मनोरंजन

PHOTO : ‘बिग बॉस’ची पैसा पाण्याची गोष्ट; कशी होतेय रेव्हेन्यूतून कोट्यवधींची कमाई?

गेली दोन दशके टीव्ही इंडस्ट्रीमध्ये बिग बॉची जोरदार चलती आहे. सलमान खान गेल्या 12 वर्षांपासून हा शो होस्ट करत असून या शो ला प्रेक्षकांचा उत्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. बिग बॉस ला केवळ प्रेक्षकांचाच नव्हे तर विविध ब्रँड्सना देखील बिग बॉसचा मोठा सपोर्ट मिळताना दिसत आहे.  बिग बॉसने रेव्हेन्यूच्या माध्यमातून कोटीच्या कोटी उड्डाने घेतली आहेत. ‘बिग बॉस’चा सीझन 16 हा आतापर्यंतचा सर्वात यशस्वी नॉनफिक्शन टेलिव्हिजन रिएलिटी शो आहे.

ब्रँड, स्पॉन्सरशिप, फिल्म प्रोमोशन यांसारख्या इतर अनेक माध्यमातून या शोची कमाई होते. अशातच, माध्यम तज्ज्ञांच्या मते, गेल्या वर्षी ‘बिग बॉस’ ओटीटीने 120 कोटींची कमाई केली, तर १५० कोटींची कमाई जाहिरातीतून झाली.

‘बिग बॉस’ची कमाई प्रत्येक सीझनमध्ये वाढताना दिसली आहे. शोची लोकप्रियता जसजशी वाढत चालली आहे, तसतशी या सीझनची कमाई १८० ते २०० कोटी इतकी होऊ शकते असा अंदाज लावला जात आहे.

तसेच, ‘बिग बॉस’च्या या सीझनमध्ये टीव्ही आणि ओटीटीवरील दर्शकांमध्ये अनुक्रमे ४१% आणि ४०% वाढ देखील पाहायला मिळाली आहे.

‘बिग बॉस’चा होस्ट म्हणून सलमान खान केवळ प्रेक्षकांनाच आकर्षित करत नाही तर त्याची स्वतः देखील एक ब्रँड व्हॅल्यू आहे. त्यामुळे मोठमोठे ब्रॅँड्स देखील पैसा खर्च करताना मागेपुढे पाहत नाहीत. प्रेझेंटिंग स्पॉन्सर्स, ‘पावर्ड बाय’ स्पॉन्सर्स, ‘ड्रिवेन बाय’ स्पॉन्सर्सपासून ट्रेंडिंग पार्टनरपर्यंत अशा सर्व स्तरावरून बिग बॉसवर पैशांचा पाऊस पडत असतो.

बिग बॉल हा असा प्लॅटफॉर्म बनला आहे की येथे प्रत्येक गोष्टीची भरभराटच होते. ब्रँड, चित्रपटाच्या जाहिराती आणि जाहिरातदारांसाठी त्यांचा ब्रँड किंवा उत्पादनांचे मार्केटींग बिग बॉस शो कडे पाहिले जाते.

बिग बॉस शो ला सलमान खान ने एका उंचीवर नेऊन ठेवले आहे. भारतात बिग बॉस शो सुरू झाल्यापासून प्रत्येक सिझनला या शो ने एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.

प्रदीप माळी

Recent Posts

नाशिकरोडमधून 2 गावठी कट्ट्यांसह दोघांना अटक!

उपनगर पोलिसांच्या गुन्हेशोध पथकाला दोघे संशयित दसक गावानजिकच्या महालक्ष्मीनगरमध्ये गावठी कट्टे विक्रीसाठी येणार असल्याची खबर…

20 mins ago

गंगापूर धरणाची दोन कोटी लिटरने वाढली पाणी क्षमता

गंगापूर धरणालगत गंगावऱ्हे गांव येथे गेल्या १४ दिवसांपासून सुरू असलेल्या गाळ उपसा मोहिमेमुळे गंगापूर धरणाची…

1 hour ago

विरोधकांचा मोदी सरकारविरोधात ‘व्होट जिहाद’!

दोन टप्प्यातील निवडणुकांमध्ये अहंकारी आघाडीचा संसार बुडाल्याचे स्पष्ट झाल्याने निराश झालेले इंडी आघाडीचे नेते आता…

1 hour ago

राहुल गांधीची चायनीज तर मोदीजींची भारतीय गॅरंटी अमित शहा

या निवडणुकीत एक गट राम मंदिराला विरोध करणाऱ्यांचा आहे, तर दुसरा गट राम मंदिर बनविणारा…

1 hour ago

कान्स फिल्म फेस्टिव्हलसाठी ‘या’ तीन मराठी चित्रपटांची निवड

फ्रान्समध्ये येत्या 14 मे ते 22 मे 2024 दरम्यान कान्स फिल्म फेस्टिव्हल संपन्न होणार आहे.…

2 hours ago

नाशिक मनपाच्या बांधकाम विभागाचा कानाडोळा,एम एन जि एल गॅस मुळे नागरिकांना होतोय त्रास

गेल्या अनेक वर्षांपासून शहरातील अनेक भागात एम एन जि एल तर्फे गॅस (MNGL Gas) वाहिनी…

5 hours ago