30 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeआरोग्यChinese food : सावधान ! तुम्ही चायनीज पदार्थ आवडीने खाताय ; मग...

Chinese food : सावधान ! तुम्ही चायनीज पदार्थ आवडीने खाताय ; मग हे वाचाच……

आज काल संध्याकाळी अनेकांची पावले चायनीजच्या गाडीकडे जातात. अनेकांना चायनीज पदार्थ (Chinese food ) प्रचंड आवडतात. तर काही जण संध्याकाळी घरचे जेवण जेवतच नाहीत. ते कोणता तरी चायनीज पदार्थ खाऊन आपले पोट भरतात. 

आज काल संध्याकाळी अनेकांची पावले चायनीजच्या गाडीकडे जातात. अनेकांना चायनीज पदार्थ (Chinese food ) प्रचंड आवडतात. तर काही जण संध्याकाळी घरचे जेवण जेवतच नाहीत. ते कोणता तरी चायनीज पदार्थ खाऊन आपले पोट भरतात.  संध्याकाळी चायनीजच्या गाडयांवर तुफान गर्दी झालेली पहायला मिळते. महानगरांमध्ये तर चायनीज पदार्थांची दुकाने रांगेत असतात. त्यामुळे त्या रस्त्याला, गल्लीला जत्रेचे रुप येते. संध्याकाळी चायनीज पदार्थ खाणे हा अनेकांच्या जीवनाचा परिपाठ झाला आहे. कारण या पदार्थांची चव म्हणजेच लज्जतच तुम्हाला चायनीजच्या दुकानांपर्यंत घेऊन जाते. त्या पदार्थांची चव जीभेवर रेंगाळते.

त्यामुळे तो पदार्थ पुन्हा पुन्हा खावासा वाटू लागतो. कितीही खाल्ले तरी मन भरत नाही. अनेकांना चायनीज पदार्थ (Chinese food ) खाण्याचे व्यसन जडले आहे. त्यामुळे ते मनसोक्तपणे या पदार्थंचा आस्वाद घेतात. भारतीय पदार्थांची खरी लज्जत ही मसाल्यांमध्ये असते. तर चयानीज पदार्थांची लज्जत ही अजिनोमोटोमध्ये असते. अनेक वेळा चायनीज पदार्थांमध्ये अजिनोमोटो वापरण्यात येतो. आजिनो मोटो म्हणजेच Monosodium glutamate (MSG). सोडियम सॉल्ट ऑफ़ ग्लुटॅमिक अ‍ॅसिड.

या पदार्थामुळे चायनीज पदार्थ खाण्याचे आकर्षण वाढले आहे.‍ अलिकडच्या काळात मोमोज, नुडल्स सारखे पदार्थ खाण्याचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. चायनीज भेळ, सूप, मांसाहारी पदार्थ, लॉलीपॉप आणि बरेच काही….चायनीज पदार्थ अजिनोमोटो शिवाय बनत नाहीत. त्यांच्या मसाल्यामध्ये अजिनोमोटो हा पदार्थ असतोच, त्यामुळे चायनीज पदार्थांचे अतिप्रमाणात सेवन टाळले पाहिजे.

हे सुद्धा वाचा

Amrita Fadnavis : अमृता फडणवीस यांनी दिले ‘झाडू’ला प्रोत्साहन

PFI : तपास यंत्रणांनी पुन्हा एकदा ‘पीएफआय’ ला केले खिळखिळे

 

INDvsSA T20I : भारत दौऱ्यावर येण्यापूर्वी आफ्रिका संघाने घेतला खास व्यक्तीचा आशिर्वाद

अजिनोमोटोचे वाईट पर‍िणाम :-
अजिनोमोटोमुळे आकलशक्तीवर तसेच स्मरणशक्त्ीवर परिणाम होतो. शरिरात अजिनोमोटो अतिप्रमाणात गेलयास पॅन‍िक अटॅक येणे, डोके गरगरणे अशा समस्या निर्माण होतात. लहान मुलांच्या शर‍िरात अजिनोमोटो गेल्यास ते हायपर होतात. या पदार्थामुळे यकृताचे नुकसान होते. तसेच लठठपणा वाढू शकतो. तसेच हृद्यविकार, रक्तदाब आणि मधूमेह देखील बळावू शकतो. डोके दुखी वाढते, वारंवार भूक लागते. अजिनोमोटो सर्वांत जास्त प्रजनन क्षमतेवर परिणाम करते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी