32 C
Mumbai
Sunday, May 5, 2024
Homeआरोग्यदिव्यांगांच्या मदतीसाठी समाजातील प्रत्येक घटकाने एकमेकांना सहाय्य करत पुढे यावे; डॉ. काकोडकरांचे...

दिव्यांगांच्या मदतीसाठी समाजातील प्रत्येक घटकाने एकमेकांना सहाय्य करत पुढे यावे; डॉ. काकोडकरांचे आवाहन

थेट मेंदूचीच ‘सत्व परीक्षा’ घेणाऱ्या गुंतागुंतीच्या ‘सेरेब्रल पाल्सी’ (Cerebral Palsy ) या दिव्यांगत्वाला आयुष्यभर सोबत घेवून उल्लेखणीय कार्य करणाऱ्या बुद्धीवंतांना प्रसिद्ध अणुशास्त्रज्ञ, पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करत गौरव करण्यात आला. या कार्यक्रमामध्ये डॉ. काकोडकर यांच्यासह ऑक्सिस फायनान्सचे व्यवस्थापकीय संचालक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी बीपीन सराफ, मुंबई विद्यापठाचे कुलगुरु प्राध्यापक रविंद्र कुलकर्णी महाराष्ट्र टाईम्सचे निवासी संपादक समीर कर्वे हे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते. यावेळी डॉ. नंदिनी गोकुलचंद्रन, संस्थेचे विश्वस्त यशवंत मोरे, संदीप अग्रवाल आदी उपस्थित होते. सेरेब्रल पाल्सी असलेल्या व्यक्तींच्या पुनर्वसनासाठी कार्यरत असलेल्या राज्याच्या वेगवेगळ्या भागातील संस्थांना यावेळी उत्थान रत्न पुरस्कार तर व्यक्तींना रत्नश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. (Cerebral Palsy Divyang Dr. Anil Kakodkar presented award)

थेट मेंदूचीच ‘सत्व परीक्षा’ घेणाऱ्या गुंतागुंतीच्या ‘सेरेब्रल पाल्सी’ (Cerebral Palsy ) या दिव्यांगत्वाला आयुष्यभर सोबत घेवून उल्लेखणीय कार्य करणाऱ्या बुद्धीवंतांना प्रसिद्ध अणुशास्त्रज्ञ, पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करत गौरव करण्यात आला. या कार्यक्रमामध्ये डॉ. काकोडकर यांच्यासह ऑक्सिस फायनान्सचे व्यवस्थापकीय संचालक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी बीपीन सराफ, मुंबई विद्यापठाचे कुलगुरु प्राध्यापक रविंद्र कुलकर्णी महाराष्ट्र टाईम्सचे निवासी संपादक समीर कर्वे हे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते. यावेळी डॉ. नंदिनी गोकुलचंद्रन, संस्थेचे विश्वस्त यशवंत मोरे, संदीप अग्रवाल आदी उपस्थित होते. सेरेब्रल पाल्सी असलेल्या व्यक्तींच्या पुनर्वसनासाठी कार्यरत असलेल्या राज्याच्या वेगवेगळ्या भागातील संस्थांना यावेळी उत्थान रत्न पुरस्कार तर व्यक्तींना रत्नश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. (Cerebral Palsy Divyang Dr. Anil Kakodkar presented award)

बसवराज पैके (लातूर), अमोल वडगावकर (पुणे), डॉ. आदित्य लोहिया (नागपूर), अमित बाहेती (नागपूर), रिद्धी गाडा (मुंबई) यांना रत्नश्री पुरस्काराने गौरवण्यात आले. तर स्वयम् रिहॅबिलिटेशन ट्रस्टच्या (ठाणे) श्रेया देवळालकर (सेरेब्रल पाल्सीग्रस्त), तिची आई निता, वडील राजीव देवळालकर, लातूर येथील रा. स्व. संघ जनकल्याण समिती संचालित संवेदना प्रकल्पाच्या डॉ. योगेश निटूरकर आणि व्यकंट लामजने, फेरो इक्वीप च्या फर्डिनांड रॉड्रिग्ज व फ्लाइड पिंटो, फिनिक्स स्पोर्टसचे संस्थापक साईनाथ हटंगडी व सचिव मिनल वागळे यांना उत्थान रत्न पुरस्काराने गौरवण्यात आले.

