29 C
Mumbai
Sunday, May 12, 2024
HomeमनोरंजनMumbai News : 'भाभी जी घर पर है' मालिकेतील कलाकराच्या मुलाचे निधन

Mumbai News : ‘भाभी जी घर पर है’ मालिकेतील कलाकराच्या मुलाचे निधन

'भाभी जी घर पर हैं' या प्रसिद्ध टिव्ही मालिकेतील जितू गुप्ता यांच्या मुलाचे नुकतेच निधन झाले. ही दुःखद बातमी जीतू यांनी त्यांच्या फेसबुकवर मुलगा आयुष याचा फोटो शेअर करत दिली आहे.

टिव्हीवरील ‘भाभी जी घर पर हैं’ या मालिकेने अगदी थोड्याच कालावधीत प्रेक्षकांच्या मनात घर केले. या मालिकेत प्रत्येकच कलाकार आपापल्या भूमिकेमुळे प्रक्षकवर्गात चांगलाच लोकप्रिय झाला. दरम्यान या मालिकेच्या विश्वातून आता एक दुःखद घटना समोर आली आहे. या मालिकेतील लोकप्रिय अभिनेते जितू गुप्ता यांच्या मुलाचे निधन झाले आहे. आयुष असे मुलाचे नाव असून केवळ 19 व्या वर्षी त्याचा मृत्यू झाल्याने टीव्ही जगतातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. आयुषच्या अचानक जाण्याने जीतू यांना सुद्धा मोठा धक्का बसला आहे. जीतू यांनी सदर माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून फोटो शेअर करत दुःखद अंतःकरणाने सांगितली आहे.

‘भाभी जी घर पर हैं’ या प्रसिद्ध टिव्ही मालिकेतील जितू गुप्ता यांच्या मुलाचे नुकतेच निधन झाले. ही दुःखद बातमी जीतू यांनी त्यांच्या फेसबुकवर मुलगा आयुष याचा फोटो शेअर करत दिली आहे. या पोस्टवर व्यक्त होत सुनील पाल यांनी सुद्धा जीतू गुप्ता यांचा मुलगा आता या जगात नाही अशा आशयाची पोस्ट फेसबूकवर करत चाहत्यांना कळविले आहे.

हे सुद्धा वाचा…

Eknath Shinde : एकनाथ शिंदेंनी केले अमित शहा यांच्या निर्णयाचे स्वागत

Maitreya Scam Update : ‘मैत्रेय’ वरून जनआक्रोश वाढला, राज्यभर धरणे आंदोलन करणार

PFI : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हत्येचा कट रचणाऱ्या ‘पीएफआय’ संघटनेवर गृह मंत्रालयाने घातली बंदी

सुनील पाल फेसबुक पोस्टमध्ये लिहितात, RIP, भाभी जी घर पर है चे अभिनेते, माझा भाऊ जीतूचा मुलगा आयुष (१९ वर्ष) आज आपल्यात नाही असे म्हणून त्यांनी त्यासोबत एक रडणारा इमोजी सुद्धा जोडलेला आहे, ज्यातून आयुषच्या जाण्याने ते किती दुःखी झाले आहेत ते दर्शवत आहे.

दरम्यान, एक दिवसआधी भाभीजी फेम अभिनेता जीतू गुप्ता यांनी आपल्या मुलाचा म्हणजेच आयुषचा फोटो शेअर करून मनोगत व्यक्त केले होते. त्या फोटोमध्ये आयुष रुग्णालयाच्या बेडवर असल्याचे दिसत असल्याचे दिसून आले. यावेळी जितून म्हणाले, मुलाची प्रकृती गंभीर आहे, त्यामुळे ते कोणाशीही बोलण्याच्या स्थितीत नाहीत असे म्हणून त्यांनी बोलणेच टाळले होते. दरम्यान आयुषची मृत्यूशी सुरू असणारी झुंज अखेर संपली त्यामुळे जीतू गुप्ता यांना हा मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी