30 C
Mumbai
Monday, May 15, 2023
घरमनोरंजनपठाणच्या धर्तीवर दीपिका आणि प्रभासचं पहिलं 'प्रोजेक्ट-के' रिलीज; महानायक बिग-बी सकारणार मुख्य...

पठाणच्या धर्तीवर दीपिका आणि प्रभासचं पहिलं ‘प्रोजेक्ट-के’ रिलीज; महानायक बिग-बी सकारणार मुख्य भूमिका

पठान सारख्या सुपरहीट चित्रपटानंतर दीपिका पुन्हा एकदा आपल्या फॅन्सना मोठा धमाका देण्यास सज्ज झाली आहे. साऊथ सुपरस्टार प्रभास, दीपिका पदुकोण आणि अमिताभ बच्चन यांच्या आगामी चित्रपट 'प्रोजेक्ट के'च्या निर्मात्यांनी धमाकेदार पोस्टरसह रिलीजची तारीख जाहीर केली आहे.

बॉलीवूडची डिंपल गर्ल दीपिका पदुकोनचा ‘पठान’ बॉक्स ऑफिसवर मोठा धुमाकूळ घालत आहे. त्यातच आता अभिनेत्री दीपिकाने आपल्या फॅन्सना आणखी एक मोठा धमाका देण्यास तयार आहे. आज महाशिवरात्रीच्या औचित्याने अभिनेत्री दीपिका, साऊथ अभिनेता प्रभास आणि महानायक अमिताभ बच्चन यांच्या कलाकृतीचा नवा कोरा चित्रपट ‘प्रोजेक्ट के’ ची रिलीज डेट आणि चित्रपटाचे पहिले पोस्टर रिलीज झाले आहे. निर्मात्यांनी सोशल मिडियावर पोस्ट शेयर करत याबाबत माहिती दिली आहे. (Project K)

काही दिवसांपूर्वी दीपिका पादुकोण आणि साऊथ चित्रपटाचे सुपरस्टार प्रभासने आपला ॲक्शन थ्रिलर चित्रपट ‘प्रोजेक्ट के’ ची रिलीज डेटची घोषणा केलीय. दोन्ही कलाकारांनी आपल्या इन्स्टाग्राम हँडलवर चित्रपटाचे फर्स्ट पोस्टरदेखील शेअर केले आहे. पोस्टरमध्ये एक मोठा हात दिसत आहे. त्याच्याकडे तीन बंदूकधारी लोक बंदूक घेऊन उभारलेले दिसत आहे. यासोबत पोस्टरवर रिलीज डेट लिहिलेली आहे. ‘प्रोजेक्ट के’ पुढील वर्षी म्हणजेच १२ जानेवारी २०२४ रोजी रिलीज होणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone)

या चित्रपटात अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि प्रभासची जोडी पहिल्यांदाच दिसणार आहे. तर अमिताभ बच्चनही जबरदस्त भूमिकेत दिसणार आहेत. सायन्स फिक्शन चित्रपटातून दीपिका पादुकोण साऊथ इंडस्ट्रीत पाऊल ठेवत आहे. ‘प्रोजेक्ट के’ एक तेलुगू सायन्स फिक्शन चित्रपट आहे. नाग अश्विन दिग्दर्शित या चित्रपटाचे शूटिंग सुरू झाले असून हा चित्रपट दोन भागात रिलीज होईल, अशी माहिती समोर येत आहे. त्यामुळे एकंदरीत प्रेक्षकांमध्ये उत्सुकतेचे वातावरण आहे. या चित्रपटाची सुरुवातीपासूनच चाहत्यांमध्ये प्रचंड क्रेझ वाढली आहे. हा चित्रपट चित्रपटगृहात कधी पोहोचणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक नाग अश्विन या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. या चित्रपटापूर्वी त्यांनी महानती सारखा क्लासिकल हिट चित्रपट दिला आहे. ज्याची साउथ इंडस्ट्रीत खूप चर्चा झाली. कीर्ती सुरेश स्टारर या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. यानंतर चित्रपट दिग्दर्शक नाग अश्विनने सुपरस्टार प्रभाससोबत त्याचा आगामी चित्रपट ‘प्रोजेक्ट के’साठी निवड केली.

हे सुद्धा वाचा : सिनेमा सिक्वेलपेक्षा सीझनचा बोलबाला

स्टीवन स्पीलबर्ग एस.एस. राजामौलींच्या ‘आरआरआर’ चित्रपटावर फिदा!

भाऊराव कऱ्हाडेंच्या टीडीएम चित्रपटात ‘एक फुल’ रोमॅंटिक गाण्याची मेजवानी

‘प्रोजेक्ट के’साठी करोडोंचा खर्च
हा चित्रपट दिग्दर्शक नाग अश्विनचा टॉप क्लास साय फाय पॅन इंडियातर्फे रिलीज होणारा चित्रपट आहे. जो हिंदी, तमिळ, तेलगू, कन्नड आणि मल्याळम भाषांमध्ये बनवला जात आहे. हा चित्रपट बनवण्यासाठी निर्मात्यांनी करोडो रुपये खर्च केले आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, सुपरस्टार प्रभासचा चित्रपट ‘प्रोजेक्ट के’ बनवण्यासाठी निर्मात्यांनी सुमारे 500 कोटी रुपये खर्च केले आहेत. साहजिकच ही मोठी रक्कम आहे. चित्रपटात हेवी ग्राफिकल वर्क वापरण्यात येणार आहे. त्यामुळे खर्चात मोठी वाढ झाली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी