एज्युकेशन

Rashtriya Indian Military College : इंडियन मिलिटरी कॉलेजमध्ये पहिल्यांदाच मुलींना संधी, वाचा सविस्तर…

लष्करात सामील होऊन देशाचे रक्षण करण्याचे स्वप्न अनेकांचे असते. या संधीकडे मुलांचा कल जास्त पाहायला मिळतो, मुली जरी इच्छुक असल्या तरीही त्यांच्यासाठी अजूनही तेवढ्या संधी उपलब्ध नाहीत, परंतु यावेळी चित्र थोडेसे बदलले असून शंभर वर्षांच्या इतिहासात असे काही घडले नव्हते ते आता घडले आहे. राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज म्हणजे लष्कराच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जाणारी शिक्षण संस्था. या संस्थेच्या शंभर वर्षांच्या इतिहासात संस्थेने प्रथमच दोन मुलींना प्रवेश दिला आहे, त्यामुळे लष्कराच्या दृष्टीने ही महत्त्वाची गोष्ट मानली जात असून मुलींना सुद्दा लष्कराचे दालन आता खुले झाले आहे.

हाती आलेल्या माहितीनुसार, इंडियन मिलिटरी कॉलेजची यंदाची जुलै 2022 ची बॅच सोमवार पासून सुरू झाली आहे. संस्थेच्या शंभर वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच यंदाच्या बॅचमध्ये इयत्ता ८वीच्या वर्गात दोन विद्यार्थिनींना प्रवेश देण्यात आलेला आहे. पहिल्यांदाच मुलींसाठी सुद्धा ही संधी उपलब्ध करून दिल्याने सेंट्रल कमांडचे जनसंपर्क अधिकारी शंतनू प्रताप सिंग यांनी महाविद्यालयासाठी हा ऐतिहासिक क्षण असे म्हणून त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. या दोन विद्यार्थिनींमधील एक मुलगी हरियाणाची असून दुसरी डे स्कॉलर असल्याचे सांगण्यात आले आहे.

हे सुद्धा वाचा…

Mansson Alert : राज्यात परतीच्या पावसाला सुरुवात! अनेक ठिकाणी यलो अलर्ट जाहिर

Eknath Shinde Camp: बाळासाहेब ठाकरेंचा सर्वात जवळचा व्यक्तीसुद्धा एकनाथ शिंदे गटात सामिल

Chinese food : सावधान ! तुम्ही चायनीज पदार्थ आवडीने खाताय ; मग हे वाचाच……

RIMC कमांडंट कर्नल अजय कुमार यांनी मार्चमध्ये संस्थेच्या स्थापना दिनादरम्यान घोषणा करत आरआयएमसीमध्ये मुलींना प्रवेश देणार असल्याचे सांगितले होते, सदर निर्णय सरकारने महिलांसाठी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीची संधी उपलब्ध करून देण्याच्या धर्तीवर घेण्यात आला आहे. याच अनुशंघाने संस्थेत मुलींना सुद्धा सहभागी करून घेतले जाईल असे अजय कुमार यांनी स्पष्ट केले होते. सदर संस्था मुलींसाठी योग्य बनण्यासाठी सर्व आवश्यक मुल्याकन करण्यासाठी एक समिती गठीत करण्यात येणार असल्यातचे सुद्धा कुमार यांनी सांगितले होते.

या अनोख्या क्षणी बोलताना आरआयएमसीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, या बॅचमध्ये मुलींसाठी पाच जागा असल्या तरी, केवळ दोनच मुलींना प्रवेश मिळण्याची प्रक्रिया पूर्ण करता आली. पुढील वर्षी जानेवारीच्या बॅचपासून मुलींच्या जागा वाढवण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. पाच जागांसाठी देशभरातून एकूण 568 मुलींनी अर्ज केला होता, असे म्हणून मुलींच्या प्रवेश प्रक्रियेबाबत त्यांनी सविस्तरपणे सांगितले.

राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज म्हणजेच RIMCची स्थापना 13 मार्च 1922 रोजी झाली. भारतीय तरुणांनी लष्करी प्रशिक्षण देण्याच्या उद्देशाने सुरू झालेली ही संस्था जेणेकरून ब्रिटिश भारतीय सैन्यात अधिकारी म्हणून स्थान मिळेल. स्वातंत्र्यानंतर संस्थेचे उद्दिष्ट काहीसे बदलले असले तरीही संस्थेचे मूळ बदललेले नाही. आता मुलांसोबत मुलींना सुद्धा लष्करी शिक्षण मिळणार असल्याने आरआयएमसीचे हे एक धाडसी आणि ऐतिहासिक पाऊल असेच म्हटले जात आहे.

सुचित्रा पेडणेकर

Recent Posts

नाशिक जिल्ह्यातील सभांच्या केंद्रस्थानी राहिला कांदा

जिल्हयात बुधवारी (ता.१५) महायुतीच्या उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांसह भाजप नेत्यांनी सभा,…

22 hours ago

५० हजाराची लाच घेतांना शिक्षणाधिकाऱ्याला अटक

शाळा बंद असल्याचे प्रमाणपत्र देण्यासाठी तसेच अल्प संख्यांक विकास बहुउद्देशीय संस्थेच्या अंतर्गत येणाऱ्या गुजराथी माध्यमिक…

1 day ago

‘गाभ’ सिनेमा या दिवशी होणार प्रदर्शित

सध्या अनेक सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. वेग-वेगळे विषय घेवून अनेक सिनेमा रिलीज झाले आहेत.…

1 day ago

केंद्रात नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान होणार – मंत्री छगन भुजबळ

जगात भारताची प्रतिमा उंचावण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी महत्वाचे निर्णय घेतल्यामुळे आज आपला…

1 day ago

नाशिक – दिंडोरीमध्ये भाजप – शिंदे गट संकटात, पत्रकार विक्रांत मते यांचे विश्लेषण

लोकसभा निवडणुकीचा चौथा टप्पा पार पडलेला आहे. याच पार्श्वभूमीवर लय भारीची टीम गेले काही दिवस…

2 days ago

पिंपळगावच्या मोदींच्या सभेआधी पाच शिवसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेत ठेवले नजरकैदेत

आज मंगळवारी पिंपळगाव येथे होणाऱ्या जाहीर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेत (Modi's rally) खोट्या आश्वासनाबद्दल जाब…

2 days ago