विद्यापीठांदरम्यान विद्यार्थी-शिक्षक आदान–प्रदान, विविध विद्याशाखातील शैक्षणिक कार्यक्रम, विविध ज्ञानशाखांत संशोधन, सह सांस्कृतिक कार्ये आणि शैक्षणिक साहित्य-संसाधन निर्मिती व हस्तांतरण अशा विविध क्षेत्रातील संधीचे दालन यानिमित्ताने खुले होणार आहे. (Mumbai University MoU with Moscow State University in Russia)

कोश्यारींनी अंबानीकडूनही देणग्या घेतल्या; निनावी पत्राद्वारे माहिती उघड

या  करारामुळे दोन्ही विद्यापीठातील प्राध्यापक आणि संशोधक परिषदा, कार्यशाळा आणि व्याख्यानात सहभागी होऊ शकतील. तसेच अध्ययन आणि संशोधनासाठी एकत्रिक कार्य करू शकतील. याच कराराच्या अनुषंगाने स्मार्ट डिजीटल लर्निंग, सांस्कृतिक समन्वय आणि सहकार्यासाठी मुंबई विद्यापीठात व्याख्यान कक्षाच्या निर्मितीसाठी मास्को स्टेट विद्यापीठाने स्वारस्य दाखवले आहे.

मुंबई विद्यापीठाने विविध देशासोबत शैक्षणिक सामंजस्य करार केले आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना अनुभवात्मक आणि कौशल्य प्रशिक्षण, श्रेणी हस्तांतरण, दुहेरी पदवी, सह पदवी, ऑनलाईन आणि प्रत्यक्ष इंटर्नशिप, कृत्रिम बुद्धीमत्ता व इतर प्रगत ज्ञानशाखात अध्ययन व संशोधन करायचे नवीन माध्यम मिळतील. दोन्ही विद्यापीठातील शैक्षणिक पद्धतीमुळे विद्यार्थ्यांना  लाभ होणार आहे. या करारामुळे र्वोत्कृष्ट शैक्षणिक आणि संशोधन पद्धतींच्या सामायिकरणास प्रोत्साहन मिळू शकेल. (Mumbai University MoU with Moscow State University in Russia)

नेव्हल डॉकयार्ड मुंबई येथे भरती सुरु, 8वी आणि 10वी उत्तीर्ण उमेदवार करू शकतात अर्ज

मुंबई विद्यापीठाच्या फोर्ट संकुलात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी, प्र. कुलगुरू प्राचार्य डॉ. अजय भामरे, कुलसचिव प्रा. बळीराम गायकवाड, अधिष्ठाता वाणिज्य व व्यवस्थापन प्रा. कविता लघाटे, अधिष्ठाता विज्ञान व तंत्रज्ञान प्रा. शिवराम गर्जे, आंतरराष्ट्रीय संबंध आणि सामरिक अभ्यास केंद्राचे संचालक प्रा. बी. व्ही. भोसले, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय साहचर्य व विद्यार्थी सहाय्य केंद्राचे समन्वयक डॉ. सुनील पाटील, नवोपक्रम, नवसंशोधन आणि साहचर्य मंडळाचे संचालक डॉ. सचिन लढ्ढा यांच्यासह मास्को स्टेट विद्यापीठाकडून अलेक्सी लेबेडेव्ह, संचालक, कला-पॉडगोटोव्हका, आंद्रे सेरोव उपाध्यक्ष, गॅझप्रॉमबँक, मिस्टर इगोर बोचकोव्ह, डेप्युटी व्हाईस-रेक्टर- आंतरराष्ट्रीयीकरण विभागाचे अध्यक्ष, आणि रशियाच्या मॉस्को स्टेट युनिव्हर्सिटीच्या आंतरराष्ट्रीय सहकार्य विभागाचे मिस्टर युरी माझेई हे उपस्थित होते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी