27.8 C
Mumbai
Saturday, May 4, 2024
Homeमनोरंजन"वडील व्हायचे होते पण..."; वैयक्तिक आयुष्याबाबत सलमानचा मोठा खुलासा

“वडील व्हायचे होते पण…”; वैयक्तिक आयुष्याबाबत सलमानचा मोठा खुलासा

अभिनेता सलमान खान त्याच्या कामाबरोबरच त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असतो. नुकताच एका कार्यक्रमामध्ये त्याला लहान मुले फार आवडतात. त्याला वडील व्हायचे होते पण ते शक्य झाले नाही, असा मोठा खुलासा त्याने केला. विशेषत: कार्यक्रमात एका प्रश्नाचे उत्तर देताना वडील होण्याची इच्छा काही वर्षांपूर्वी त्याच्या मनात होती असे त्याने सांगितले. सलमान खानचे हे उत्तर खूप चर्चेत आले आहे.

सलमान खानने नुकतीच रजत शर्मा यांच्या ‘आप की अदालत’ या कार्यक्रमामध्ये हजेरी लावली. या वेळी त्याला त्याच्या कामाबद्दल, त्याच्या खासगी आयुष्याबद्दल विविध प्रश्न विचारण्यात आले. सलमानने नेहमीच्या शैलीत मोकळेपणाने सर्व प्रश्नांची उत्तरे दिली. दरम्यान लग्नाबद्दलच्या मतांबाबत चर्चा करताना त्यांच्या संभाषणात करण जोहरचा देखील उल्लेख झाला.

रजत शर्मा म्हणाले की, “करण जोहरला तू हाच प्रश्न विचारला होतास की त्याने लग्न का नाही केले, आज तो दोन मुलांचा बाप आहे.” त्यावर सलमान म्हणाला, “मीदेखील तोच प्रयत्न करीत होतो पण कायद्यामध्ये काही बदल झाले. मला लहान मुले फार आवडतात. पण मुले येतात तेव्हा त्यांच्याबरोबर त्यांची आईही येते. त्या मुलांसाठी आई नेहमीच चांगली असते पण आमच्या घरी खूप आई आहेत. त्या सर्व मुलांची खूप चांगली काळजी घेतील. पण मुलांच्या बरोबरीने आयुष्यात येणारी त्यांची आई… याचा विचार करणे कठीण आहे.”

सलमान खानला लहान मुलं आवडतात आणि हे उघड सत्य आहे. तो अरबाज खानचा मुलगा अरहान, सोहेल खानचा मुलगा निर्वाण आणि योहान, अलविरा अग्निहोत्रीचा अलिझेह आणि अवयान अग्निहोत्री आणि अर्पिता खान शर्माची मुले अहिल आणि अयात शर्मा यांच्यासाठी वडिलांसारखा आहे. आता सलमानने त्याच्या मुलांबद्दल प्रश्न विचारला आणि त्याचे कबुलीजबाब व्हायरल होत आहे. त्यामुळे आता करण जोहरसारखाच सिंगल पॅरेंट व्हायचा विचार सलमानच्याही मनात होता याचा खुलासा झाला आहे.

हे सुद्धा वाचा: 

टांझानियातही ‘बहरला हा मधुमास’; पाहा व्हिडीओ

पोन्नियन सेल्वन 2 चित्रपटाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद

ऐकावे ते नवलच! दक्षिणात्य चाहत्याने अभिनेत्री समंथा प्रभूच्या नावाने बांधले मंदिर

Salman Khan, aap ki adalat, Rajat Sharma, salman khan wants to be a father, Social viral, Bollywood gossip

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी