30 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeमहाराष्ट्रMansson Alert : राज्यात परतीच्या पावसाला सुरुवात! अनेक ठिकाणी यलो अलर्ट जाहिर

Mansson Alert : राज्यात परतीच्या पावसाला सुरुवात! अनेक ठिकाणी यलो अलर्ट जाहिर

मबहाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक आंनदाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्रीत सध्या मान्सूनमधील परतीच्या पावसाची चाहूल लागली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

सध्या महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर पावसाने थैमान घातले आहे. अशा परिस्थितीत पावसाची ओघ कमी व्हावा अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. अशांतच आता शेतकरी आणि पावसामुळे जनजीवन विस्कळित झालेल्या सर्व नागरिकांसाठी एक आंनदाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्रीत सध्या मान्सूनमधील परतीच्या पावसाची चाहूल लागली आहे. राज्यात अनेक ठिकाणी ऊन आणि थंडीचे प्रमाण वाढल्याचे आढळून येत आहे. राज्यातील मध्य भागात ढगाळ हवामान असल्याने 26 सप्टेंबर रोजी पावसाची रिमझिम सुरू होती. तर 27 सप्टेंबर रोजी उत्तर महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात पाऊस हजेरी लावेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. त्यामुळे राज्यात परतीच्या पावसाने हजेरी लावली असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

सध्या कोकणासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हलक्या हलक्या पावसाच्या सरी बरसत असून उस्मानाबाद, बीड, लातूर अहमदनगर या जिल्ह्यांतील अनेक ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. 27 सप्टेंबररोजी उत्तर महाराष्ट्रातील धुळे, जळगाव शिवाय मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, परभणी, नांदेड, लातूर आमइ हिंगोली या जिल्ह्यांत विजेच्या कडकडात पावसाने उपस्थिती दर्शवली. यासोबतच राज्यांतील इतर ठिकाणी तुरळक पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

हे सुद्धा वाचा

Eknath Shinde Camp: बाळासाहेब ठाकरेंचा सर्वात जवळचा व्यक्तीसुद्धा एकनाथ शिंदे गटात सामिल

Chinese food : सावधान ! तुम्ही चायनीज पदार्थ आवडीने खाताय ; मग हे वाचाच……

Tollywood Actor In Marathi Film : मृण्मयीच्या आगामी चित्रपटात झळकणार दाक्षिणात्य अभिनेता

मान्सूनने भारताच्या वायव्येकडून परतीचा प्रवास सुरू केला असल्याची माहिती समोर आली आहे. मागील आठवड्यात राजस्थानातील अनेक ठिकाणी पाऊस परतल्याच्या बातम्या आल्या होत्या. त्यानंतर पावसाच्या परतीसाठी सध्याचे वातावरण पोषक असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. शिवाय येत्या 2 ते 3 दिवसांत वायव्य आणि मध्य भारतात पाऊस पुनरागमन करेल असे भाकित वर्तवण्यात आले होते. त्यामुळे महाराष्ट्रातील धुळे, जळगाव, औरंगाबाद, जालना, परभणी, लातूर, नांदेड आणि हिंगोली या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आलेला आहे.

दरम्यान, यंदाच्या वर्षी पावसाने महाराष्ट्रासह भारतात अनेक ठिकाणी थेमान घातले आहे. अनेक ठिकाणी शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असल्याची माहिती समोर आली होती. याच विषयावरून काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र विधानसभेतील वातावरण तापल्याचे पाहायला मिळाले होते. महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत ताबडतोब ओला दुष्काळ जाहिर करावा अशी मागणी विरोधकांकडून करण्यात आली होती. त्यामुळे आता पाऊस लवकरच भारतातून परतणार असल्याच्या बातमीने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी