टॉप न्यूज

प्रसिद्धीलोलुप शहाजी पाटील कार्यकर्त्यांना म्हणतात, चारचौघांत डॉयलॉग मारून मला आणखी फेमस करा; ऑडिओ क्लिप व्हायरल!

 

शिवसेनेच्या शिंदे गटाचे सोलापूर जिल्ह्यातील सांगोला येथील आमदार प्रसिद्धीलोलुप शहाजी पाटील यांची नवी ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे. त्यात ते एका सरपंचाला सांगताहेत, की डॉयलॉग मारून चारचौघांत मला आणखी फेमस करा. शहाजी पाटील बुद्धिमान हाय, त्याच्याएव्हढा हुशार माणूस महाराष्ट्रात मिळायचा नाय, असे सांगा.

गुवाहाटीतील “काय झाडी, काय डोंगार, काय हाटील”ने सोशल मीडियात चर्चेत येऊन फेमस झालेले सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील यांना आता जणू प्रसिद्धीच्या झोतात, चर्चेत राहण्याची हौस जडली आहे. तसे काही झाले नाही तर ते अस्वस्थ होत असावेत. म्हणूनच आता ते स्वत:हून सरपंच कार्यकर्त्यांना फोन करून माझी चर्चा घडवून आणा, मला आणखी फेमस करा, असे सांगत सुटले आहेत. या ऑडिओ क्लिपमध्ये शहाजी पाटील यांची जीभही बरीच जड झालेली जाणवते. राहण्याची हौस अजून फिटलेली नाही. त्यांची

पाटील यांनी एका सरपंचाला केलेल्या कॉलची ही व्हायरल ऑडिओ क्लिप आहे. त्यात ते कार्यकर्त्यांना, गावात धिंगाणा करा म्हणताहेत. “मला फेमस करा, माझी चर्चा घडवून आणा, आपणच आपल्या माणसाला मोठे करा,” असेही शहाजी पाटील सांगत आहेत. “शहाजी पाटील बुद्धिमान हाय, हुशार हाय म्हणायचं, त्याच्याएव्हढा हुशार माणूस महाराष्ट्रात मिळायचा नाय, एका दणक्यात, एका फोनवर कुठल्या कुठे जगात पसरलाय लेका, आपणच आपल्या माणसाची किंमत करत नाय, असे जरा डॉयलॉग मारत जावा,” असे हे आमदार महोदय सरपंचाला सांगत आहेत. शेकापचे कार्यकर्ते चटकन जमतात. आपले (शिवसेना शिंदे गट) कार्यकर्ते मात्र काही जमत नाहीत, अशी खंतही शहाजी बापू पाटील या कॉलदरम्यान सरपंचांजवळ व्यक्त करतात.

या व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये बहुधा पाटील यांचा पीए संबंधित सारपंचाला कॉल जोडून देतो. सरपंच लाईनवर आल्यानंतर आमदार शहाजी पाटील त्यांच्याशी बोलतात. या क्लिपमधील संवाद असा :

पीए – हॅलो
सरपंच – हां, बोला
पीए – बापू बोलणार आहेत
सरपंच – हां, द्या की
शहाजी पाटील – हॅलो
सरपंच – हां, बापू बोला, नमस्ते!
शहाजी पाटील – नमस्ते! काय चाललेय राजे?
सरपंच – काय नाय बापू, निवांत आहे
शहाजी पाटील – सरपंचांचा विजय असो. बरं एक आज चांगलं काम केलं
सरपंच – बोला की
शहाजी पाटील – तांदळवाडी रोड शेवटपर्यंत डांबरी दीड कोटी अजून टाकून बसवला
सरपंच – लय भारी झालं भारी
शहाजी पाटील – पहिले 47 लाख
सरपंच – बरं
शहाजी पाटील – पहिले 47 लाख आणि हे दीड कोटी .. दोन कोट रुपये त्या रस्त्याला झाले
सरपंच – अरेच्च्या भरपूर झालं, अभिनंदन!
शहाजी पाटील – आमच्या सांगोल तालुक्याच्या हद्दीपर्यंत रोड टकाटक आण तो रोड रुंद व्हणार हाय
सरपंच – असं हाय का
शहाजी पाटील – हां, दोन्ही बाजूला साइडपट्ट्या भरून आसा दोन गाड्या बसतील आसा
सरपंच – हो हो भारी झालं मस्त! बापू भरपूर कामं दिलीहेत तुम्ही महिमला
शहाजी पाटील – होऊन जाऊ द्या, गावात धिंगाणा करा
सरपंच – हो हो करतो की
शहाजी पाटील – आण जरा बोलत जावा रं .. या लग्नात याला न त्या लग्नात याला बाबासाहेब मोकळा हिंडत बसलाय.. कुठे मुंबई माहित नाय नं पुणे माहित नाय. कामं कोण आणणार, आण कोण करणार? तो बाबा धडाधड धडाधड कामं कराया लागलाय
सरपंच – मग काय, सत्तेच्या विरोधात राहतीत ते नं काय सत्तेत राहून उपयोग हाय त्येंचा काय
शहाजी पाटील – बापू काय येडाय व्हय म्हणायचं, 40 वर्षांचं मुरल्यालं पान हाय म्हणायचं
सरपंच – बरोबर हाय, मग आम्ही तर 17 कोटी महिमला आणलेले सांगतोय सगळ्यांना, रेकॉर्ड हाय तालुक्यात
शहाजी पाटील – शिंदे साहेबापाशी जाऊन धडाधड तालुक्याला पैसे मिळवाया लागलंय, बुद्धिमान हाय, हुशार हाय म्हणायचं, त्याच्याएव्हढा हुशार माणूस महाराष्ट्रात मिळायचा नाय
सरपंच – नायच की नाय बापू बरोबर हाय की
शहाजी पाटील – एका दणक्यात, एका फोनवर कुठल्या कुठे जगात पसरलाय लेका, आपणच आपल्या माणसाची किंमत करत नाय, असा जरा डॉयलॉग मारत जावा
सरपंच – नाय नाय भरपूर असत्यात माझं डॉयलॉग तर
शहाजी पाटील – ते शेका पक्ष बडबडून पुढं जातूय आण आपली काम करून मागे राहत्यात
सरपंच – आपून तसंच राहिलोय, बरोबर हाय आपली बडबडच नाय
शहाजी पाटील – जरा बडबडाया बडबडाया पाहयजे हो, सगळ्यांनी बडबडाया पाहयजे
सरपंच – अहो, सकाळच्या लग्नात मी बघितलं, आपली माणसं लगेच गोळा व्हत नाईत. तुम्ही आला नव्हता व्हय ढिगेंच्या इथे
शहाजी पाटील – आपली गोळा व्हत नायत, त्यांची लगेच गोळा व्हताती बघा. सवय लावाय पाहिजे हां.
सरपंच – बरोबर हाये
शहाजी पाटील – चालतंय, चालतंय

Shahaji Patil Said Make Me More Famous, Shivsena Sangola MLA Patil Brilliant, प्रसिद्धीलोलुप शहाजी पाटील

हे सुद्धा वाचा 

Shahaji Bapu Patil : एकदम ओके म्हणणाऱ्या शहाजी बापूंच्या मतदारसंघात काहीच ओके नाही

काय हाटील, काय झाडी म्हणत मजा मारुन राहिले… यांना मजा मारायला निवडून दिले का? जळगावात तुफान डायलाॅगबाजी

प्राजू कुठे आहेस ?..काय धुकं;काय पाऊस;काय डोंगर; लय मज्जा..हाय !

विक्रांत पाटील

Recent Posts

नाशिक उंटवाडी रोड येथे दूध नमुना मोफत तपासणी शिबीर

केवळ "विश्वास" या साडेतीन शब्दावर गेली अनेक वर्षे ,रोज सकाळी घरासाठी दूध ( Milk) वापरणारे लाखो…

46 mins ago

मतदान केंद्रावर वैद्यकीय सेवा पुरविण्याची जबाबदारी महापालिकेवर

उष्णतेचे प्रमाण सातत्याने वाढत असल्याने त्याचा परिणाम निवडणुकीवर होण्याची शक्यता गृहीत धरून जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आरोग्य…

1 hour ago

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून कोल्हापूरच्या सभेतही धार्मिक विष सरवण्याचे काम: नाना पटोले

अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाचे निमंत्रण काँग्रेसने ठोकरले हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ( Narendra Modi) आरोप…

2 hours ago

शिवाजीनगर येथील ड्रेनेजचे केमिकलयुक्त पाणी थेट तलावात; शेकडो माशांचा मृत्यू

शिवाजीनगर येथील तलावातील शेकडो माशांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. ड्रेनेजचे केमिकलयुक्त पाणी (Chemical-rich…

11 hours ago

नाशकात कारच्या धडकेत घोडीचा दुर्दैवी मृत्यू,तर दोन जखमी

शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. दूधबाजारातील अख्तर रझा यांची घोडी एका लग्नसोहळ्यात सहभागी झाली…

11 hours ago

आडगाव येथे महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र अज्ञात चोरटयांनी बळजबरीने खेचून केला पोबारा

आडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत महिलांना घराबाहेर पडणे मुश्किल झाले आहे. रस्त्याने पायी जाणाऱ्या एका महिलेच्या…

11 hours ago