यावेळी दिव्यांगांना संबोधीत करताना डॉ. अनिल काकोडकर यांनी दिव्यांग व्यक्तींनाही सर्वसामान्य नागरिकांप्रमाणे संधी मिळायला हव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच यावेळी त्यांना आलेले अनुभवदेखील सांगितले.

काय म्हणाले डॉ. काकोडकर?

एआयसारख्या युगामध्ये तंत्रज्ञानाची जोड घेऊन दिव्यांग व्यक्तींसाठी अधिकाधिक संधी निर्माण करण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने एकमेकांना सहकार्य करत पुढे जायला हवे, अस यावेळी काकोडकर म्हणाले. या संस्था व व्यक्तींच्या उत्तुंग कार्याचे डॉ. काकोडकर यांनी कौतुक केले. शैक्षणिक सुविधांसह तंत्रज्ञानाच्या मदतीने सुविधांची उपलब्धता अधिकाधिक करून दिली तर शारीरिक मर्यादांवर मात करून दिव्यांग व्यक्तींनाही प्रगती करण्यासाठी निश्चित मदत होईल. प्रत्येक विद्याथ्यांचा विकास हे राष्ट्रीय शिक्षण धोरणाचे वैशिष्ट्य आहे. हे उद्दिष्ट दिव्यांग व्यक्तींसंदर्भातही असायला हवे, असे ते यावेळी म्हणाले.

जगण्यासाठी अपंगांचा संघर्ष; ‘फेरो इक्वीप’ संस्थेने दिला मदतीचा हात

शिक्षणाच फार मोठं महत्त्व आहे. प्राध्यापक रवींद्र कुलकर्णी सर येथे उपस्थित आहेत. सध्या नॅशनल एज्युकेशन पॉलिसी वर खूप काम करता येते. नॅशनल एज्युकेशन पॉलिसीचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे विद्यार्थी केंद्रीय शिक्षण आणि प्रत्येक विद्यार्थ्याला आपापल्या गतीनुसार पुढे जाण्याची मुभा असली पाहिजे ज्याला एखादी गोष्ट लवकर समजते तो अधिक लवकर पुढे जाऊ शकतो ज्याला जरा वेळ लागतो त्याला मदत करून त्यांना पण पुढे नेण्यास मदत करु शकतो.

थोडंसं व्यक्तिगत लक्ष आणि त्या अनुषंगाने त्याच्या त्याला पुढे नेण्याचा निर्णय हे एक महत्त्वाचं उद्दिष्ट आपल्या नॅशनल एज्युकेशन पॉलिसी पुढे मग आता आपण दिव्यांगा बद्दल विचार केला सेरेब्रल पाल्सी म्हणा किंवा इतर कुठल्या प्रकारच्या समस्या असतील तरी त्यांच्यासाठी व्यक्तिगत लक्ष असणं त्यांच्यासाठी व्यक्तिगत सुविधा असणं कॉमन प्रेसेस मध्ये त्यांच्यासाठी सोयी असणं हे अत्यंत आवश्यक आहे.

समाजाने नाकरलेल्या दिव्यांगांना नवी उमेद देणारी ‘फिनिक्स स्पोर्टस’

आता समजा सेरेब्रल पाल्सी याच्यामध्ये ब्रेन आणि शहरातले मोबिलिटी रिलेटेड मोटर कनेक्शन जे आहेत तिथे कुठेतरी बिघाड होतो आणि म्हणून मग या समस्या निर्माण होतात. अशा व्यक्तींना मेनस्ट्रीम एज्युकेशन मध्ये सर्व प्रकारच्या सोयी उपलब्ध असतील आणि जर नसतील तर आपण करून उपलब्ध करायला हव्यात आणि ते करताना मग त्याच्यासाठी वेगवेगळ्या सुविधा असणं पण खूप आवश्यक आहे.

