मनोरंजन

‘आज्जीबाई जोरात’ हे नाटक येत्या 30 एप्रिलला रंगभूमीवर पहिला प्रयोग

दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांचा मुलगा अभिनय बेर्डेने मनोरंजनसृष्टीत पदार्पण केले. अभिनयचा ‘ती सध्या काय करते’ हा पहिला चित्रपट सुपरहिट ठरला. या चित्रपटानंतर तो ‘अशी ही आशिकी’, ‘मन कस्तुरी रे’, ‘रंपाट’, ‘बॉईज 4’ अशा अनेक चित्रपटात झळकला. यानंतर आता लवकरच तो व्यावसायिक रंगभूमीवर झळकणार आहे. ‘आज्जीबाई जोरात’ असे अभिनय बेर्डेच्या पहिल्या नाटकाचे नाव आहे. आता हे नाटक रंगभूमीवर कधी येणार, याची तारीख जाहीर झाली आहे. येत्या 30 एप्रिलला रंगभूमीवर पहिला प्रयोग जिगीषा-अष्टविनायक निर्मित आणि क्षितिज पटवर्धन यांच्या लेखन-दिग्दर्शनातून साकारलेलं ‘आज्जीबाई जोरात’ (Ajjibai Jorat)हे नाटक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.(‘Ajjibai Jorat’ to be first screened on April 30)

यासोबतच पुष्कर श्रोत्री, मुग्धा गोडबोले, जयवंत वाडकर यांसारख्या अनुभवी कलाकारांची तगडी फौज देखील या नाटकातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अभिनय बेर्डेने याबद्दल काही दिवसांपूर्वी एक पोस्ट शेअर केली होती. यात त्याने ‘तुम्हा प्रेक्षकांच्या प्रेमानं आणि आई-बाबांच्या आशीर्वादानं आज नाट्यविश्वात पहिलं पाऊल टाकतोय! ‘आज्जीबाई जोरात!’ हे माझं पहिलं व्यावसायिक मराठी नाटक आहे. सध्या आमच्या तालमी जोरदार सुरू असून महिनाखेरीस आम्ही मायबाप रसिकांच्या भेटीस येतोय’ असे म्हटले होते. ‘आज्जीबाई जोरात’ या नाटकाचे लेखन-दिग्दर्शन क्षितिज पटवर्धन याने केले आहे. या नाटकात एकूण 8 कलाकार आणि 11 नर्तक असणार आहेत.

अभिनय बेर्डेचं हे नाटक आजच्या तरुण पिढीच्या आणि त्यांच्या पालकांशी निगडित विषयावर असणार आहे. विनोदी फँटसी असणारं पहिलं वहिलं AI महाबालनाट्य येत्या 30 एप्रिलला रंगभूमीवर दाखल होत आहे. अभिनय बेर्डेचे प्रथमच रंगभूमीवर पदार्पण लहानांसोबत मोठ्यांनाही हसवणारं ‘आज्जीबाई जोरात’ या नाटकात अनेक दिग्गज कलाकार एकत्र येणार आहेत. यात रंगभूमीवर राज्य करणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्री निर्मिती सावंत ‘आज्जीबाई जोरात’ मध्ये धमाल उडवायला सज्ज झाल्या आहेत. विशेष म्हणजे अभिनय बेर्डे या नाटकाद्वारे प्रथमच रंगभूमीवर पदार्पण करत आहे.

 

टीम लय भारी

Recent Posts

‘काँग्रेस कसाबची बाजू घेतेय, हा शहिदांचा अपमान’, PM मोदींचा हल्लाबोल

काँग्रेसवाले मिळून दहशतवादी कसाबची बाजू घेतायत. काँग्रेसच्या काळात विदेश राज्यमंत्री राहिले आणि कुटुंबातील जवळच्यानेही कसाबला…

3 hours ago

शांतिगिरी महाराज यांना माघारीसाठी दोन वेळा संपर्क : मुख्यमंत्री शिंदे

राजकीय अधिष्ठानापेक्षा धार्मिक अधिष्ठान नेहमी मोठे असते . त्यामुळे मी स्वतः महंत शांतिगिरी महाराज (Shantigiri…

4 hours ago

तुम्ही तर महागद्दार निघाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ; ठाकरेंवर हल्लाबोल

विजय करंजकर यांच्या भावना योग्य आहे. लोकसभेच्या उमेदवारीसाठी आदल्या दिवासापर्यंत त्यांच नाव चर्चेत होत. तसंच…

4 hours ago

अमेरिकेत ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’चे शंभर शोज ‘हाऊसफुल्ल’

'गीतरामायणा'ला स्वरसाज देणारे संगीतकार, गायक सुधीर फडके म्हणजेच आपल्या सर्वांचे लाडके बाबूजी यांची जीवनगाथा सांगणारा…

4 hours ago

राजाभाऊ वाजेंच्या प्रचारासाठी डी.जी.सूर्यवंशी समन्वयक

नाशिक लोकसभा मतदार संघातील उमेदवार राजाभाऊ वाजे (Rajabhau Waze) यांच्या प्रचाराची धुरा सांभाळण्यासाठी महाविकास आघाडीचे…

4 hours ago

नरेंद्र मोदी फेकाडे, इंदिरा गांधी कर्तृत्ववान

लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. देशभरातील वातावरण ढवळून निघाले आहे. या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ पत्रकार ज्ञानेश…

8 hours ago