मनोरंजन

महानायक अमिताभ बच्चन शूटिंगदरम्यान गंभीर जखमी; बरगडीच्या स्नायूला दुखापत

मेगास्टार अमिताभ बच्चन यांच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. हैदराबादमध्ये शूटिंगदरम्यान बिग बी जखमी झाले आहेत. अ‍ॅक्शन सीन करताना अमिताभ बच्चन जखमी झालेत. दुखापतीमुळे शूटिंग रद्द  करावी लागली. बिग बी डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहेत. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. बिग बी यांनी त्यांच्या ब्लॉगद्वारे त्यांना दुखापत झाल्याची माहिती दिली. (Amitabh Bachchan)

हैदराबादमध्ये ‘प्रोजेक्ट के’ च्या शूटिंगसाठी ते गेले होते. या अ‍ॅक्शन चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्यासह प्रभास, दीपिका पदुकोण आणि दिशा पटानी मुख्य भूमिकेत आहेत. 12 जानेवारी 2024 ला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या सिनेमातील अ‍ॅक्शन सीन शूट करताना बिग बी जखमी झाले. त्यांच्या उजव्या बरगडीच्या पिंजऱ्याच्या स्नायूला दुखापत झाली आहे. त्यानंतर शूटींग रद्द करण्यात आले.

हैदराबादमध्ये ‘प्रोजेक्ट के’च्या अ‍ॅक्शन शॉट दरम्यान दुखापत झाली असल्याचे वृत्त आहे. त्यांच्या उजव्या बरगडीचा स्नायू तुटला. यामुळे शूट रद्द केले. हैदराबादमधील एआयजी हॉस्पिटलमध्ये त्यांचे सीटी स्कॅन देखील करण्यात आले. या दरम्यान डॉक्टरांनी सध्या विश्रांतीचा सल्ला दिला आहे,” असे अमिताभ यांनी ब्लॉगमध्ये म्हटले आहे.

प्रोजेक्ट के या चित्रपटात अमिताभ बच्चनही जबरदस्त भूमिकेत दिसणार आहेत. तर अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि प्रभासची जोडी पहिल्यांदाच दिसणार आहे. सायन्स फिक्शन चित्रपटातून दीपिका पादुकोण साऊथ इंडस्ट्रीत पाऊल ठेवत आहे. ‘प्रोजेक्ट के’ एक तेलुगू सायन्स फिक्शन चित्रपट आहे. नाग अश्विन दिग्दर्शित या चित्रपटाचे शूटिंग सुरू झाले असून हा चित्रपट दोन भागात रिलीज होईल, अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे एकंदरीत प्रेक्षकांमध्ये उत्सुकतेचे वातावरण आहे. मात्र शूटिंगमुळे बिग बी यांना झालेल्या दुखापतीमुळे बच्चन कुटुंबासोबतच अवघ्या सिनेसृष्टीत चिंता व्यक्त केली जात आहे.

हे सुद्धा वाचा : 

पठाणच्या धर्तीवर दीपिका आणि प्रभासचं पहिलं ‘प्रोजेक्ट-के’ रिलीज; महानायक बिग-बी सकारणार मुख्य भूमिका

KBC 14 : केबीसीच्या सेटवर अमिताभ बच्चनने सांगितला पाणीपुरीचा किस्सा

Sholay Film : धर्मेंद्रने जुना फोटो शेअर करत दिल्या अमिताभ बच्चनला शुभेच्छा! चाहते म्हणतायत ‘पुन्हा एकत्र…’

Team Lay Bhari

Recent Posts

नाशिकचे महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे १६ कोटीचे धनी

सलग दहा वर्षांपासून नाशिकचे खासदार राहिलेले हेमंत गोडसे (Hemant Godse) यांच्या संपुर्ण कुटुंबियांच्या नावे एकूण…

10 hours ago

दिंडोरी लोकसभेच्या उमेदवाराची संपत्ती पाच वर्षात दुप्पट

दिंडोरी लोकसभा (Dindori Lok Sabha) मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवारांच्या संपत्तीत  (wealth)…

10 hours ago

डाॅ. पवार, गाेडसेंचा विजय निशि्चत : शिंदे

४० अंशाच्या आसपास तापमानाचा पारा असतानाही कार्यकर्त्यांचा अमाप उत्साह पाहता महायुतीच्या दाेन्ही उमेदवारांचा विजय जवळजवळ…

11 hours ago

शिवसेना भाजप महायुतीचा शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल

लोकसभा निवडणुकीसाठी गुरुवारी शिवसेना-भाजप महायुतीतर्फे (BJP alliance ) दिंडोरी मतदार संघासाठी डॉ. भारती पवार आणि…

11 hours ago

शिवसेनेची १५ जागा पदरी पाडून सरशी

लोकसभेच्या राज्यातील शेवटच्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज दाखल करण्यास जेमतेम २ दिवसांचा कालावधी उरला असताना ठाणे…

17 hours ago

अक्रोड खाण्याचे फायदे

अक्रोड हा अत्यंत पौष्टिक असा सुकामेवा असून यामध्ये हेल्दी फॅट, प्रोटिन्स, फायबर, मिनरल्स आणि व्हिटॅमिन्सचे…

18 hours ago