मनोरंजन

तब्बल 15 वर्षांनंतर आमिर करतोय ‘गजनी’च्या सिक्वेलची तयारी!

बॉलीवूडमध्ये मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आमिर खानचे जगभरात लाखो चाहते आहेत. बॉलिवूडच्या अनेक रोमांचक चित्रपटांत काम करून आमिरने प्रेक्षकांच्या मनावर कायम आधिराज्य गाजवले आहे. परंतु गेल्या काही वर्षात फ्लोप ठरलेल्या ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’, ‘लाल सिंग चड्डा’ या चित्रपटांमुळे आमिरने बॉलीवूडपासून काही काळ ब्रेक घेतला होता. आता आमिरच्या चाहत्यांसाठी विशेष आनंदाची बातमी आहे. आमिरचा 2008 सालातील गाजलेला चित्रपट म्हणजे ‘गजनी’चा सिक्वेल भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

15 वर्षांपुर्वी रिलीज झालेल्या या गजनी चित्रपटाने आजही प्रेक्षकांच्या मनावर कायम छाप पाडली आहे. संजय सिंघानिया आणि कल्पनाच्या प्रेमकहाणीचा शेवट आजही प्रेक्षक विसरलेले नाहीत. संजय सिंघानियाचे पात्र आमिर खान, तर कल्पनाची भूमिका असीनने साकारली होती. गजनी चित्रपटाने तेव्हा सर्व रेकॉर्ड मोडून काढत बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी केली होती. आमिरच्या या गाजलेल्या चित्रपटाचा लवकरच सिक्वेल बनवण्यात येणार आहे.

यासंदर्भात आमिरने अल्लू अर्जुनचे वडील अल्लू अरविंद यांची भेटसुद्धा घेतली आहे. ‘गजनी’ चित्रपट तमिळ चित्रपटाचा रिमेक होता. यामध्ये दिवंगत अभिनेत्री जिया खानने देखील महत्त्वाची भूमिका केली होती. आमिरला फिल्म इंडस्ट्रीमधून सध्या अनेक ऑफर्स येत आहेत आता मिस्टर परफेक्शनिस्ट कोणती स्क्रिप्ट निवडतात याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे. आमिर खान गेल्या आठवड्यात अल्लू अरविंद यांना भेटला होता. त्यांचे अनेक प्रोजेक्टबाबत बोलणे झाले असून निर्माते अल्लू अरविंद यांनी गजनी-2 अर्थात गजनीच्या सिक्वेलसंदर्भात आमिर खानसोबत एक कल्पना शेअर केली आहे. दोघांनाही संजय सिंघानियाची कथा पुढे नेण्याची इच्छा असून काही महिन्यांमध्ये स्क्रिप्ट फायनल करणार असल्याचे बोलले जात असले, तरी अद्याप कशाचीही पुष्टी देण्यात आलेली नाही. सध्या सर्व काही गुप्त ठेवण्यात आले आहे.

हे सुद्धा वाचा: 

वडील व्हायचे होते पण…; वैयक्तिक आयुष्याबाबत सलमानचा मोठा खुलासा

टांझानियातही ‘बहरला हा मधुमास’; पाहा व्हिडीओ

पोन्नियन सेल्वन 2 चित्रपटाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद

Aamir Khan, Ghajni sequel, Aamir Khan is preparing for the sequel of ‘Ghajni’ After 15 years

Team Lay Bhari

Recent Posts

मधमाशीकडून शिका बिझनेस मॅनेजमेंट

महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग कार्यमंडळाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी बिपिन जगताप यांनी लय भारीला मधमाश्यांविषयी…

8 mins ago

निवडणूक कामात हलगर्जीपणा करणारे नाशिकचे दोन पोलीस कर्मचारी निलंबित;पोलीस आयुक्त संदीप कर्णिक

निवडणुकीच्या कामामध्ये हलगर्जीपणा करणाऱ्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांना (Two policemen suspended) पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (…

11 mins ago

सप्तशृंगी गडावर जाणारी टॅम्पो ट्रॅव्हलर बस जळून खाक; सुदैवाने जीवितहानी नाही

शिर्डी येथून भाविकांना घेवून सप्तशृंगी गडाकडे दर्शनासाठी जाणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हलरला घाट रस्त्यावरील गणपती टेकडीजवळ काल…

55 mins ago

नाशिकरोडमध्ये भाजपाचे माजी नगरसेवक व पदाधिकाऱ्यामध्ये तुंबळ हाणामारी

भारतीय जनता पार्टी चे माजी नगरसेवक((BJP corporator) व पदाधिकारी कामगार नेता (office-bearers) यांच्या मध्ये दत्त…

1 hour ago

नाशिकरोडच्या गोसावी वाडीत टोळक्याची दगडफेक

गाडी जोरात चालवू नको इथे लहान मुले खेळतात त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे असे सांगितल्याचा…

19 hours ago

नाशिकमध्ये गळ्यात टोमॅटो, कांद्याची माळ घालून मतदान

राज्यात आज पाचव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान (votes) होत आहे. यामध्ये नाशिकमध्येही मतदान पार पडतंय.…

19 hours ago