33 C
Mumbai
Monday, May 6, 2024
Homeमहाराष्ट्रEknath Shinde : एकनाथ शिंदेंनी केले अमित शहा यांच्या निर्णयाचे स्वागत

Eknath Shinde : एकनाथ शिंदेंनी केले अमित शहा यांच्या निर्णयाचे स्वागत

पीएफआय संघटनेवर आज बंदी घालण्यात आली आहे. या घटनेचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी स्वागत केले आहे. पीएफआय संघटनेवर बंदी घातली ती योग्यच आहे.

पीएफआय संघटनेवर आज बंदी घालण्यात आली आहे. या घटनेचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी स्वागत केले आहे. पीएफआय संघटनेवर बंदी घातली ती योग्यच आहे. तसेच पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा करणाऱ्यांना या देशात राहण्याचा अध‍िकार नसल्याचे त्यांनी यावेळी म्हटले. नाश‍िक मध्ये पत्रकार परिषदेमध्ये आज मुख्यमंत्री बोलत होते त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केले.घेतला आहे. अशा लोकांची अजिबात हयगय केली जाणार नाही. असेही एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले. जे लोक राष्ट्रविरोधी विचार पसरवत आहेत. त्यांच्याववर कठोर झालीच पाहिजे असेही ते यावेळी म्हणाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नाशिकमध्ये आज एक दिवसाचा दौरा होता.

नाश‍िकमधील तपोवन येथे स्वामी नारायण मंदीरात मुर्तीची प्राण प्रतिष्ठापणा सोहळयाला त्यांनी हजेरी लावली त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. गृहमंत्री अमित शाह यांनी राष्ट्रीय सल्लागार समितीचे अध्यक्ष अजित डोवाल यांच्या बरोबर बैठक घेऊ त्यानंतर हा निर्णय जाहिर केला. केंद्र सरकारने आज पीएफआय म्हणजेच पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेवर 5 वर्षांसाठी बंदी घातली आहे. त्याच प्रमाणे आणखी 8 संघटनांवर देखील बंदी घातली आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने या संघटनांवर बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत. या सर्व संघटनांची चौकशी केली असता त्या दहशवाद्यांना पैसा पुरवत असल्याचे निष्पन्न झाले आहे.

पीएफआय आणि त्यांच्याशी संबंधी संघटनांकडून देशाच्या सुरक्षेला मोठा धोका आहे. त्यामुळेच त्यांच्यावर बंदी घालण्यात आली आहे. यामध्ये रिहैब इंडिया फाउंडेशन, कँप्स फ्रंड ऑफ इंडिया, ऑल इंडिया इमाम काउंसिल, नॅशनल कॉन्फेडरेशन ऑफ हयुमन राईटस, नॅशनल विमेन्स फ्रंट, ज्यूनिअर फ्रंट, इम्पावर इंडिया फाउंडेशन, रिहैब फाउंडेशन इत्यादी संघटनांचा यामध्ये समावेश आहे. पीएफआय आणि त्यांच्याशी संबंधी संघटना गैरव्यवहार करत होते. त्यांच्याकडून देशाच्या एकता, अखंडता आणि सुरक्षेला धोका निर्माण झाला होता. ‍पीएफआय ही संघटना 1992 मध्ये बाबरी मशीद पाडल्यानंतर सुरू झाली.

हे सुद्धा वाचा

PFI : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हत्येचा कट रचणाऱ्या ‘पीएफआय’ संघटनेवर गृह मंत्रालयाने घातली बंदी

Memes : जाणून घ्या ! ‘मीम्स’चा इतिहास

Flowers : महिलांसाठी खास : तुमच्या केसात माळलेली फुलं, तुमचं आयुष्य वाढवतील

1994 मध्ये केरळमध्ये तिची खऱ्या अर्थने सुरूवात झाली. सुरूवातील नॅशनल डेव्हलपमेंट फंड नावाने या संस्थेची सुरूवात झाली. त्यानंतर या संघटनेचे नाव हत्याकांडाशी जोडले गेले. 15 ते 20 वर्षांमध्ये ही संघटना दक्ष‍िणेकडून उत्तर भारतात पोहोचली.

न्युयॉर्कमध्ये सलामान रुश्दी यांच्या हत्येशी संबंध असल्याचा संशय वाढला. एनआयएने मागच्या आठवडयापासून छापेमारी सुरु केली. ऑगस्टमध्ये गृहमंत्री अमित शाह यांच्या बेंगळूरु दौऱ्याच्यावेळी त्यांची कर्नाटकचे मुख्यमंत्री बसव राज बोम्मई आणि राज्य गृहमंत्री अरागा ज्ञानेंद्र यांच्यामध्ये बैठक झाली होती. त्यावेळी पीएफआय संघटनेवर बंदी घालण्याची योजना ठरली होती.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी