31 C
Mumbai
Sunday, April 28, 2024
HomeमनोरंजनThe song : आभाळभर गाणी गाणाऱ्या गान 'कोकीळे'ला मिळाली एका चौकात जागा

The song : आभाळभर गाणी गाणाऱ्या गान ‘कोकीळे’ला मिळाली एका चौकात जागा

आभाळभर गाणी (song) गाणाऱ्या आणि भारतीय संगीताला साता समुद्र पार नेणाऱ्या लता मंगेशकरांच्या नावाचा आयोध्येमध्ये डंका वाजत आहे. भारतरत्न गानकोकीळा लता मंगेशकर यांची आज 93 वी जयंती आहे. लता दीदींच्या जयंती निम‍ित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आयोध्या मधील एका चौकाला लता मंगेशकर यांचे नाव देऊन श्रद्धांजली अर्पण केली.

आभाळभर गाणी (song) गाणाऱ्या आणि भारतीय संगीताला साता समुद्र पार नेणाऱ्या लता मंगेशकरांच्या नावाचा आयोध्येमध्ये डंका वाजत आहे. भारतरत्न गानकोकीळा लता मंगेशकर यांची आज 93 वी जयंती आहे. लता दीदींच्या जयंती निम‍ित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आयोध्या मधील एका चौकाला लता मंगेशकर यांचे नाव दिले. परंतु आजच्या दिवशी महाराष्ट्र शासनाने काय केले हाच प्रश्न या निम‍ित्ताने उपस्थित झाला आहे. महाराष्ट्र सरकारने लता दीदींच्या नावाने संगीत विदयालय आजच्या दिवशी सुरू करण्याची घोषणा केली होती. परंतु त्याची पुरेशी माहिती उपलब्ध झालेली नाही. लता मंगेशकर यांचे कला विश्वातील नाव पाहता. त्यांच्या जयंती दिनी त्यांना ही छोटीशी भेट मिळेल अशी कोणालाही अपेक्षा नव्हती.

लता मंगेशकर यांचे खरे नाव ‘हेमा’ होते. त्यांचा जन्म 28 सप्टेंबर 1929 राेजी झाला. तर त्यांचे निधन 6 फेब्रुवारी 2022 ला कोरोनामुळे झाले. त्या भारतामधील सर्वांत प्रभावशाली गाय‍िका होत्या. त्यांनी भारतीय संगीत जगतामध्ये सात दशकांहून अधिक काळ अध‍िराज्य गाजवले. ‘गानकोक‍िळा’ तसेच ‘क्वीन ऑफ मेलडी’ पुरस्कारने सन्मानित करण्यात आले हाेते. लतादीदींनी 36 पेक्षा जास्त भाषांपेक्षा जास्त भाषांमध्ये गाणी (song) गायली. तसेच त्यांनी परदेशातील अनेक भाषांमध्ये गाणी गायली.

हे सुद्धा वाचा

Eknath Shinde : एकनाथ शिंदेंनी केले अमित शहा यांच्या निर्णयाचे स्वागत

PFI : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हत्येचा कट रचणाऱ्या ‘पीएफआय’ संघटनेवर गृह मंत्रालयाने घातली बंदी

Flowers : महिलांसाठी खास : तुमच्या केसात माळलेली फुलं, तुमचं आयुष्य वाढवतील

1986 मध्ये त्यांना ‘दादा साहेब फाळके’ पुरस्कार मिळाला. तर 2001 मध्ये ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळाला. तर 2007 मध्ये फ्रान्स सरकारने देखील ‘द लीजन ऑफ ऑनर’ हा सर्वोच्च नागरी पुरस्कार दिला. त्यांना 15 बंगाल ‘फिल्म’ जर्नालिस्ट असोसिएशनचे पुरस्कार, चार सर्वोत्कृष्ट ‘पार्श्वगायिके’चा पुरस्कार, दोन ‘फ‍िल्मफेअर’ विशेष पुरस्कार, ‘जीवन गौरव’ पुरस्कारासह अनेक पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. त्यामुळच्या गोव्याच्या असल्या तर त्यांनी आपल्या आयुष्यातील सर्वांत जास्त काळ मुंबईमध्ये घालवला. त्यांच्या कलेची दखल पंतप्रधान मोदींनी घेतली. त्यांची आठवण ठेवली आणि पंतप्रधान मोदींनी लता मंगेशकरांचे नाव आयोद्धेमधील एका चौकाला दिले. मात्र महाराष्ट्र सरकारला त्यांचा विसर पडला.

मोदी म्हणाले की, लता दींदींचे नाव चौकाला देण्यात आले. त्यामुळे कला जगतामधील लोकांना प्रेरणा मिळेल. भारत कलाविश्वाशी जोडला जाईल. भारताच्या कानाकोपऱ्यात कला आणि संस्कृती पोहोचण्यास मदत होईल असेही ते यावेळी म्हणाले. मोदींनी या चौकाचे उद्धाटन केले. यावेळी त्यांनी व्हीडीओ संदेश देखील व्हायरल केला. आयोध्येमध्ये या ठिकाणी चौकात 40 फूटांची वीणा लावली असून, तिचे वजन 14 टन आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, प्रभु रामचंद्र आमचे प्रेरणास्थान आहेत. आयोध्येमध्ये येणाऱ्या प्रत्येकाला लता दींदीच्या नावाची आठवण राहिल. कोटयवधी लोकांच्या मनात ‘राम’ नाम देणारी लता दीदी नेहमीच सर्वांना प्रेरणा देईल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, राम मंदिर भूमिपूजन झाले. त्यावेळी लता मंगेशकर यांचा मला फोन आला होता. त्यांना खूप आनंद झाला होता. तो त्यांनी फोनवर व्यक्त केला. त्यावेळी गायलेले गाणे मला आजही आठवते. ‘मन की अयोध्या तब तक सूनी, जब तक राम ना आए’ हे भजन त्यांनी गायले होते. लता दीदींच्या असंख्य आठवणी मला येतात असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले.

महाराष्ट्र शासनाला लता दींदींचा विसर पडल्याचे प्रकर्षांने जाणवले. लता मंगेशकर यांच्या जयंतीच्या दिवशी संगीत महाविदयालयाची पहिली बॅच सुरू होणार होती. जागे अभावी ती बॅच पु.ल. देशपांडे कला अकादमीमध्ये तात्पुरती सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा 16 ऑगस्टला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. त्या बददल पुरेशी माहिती अजून तरी मिळालेली नाही.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी