30 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeमहाराष्ट्रEknath Shinde Camp: बाळासाहेब ठाकरेंचा सर्वात जवळचा व्यक्तीसुद्धा एकनाथ शिंदे गटात सामिल

Eknath Shinde Camp: बाळासाहेब ठाकरेंचा सर्वात जवळचा व्यक्तीसुद्धा एकनाथ शिंदे गटात सामिल

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बाळासाहेबांची विचारसरणी जोपासत असल्यामुळे आपण शिंदे यांच्या गटात सामिल झाल्याचे थापा यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले.

शिवसेना (Shivsena) पक्षाचे संस्थापक आणि हिंदुहृदयसम्राट म्हणून संपूर्ण देशात नावाजले जाणारे दिवंगत बाळ ठाकरे (Bal Thackeray) यांचे सहाय्यक असलेले चंपा सिंग थापा यांनी सोमवारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेच्या गटात प्रवेश केला. मुख्यमंत्री शिंदे नवरात्रीच्या (Navratri) मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी ठाण्यातील टेंभी नाका परिसरात गेले होते. तेथे थापा यांचा शिंदे यांच्या हस्ते स्वागत व सत्कार करण्यात आला. थापा यांनी शेवटच्या श्वासापर्यंत ठाकरेंची सेवा केली होती आणि ते मातोश्रीवर सेनेच्या संस्थापकांच्या जवळच्या व्यक्तींपैकी एक होते. ते प्रत्येक प्रसंगी बाळ ठाकरेंसोबत दिसत होते आणि 2012 मध्ये बाळा ठाकरेंच्या अंत्यसंस्काराच्यावेळी ते उद्धव ठाकरेंसोबत दिसले होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बाळासाहेबांची विचारसरणी जोपासत असल्यामुळे आपण शिंदे यांच्या गटात सामिल झाल्याचे थापा यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले. उद्धव ठाकरे यांची विचारधारा तुम्हाला आवडत नाही का, असे मीडियाने विचारले असता थापा म्हणाले की, मला त्यांच्या विचारसरणीबद्दल माहिती नाही, परंतु मला शिंदे साहेबांसोबत सामील व्हावे असे वाटले म्हणून मी येथे आलो आणि त्यांच्या गटात प्रवेश केला आहे.

हे सुद्धा वाचा –

Supreme Court : ठाकरे गटाच्या वकीलांकडून शिंदेगटाची कोंडी!

PFI : तपास यंत्रणांनी पुन्हा एकदा ‘पीएफआय’ ला केले खिळखिळे

Navratri 2022 : खळबळजनक! नवरात्रीनिमित्त खरेदी केलेल्या उपवासाच्या पदार्थातून विषबाधा

चंपा सिंग थापा यांचा हा निर्णय उद्धव गटाला धक्का देणारा नसला तरी शिंदे गटाचा हा एक प्रकारे प्रतिकात्मक विजय मानला जात आहे. या घटनेनंतर बाळासाहेबांच्या जवळची व्यक्तीही उद्धव ठाकरेंना सोडून त्यांच्यासोबत आल्याचे एकनाथ शिंदे गटाला दाखवता येईल, असे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे.

अश्विन शेश्वरे
अश्विन शेश्वरेhttp://laybhari.in
He writes about National and Maharashtra Politics, Education, Health, Civic, Legal, Crime and Sports beat for LayBhari News.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी