एज्युकेशन

Success Story : स्वातंत्र्याच्या पंचाहत्तरीनंतर ‘या’ गावाने पहिल्यांदाच पाहिली सरकारी नोकरी

शिक्षण पुर्ण करून झाल्यानंतर अनेकांना आपसूकच सरकारी नोकरीचे वेध लागतात, त्यासाठी अनेक प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते म्हणून सरकारी नोकरी म्हणजे कोणालाही सहज उपलब्ध होणारी संधी असे अजिबातच म्हणता येणार नाही त्यामुळे सरकारी नोकरीचे स्वप्न उराशी बाळगणारे अनेकजण असले तरीही काहीच जणांना हे यश संपादन करता येते. सरकारी नोकरीचे हे वेड जवळपास सगळ्यांमध्येच असते परंतु काही केल्या कोणाला यशच मिळत नसेल तर? खरंय.. असंच काहीसं बिहार राज्यात घडले आहे. येथील गावात गेल्या 75 वर्षांपासून कोणालाच सरकारी नोकरी मिळालेली नाही, परंतु स्वातंत्र्यांच्या पंचाहत्तरीच्या मुहुर्तावर या गावातील एका तरुणाला सरकारी नोकरी लागल्याने गावात सध्या उत्सवाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

हाती आलेल्या माहितीनुसार, बिहार राज्यातील मुजफ्परपूर येथील सोहागपूर हे असे गाव आहे जिथे अद्याप कोणालाच सरकारी सेवा करण्याची संधी मिळालेली नाही, त्यामुळे गावावर हा एकप्रकारे शापच असल्याचे अनेकांकडून बोलले जात होते. यंदाचे वर्ष संपुर्ण देश स्वातंत्र्याची पंचाहत्तरी साजरा करीत आहे आणि हेच निमित्त या गावाच्या भाग्याचे ठरले आहे. या गावातील एक तरुण राकेश कुमार यांना सरकारी शिक्षक म्हणून नोकरी लागली आहे. राकेश हे सरकारी नोकरी मिळवणारे पहिली व्यक्ती ठरल्याने संपुर्ण गावातून जल्लोष करण्यात येत आहे.

हे सुद्धा वाचा…

The song : आभाळभर गाणी गाणाऱ्या गान ‘कोकीळे’ला मिळाली एका चौकात जागा

Mumbai News : ‘भाभी जी घर पर है’ मालिकेतील कलाकराच्या मुलाचे निधन

Eknath Shinde : एकनाथ शिंदेंनी केले अमित शहा यांच्या निर्णयाचे स्वागत

सोहागपूर या गावाची लोकसंख्या जवळपास तीन हजारांच्या घरात आहे, परंतु त्यापैकी कोणालाच अद्याप सरकारी नोकरीचे यश प्राप्त झाले नव्हते. राकेश कुमार या तरुणाने हा डाग पुसून काढत अत्यंत मेहनत, जिद्द आणि चिकाटीने ही सरकारी नोकरी मिळवली आहे. राकेश लवकरच सरकारी शिक्षक म्हणून रुजू होणार आहेत. गावातील राम लाल चौधरी यांचे पुत्र असलेले राकेश यांनी आपले शिक्षक होण्याचे स्वप्न अखेर पुर्ण केले आहे. राकेश यांचे वडील गावातच किराणा मालाचे दुकान चालवत उदरनिर्वाह करतात. त्यांनी दुकान चालवूनच राकेश यांच्या शिक्षणाला भक्कम पाठिंबा दिला आहे.

राकेश यांनी त्यांचे प्राथमिक शिक्षण त्यांच्या गावातूनच पुर्ण केले आहे, त्यानंतर दरभंगा विद्यापीठातून त्यांनी एमकॉमपर्यंतचे शिक्षण पुर्ण झाले आहे. त्यानंतर बीएड त्यांनी राजस्थानमधून पुर्ण केले आणि बिहारमध्ये शिक्षक पात्रता परीक्षेत सुद्धा उत्तम यश संपादन केले आणि सरकारी शिक्षक बनले. राकेश यांच्या यशाबद्दल कळताच अख्ख्या गावात एकच आनंदाची लाट उसळली आहे. गावात कोणीतरी पहिल्यांदा सरकारी नोकरी करणार या आनंदाचा जल्लोष संपुर्ण गावातच पाहायला मिळत आहे. दरम्यान आनंदोत्सव साजरा करताना गावकऱ्यांच्या डोळ्यांच्या कडा सुद्धा पाणावल्या.

याप्रसंगी बोलताना गावकरी म्हणाले, देशाच्या स्वातंत्र्यानंतर मेहनतीने सरकारी नोकरी मिळवणारा राकेश हा पहिला मुलगा आहे. आता गावातील इतर मुलांनीही राकेशसारखेच मेहनत व जिद्दीने अभ्यास केल्यास ते सुद्धा त्यांच्या ध्येयापर्यंत पोहचू शकतात, असं म्हणून त्यांनी गावात आता सरकारी नोकऱ्या न मिळण्याचा शाप संपल्याचे सुद्धा म्हटले आहे. राकेश बिहारमधील तुर्की येथील प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून लवकरच रुजू होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

सुचित्रा पेडणेकर

Recent Posts

शेअर ट्रेडिंगमध्ये नफा मिळवून देण्याच्या आमिषाने साडेसतरा लाखांची फसवणूक

शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करून जादा नफा  कमावण्याचे आमिष दाखवून अज्ञात व्हॉट्सअ‍ॅपधारक इसमाने एका जणाची १७…

11 hours ago

10 हजारांची लाच घेताना उपशिक्षकासह मुख्याध्यापक एसीबीच्या जाळ्यात

16 हजारांची लाच (bribe) मागून पहिला हप्ता म्हणून 10 हजारांची लाच घेताना उप शिक्षकासह मुख्याध्यापकास…

12 hours ago

बीसीसीआय च्या, इंटर एन सी ए स्पर्धेसाठी साहिल पारखची इंडिया बी संघात निवड

नाशिक जिल्हा क्रिकेट (Cricket) असोसिएशनचा युवा खेळाडू आक्रमक डावखुरा सलामीवीर साहिल पारख (Sahil Parakh) याची…

12 hours ago

नाशिक जिल्हा न्यायालयातील सहायक अधीक्षक ‘एसीबी’च्या जाळ्यात

दिवाणी दाव्याचे प्रकरण दाखल केल्यावर कोर्ट फी स्टॅम्पची रक्कम काढून देण्यासाठी तक्रारदाराकडून पाचशे रुपयांची लाच…

12 hours ago

बिल्डरपुत्रास जीवे मारण्याची धमकी; सराईताने मागितली ‘इतक्या’ लाखांची खंडणी

भूखंड  विक्रीचा तगादा लावणाऱ्या सराईत गुन्हेगाराने बिल्डरकडे वीस लाख रुपयांची खंडणी (ransom) मागितल्याचा प्रकार वसंत…

12 hours ago

भाजपा – एनडीए 400 जागांचा टप्पा पार करणार; पंतप्रधान नरेंद्र मोदी

लोकसभा निवडणुकीत एनडीए 400 जागांचा टप्पा पार (NDA to cross 400-seat mark) करणार आणि ओडिशामध्ये…

13 hours ago