मनोरंजन

Drishyam 2 : अजय देवगणच्या ‘दृश्यम 2’ ने प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी केली विक्रम

अजय देवगणचा चित्रपट ‘दृश्यम 2’ ची त्याच्या चाहत्यांना खूप दिवसांपासून प्रतीक्षा होती. दृश्यम चित्रपटाच्या पहिल्या भागानंतर या चित्रपटाचा दुसरा भाग प्रदर्शित होण्याची उत्सुकता होती. आता या चित्रपटाचा दुसरा भाग प्रदर्शित झाला असून चित्रपट प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी अर्थात शुक्रवारी (ता. 18 नोव्हेंबर) ‘दृश्यम 2’ ला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाल्याचे दिसून येत आहे आणि हा कोरोना महामारी नंतर प्रदर्शित झालेला तिसरा सर्वोत्कृष्ट चित्रपट आहे. जिथे मोठे चित्रपट बॉक्स ऑफिसवर सतत प्रसिद्धी मिळवताना दिसून येत आहे. तिथे ‘दृश्यम 2’ने प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी गल्ला जमवण्याच्या बाबतीत ‘ब्रह्मास्त्र’ आणि ‘सूर्यवंशी’ या चित्रपटानंतर दुसरे स्थान मिळवले आहे.

दिल्ली, एनसीआर आणि पूर्व पंजाबमध्ये चांगली कमाई
बॉक्स ऑफिस इंडियाच्या माहितीनुसार, दृश्यम चित्रपटाने शुक्रवारी जवळपास 15 कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटाने उत्तरेत चांगली कमाई केल्याचे बोलले जात आहे. दिल्ली, एनसीआर आणि पूर्व पंजाबमध्ये या चित्रपटाने पहिल्या दिवशी चांगली कमाई केली आहे. या ठिकाणी संध्याकाळपर्यंत कमाईचा वेग वाढला. गुजरात आणि महाराष्ट्रात या चित्रपटाने सकाळपासूनच भरघोस कमाई केली.

‘दृश्यम 2’ अजय देवगणचा चौथा चित्रपट
‘दृश्यम 2’ हा अजय देवगणचा चौथा चित्रपट आहे ज्याने बॉक्स ऑफिसवर प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी भरघोस कमाई केली आहे. याआधी ‘सिंघम रिटर्न्स’, ‘गोलमाल अगेन’, ‘टोटल धमाल’ यांनीही बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती, त्यापैकी पहिल्या दोन चित्रपटांना शासकीय सुट्टीचा फायदाही मिळाला होता.

हे सुद्धा वाचा

controversial statement : राज्यपालांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर शिवसेना, मनसे आक्रमक

Hardik Pandya: हार्दिक पांड्या होऊ शकतो T20 क्रिकेटमध्ये भारताचा कर्णधार

Ambadas Danve: संदीपान भुमरेंचे मनी लाँड्रींग, दारूची नऊ दुकाने !; अंबादास दानवेंचा आरोप

अजय देवगनचा बहुचर्चित अशा दृश्यम चित्रपटाचा पहिला भाग हा लोकांच्या पसंतीस पडला होता. या भागामध्ये दाखवलेला कथेला लोकांनी भरभरून प्रेम दिले. त्यानंतर या चित्रपटाचा दुसरा भाग कधी प्रदर्शित होतो ? याची उत्सुकता अजय देवगनच्या चाहत्यांसह सर्वच लोकांना होती. या चित्रपटाचा दुसरा भाग शुक्रवारी प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांनी चित्रपटगृहांमध्ये हा चित्रपट पाहण्यासाठी एकच गर्दी केलेली पाहायला मिळत आहे.

दृश्यम चित्रपटावर सोशल मीडियावर अनेक मिम्स बनलेले देखील पाहायला मिळाले. 2 ऑक्टोबरला नेमकं काय झालं ? अशा संदर्भातील अनेक मिम्स सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले. त्यामुळे जेव्हा कधी 2 ऑक्टोबर येते, त्यावेळी अजय देवगन आपल्या कुटुंबासोबत 2 ऑक्टोबरला कुठे गेला होता ? अशा आशयाचे मिम्स प्रेक्षकांकडून व इतर लोकांकडून नेहमीच सोशल मीडियावर शेअर करण्यात येतात. सध्या तरी अजय देवगनच्या दृश्यम-2 या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर आपला प्रभाव सोडला असल्याचे दिसून येत आहे.

पूनम खडताळे

Recent Posts

नाशिकरोडमधून 2 गावठी कट्ट्यांसह दोघांना अटक!

उपनगर पोलिसांच्या गुन्हेशोध पथकाला दोघे संशयित दसक गावानजिकच्या महालक्ष्मीनगरमध्ये गावठी कट्टे विक्रीसाठी येणार असल्याची खबर…

6 hours ago

गंगापूर धरणाची दोन कोटी लिटरने वाढली पाणी क्षमता

गंगापूर धरणालगत गंगावऱ्हे गांव येथे गेल्या १४ दिवसांपासून सुरू असलेल्या गाळ उपसा मोहिमेमुळे गंगापूर धरणाची…

6 hours ago

विरोधकांचा मोदी सरकारविरोधात ‘व्होट जिहाद’!

दोन टप्प्यातील निवडणुकांमध्ये अहंकारी आघाडीचा संसार बुडाल्याचे स्पष्ट झाल्याने निराश झालेले इंडी आघाडीचे नेते आता…

6 hours ago

राहुल गांधीची चायनीज तर मोदीजींची भारतीय गॅरंटी अमित शहा

या निवडणुकीत एक गट राम मंदिराला विरोध करणाऱ्यांचा आहे, तर दुसरा गट राम मंदिर बनविणारा…

7 hours ago

कान्स फिल्म फेस्टिव्हलसाठी ‘या’ तीन मराठी चित्रपटांची निवड

फ्रान्समध्ये येत्या 14 मे ते 22 मे 2024 दरम्यान कान्स फिल्म फेस्टिव्हल संपन्न होणार आहे.…

7 hours ago

नाशिक मनपाच्या बांधकाम विभागाचा कानाडोळा,एम एन जि एल गॅस मुळे नागरिकांना होतोय त्रास

गेल्या अनेक वर्षांपासून शहरातील अनेक भागात एम एन जि एल तर्फे गॅस (MNGL Gas) वाहिनी…

11 hours ago