म्हणजे अगदी एक्सट्रीम उदाहरण घ्यायचं तर मागे प्रथम मला नाव नाही आठवत पण मागे आपण बातमी वाचली असेल किंवा एखादा व्हिडिओ पण बघितला असेल की ऑलिंपिक मध्ये पॅराऑलिमिक्स मध्ये एक व्यक्ती दोन्ही पायांनी अधू होते. पण त्यांनी एक नवीन प्रकारचे कॅलिपर्स किंवा ते त्याला उपकरण लावलं आणि त्यांच्या धावण्याची गती इतकी जास्त होती की लोकांना वाटलं की हे नॉर्मल ओलंपिक मध्ये धावले.

त्यांनी एक टेक्नॉलॉजी त्याच्याबरोबर विकसित केली आणि अर्थातच ते जे कृत्रिम पाय आहेत त्यांच्यामध्ये जी काही कमी आहेत त्याच्यावर विचार करून ती कॅपॅबिलिटी कशी वाढवता येईल यासाठी म्हणून ते पाय निर्माण केले होते आणि म्हणून मग त्यांच्यामध्ये ते लावण्याची शक्ती ते इतर माणसांपेक्षा अधिक गतीने जाऊ शकत होते सांगायचा मुद्दा असा की आपण जर अशा प्रकारच्या सोयी निर्माण केल्या पाहिजेत. असं सांगत डॉ. काकोडकरांनी एक किस्सा शेअर केला.

एक उत्तर प्रदेश मधले एक ग्रस्त त्यांचा सायकल रिपेअरचा धंदा होता. त्यांची पत्नी ही पोलिओग्रस्त होती. तिला चालायला फिरायला त्रास होत होता. सायकल्या संकप्लनेच्या आधारावर त्यांनी पत्नीसाठी कॅलिपर्स म्हणजे नॉर्मल कॅलिपर्स मिळतात त्यांना ते तशी सोय करून हवी होती म्हणून त्यांनी ते स्वतः तयार केलं ते उपकरण होतं. ते चांगल चालत होत. पण त्यांना वाटलं की हेच खूप क्रूड त्यासाठी ते मेडीथॉनमध्ये आले आणि त्यांना त्यांनी केलेल्या उपकरणामध्ये सुधार करायची होती.

दिव्यांगत्व आलं तरी व्हीलचेअर तिच्या यशाच्या आडवी आली नाही, वाचा रिद्धीची यशोगाथा

मात्र, ते केवळ आठवी पास होते. त्यांना आयआयटीमध्ये कसं सिलेक्ट करायचं असा प्रश्न पडला. त्यावेळी संस्थेने खूप विचार केला नॉर्मली असे करायचं कोर्सच्या ऍडमिशन नव्हती तरी आयआयटीमध्ये एखादे डेव्हलपमेंट आर एन डी करायचं झालं तर काहीतरी दर्जा पाहिजे मग त्यांना प्रश्न पडला त्यांना कसं घ्यायचं पण खूप विचार केल्याने त्यांना ठरवलं की इतर मेडिथॉन मध्ये सिलेक्ट केलेल्या मंडळींच्या बरोबर यांना पण आपण सिलेक्ट करूया. कारण त्यांनी केलेलं काम तितकच नावीन्यपूर्ण होतं. त्यानंतर त्यांनी दोन वर्षांनी आपलं स्वतःचा प्रोडक्ट निर्माण केलं त्यासाठी त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत.

सांगायचा मुद्दा असा की आपण जर अशा प्रकारचा उपक्रम घेऊ शकलो शैक्षणिक संस्था सामाजिक संस्था आणि इतर वॉलेटरी ऑर्गनायझेशन यांच्या सहकार्याने तर मला वाटतं सर्व सेरेब्रल पाल्सी सामना करणाऱ्या बऱ्याच मंडळींसाठी आपण वेगळ्या प्रकारची उपकरण ज्याने त्यांचे शिक्षण अधिक सुपर होईल त्यांची सक्षमता अधिक वाढेल आणि इतर नॉर्मल पार्ट ऑफ द सोसायटी पण डेक्कन बिकम मोर इफेक्टिव्ह पार्ट ऑफ द सोसायटी अशा प्रकारची व्यवस्था करणं सहज शक्य आहे असही डॉ. काकोडकर म्हणाले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी